• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८९-२०

".... या बाबतीत जो अनवस्था प्रसंग ओढवलेला आहे, त्याचा काही तरी दोष सरकारच्या पदरी बांधता येईल, अशी वस्तुस्थिती आहे. उच्च शिक्षणार्थं पैशाची आणि सवलतींची खैरात करण्यात आणि सामान्य जनतेच्या शिक्षणाची आबाळ करण्यात सरकारचे जे काय हेतू असतील ते असोत; पण सामान्य जनतेचे न्याय्य हित साध्य करण्याच्या दृष्टीने तसे करणे अनिष्ट आहे, असेच कोणीही म्हणेल. हिंदी साम्राजाच्या महसुलापैकी फार मोठा हिस्सा घाम गाळणा-या श्रमिक रयतेच्या कष्टामधून उभा राहात असतो, ही गोष्ट सर्वमान्य आहे. एक माहितगार इंग्रज लेखक म्हणतो, "आमचे उत्पन्न शिलकी नफ्यातून येत नाही, ते येते मूळ भांडवलातून ते चैनीच्या वस्तूवरील करांतून हे उत्पन्न पापाचे आणि अश्रूंचे फळ आहे."

अशा रीतीने मिळविलेल्या उत्पन्नापैकी फारच मोठा हिस्सा सरकार वरिष्ठ वर्गीयांच्या-कारण आज तरी हेच वर्ग त्याचा लाभ उठवीत आहेत, शिक्षणावर मुक्त हस्ताने उधळीत आहे. ही गोष्ट न्यायाला आणि समदृष्टीला धरुन नाही. केवळ वरिष्ठ वर्गीयाच्या शिक्षणास उत्तेजन देण्यास सरकारचा हेतू पाहू लागल्यास असा दिसतो की, त्यांच्यातून जे विद्वान शिकून तयार  होतील, ते धनाची अपेक्षा न करता अल्पावधीतच शिक्षण प्रसारास वाहून घेतली, अशी सरकारची कल्पना आहे. "आपण जर वरिष्ठ वर्गीयांत ज्ञानार्जनाची प्रेरणा उत्पन्न केली, तर त्यांची व्यक्तिगत नैतिक पातळी उंचावले, त्यांच्यात ब्रिटीश सरकारविषयी प्रेमादराची भावना फार मोठ्या प्रमाणावर  वाढील लागेल आणि स्वत:ला लाभलेले बुद्धिमत्तेचे वरदान आपल्या देशबांधवामध्ये फैलावावे, अशी अदम्य प्रेरणा त्यांच्या ठायो उप्पन्न होईल, असा या बाबतीत त्यांचा दावा आहे."

सरकारने बाळगलेल्या या हेतूविषयी उपरोल्लेखित लेखकाने पुढे म्हटले आहे. " याहून उदात्त, याहून लोककल्याणकारी आणि याहून आदर्शवादी पण स्वप्नाळू वृत्तीचे तत्त्वज्ञान आपल्या तरी ऐकिवात नाही. फक्त उच्च वर्गीयांच्या पदरी शिक्षणाचे सारेच्या सारे फायदे टाकून वीस कोटी हिंदी प्रजेचे न्यून पूर्ण करु पाहणारी ही मंडळी दुसरी तिसरी कोणी नाही; केवळ सार्वत्रिक शिक्षणाचा बळावर पश्चिमी जगतात केवढी अद्भुत क्रांती घडवून आणता आलेली आहे, हे ज्यांनी चक्षुर्वेसत्य पाहिलेले आहे, अशी ही मंडळी आहे.

हिंदी विद्यापीठांच्या पाठीराख्यांना आमचा सवाल आहे की, आजवरच्या आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून आपल्या सिद्धांतीची सत्यता पटविणारे एक तरी उदाहरण त्यांनी पुराव्यादाखल पुढे मांडावे. श्रीमंतांच्या कित्येक मुलांना त्यांनी सुशिक्षित केले आहे. आणि काही विद्यार्थ्यांना तर उदंड ऐहिक कल्याण करुन घेण्याची साधने उपलब्ध करुन दिली आहेत पण त्यांनी आपल्या देशबांधवांच्या उद्धाराच्या महान कार्यासाठी कितीसा हातभार लावला आहे? सर्वसाधारण जनतेच्या स्थितीत फेर पाडतील, असे कोणते उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत? आपल्या अभागी आणि अज्ञानी बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वत:च्या घरी किंवा अन्यत्र शिक्षणवर्ग सुरु केले आहेत काय? की त्यांनी स्वत:ला मिळालेले ज्ञान 'अडाणी गांवढळांच्या संसर्गाने मलिन होऊ नये, म्हणून त्याला स्वत:ची खाजगी देणगी समजून, आपले आपल्याजवळ राखून ठेविले आहे? सर्वसामान्य जनतेची उन्नती साधावी आणि वरील औदार्याची देशभक्तीने परतफेड करावी, अशा प्रकारची आस्था आपल्या ठायी आहे, याची थोडीतरी लक्षणे, कोणत्या तरी प्रकारे त्यांनी दाखविली आहेत काय? मग जनतेच्या नैतिक आणि बौद्धिक कल्याणाची प्रगती साधण्यासाठी वरिष्ठ वर्गीयांची शैक्षणिक पातळी वाढली पाहिजे, असा दावा कशाच्या जोरावर केला जातो.?

वरिष्ठ वर्गीयांच्या बाजूने केला जाणारा हा दावा वस्तूस्थितीवर टिकता; तर सोन्याहून पिवळे होते. मग 'राष्ट्रीय कल्याणाची' वृद्धी झालेली आहे वा नाही, हे दर्शविण्यासाठी नसुती महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यापीठीय पदव्यांच्या याद्या पुढे केल्या असत्या, तरी काम भागले असते. मग प्रत्येक रॅंगलरची गणना राष्ट्रहितैषी पुरुषात झाली असती, जंगलातील शिकारी संबंधीचे कायदे आणि दहा पौंड कर भरणारास मतदानाचा मिळालेला हक्क, याचा संबंध राज्यघटनेच्या कल्याणकारकतेशी जसा जोडण्यात येतो, तद्वत डीन आणि प्रॉक्टर या पदांच्या नेमणुकीचा संबंध देशहिताशी जोडता आला असता. "