• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८९-१९

ज्या ब्राह्मण समाजाने स्त्री शिक्षणाला विरोध केला. त्याच ब्राह्मण समाजाच्या मुलीच प्रमाण आज शिक्षणात जास्त आहे. ब्राह्मण समाजातल्या स्त्रियाच आज नोकरीमध्ये जास्त आहेत. आकडेवारी काढा. परदेश गमन म्हणजे पाप असे म्हणणारा ब्राह्मण समाज, परदेशात तेच आज जास्त आहेत. जो समाज बदलतो तो पुढे जातो. पाश्चात्य संस्कृती इथं आली. पाश्चात्य संस्कृतीच्या ज्ञानाचं वारं इथं आलं आणि त्यामुळं आमचं खोटं ज्ञान. फसवणुकीचं ज्ञान, लबाडीचं ज्ञान उघडं पडलं. जोतिराव फुल्यांनी अतिशय महत्वाच काम जर कोणतं केलं असेल तर या सगळ्या खोटेपणाला उघडं पाडलं, लबाड्या उघड्या पाडल्या आणि आता लबाड्या करु नका. फार काळ चालणार नाही. आता आम्हाला कळलेलं आहे.

"देव  झाले उदंड । पेवाचे मांडिले भंड ।।
भूता देवांचे थोतांड । एकची चाहले ।।
मुख्य देव तो कळेना । कशाचं काहीच मिळेना ।।
एकास एक वळेना । अनावर ।।
ऐसा नासला विचार । कोण पाहतो सारासार ।।
कैचा लहान कैचा थोर । कळेचिना ।।
शास्त्रांचा बाजार  भरला । देवांचा गलबला झाला ।।
लोक कामनेच्या व्रताला ।। झोंबोन पडती ।।
ऐसे अवघे नासले । सत्यासत्य हारपले ।।
अवघे जना एक झाले । चहुंकडे ।।
मतामतांचा गलबला । कोणी पुसेना कोणाला ।।
जो जे मती सांपडला । तयासी तोची थोर ।।
असत्याचा अभिमान । तेणें पावीजे पतन ।।
म्हणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ।।"

ब्राह्मण समाज आपल्या मखरातून उतरून आमचं कांही भलं करील असं वाटत नाही. आता आमचं कल्याण आम्हीच केलं पाहिजे. जोतिराव फुले उच्चवर्णीय समाजाला आम्हाला प्रतिष्ठा द्या अशी भीक मागत नाहीत, त्यांना व्यवस्थेमध्ये स्थान मागायचं नाही. तर व्यवस्थाच बदलायची आहे. कर्णाचा विद्रोह आहे ना ! पण दुर्योधनाने राजा केला की तो त्याच्या बाजूने गेलाच की नाही. त्याला व्यवस्थेमध्ये वाटा पाहिजे होता. जोतिराव फुले कर्ण नव्हते जोतिराव फुल्यांचा विद्रोह नव्या समाजाच्या रचनेसाठी होता. गुलामगिरी मधून त्यांनी व्यवस्थेवर तोफा डागल्या. सुरुंग पेरले. माणूसपणाची हत्या करुन चालणारी तुमची संस्कृती यापुढे आम्ही चालू देणार नाही. अशा प्रकारचा प्रचंड आग्रह धरला. बुद्धीवादाचा आधार दिला सबंध चळवळीला. प्रत्येक प्रश्नांशी खोलवर जाऊन-मुळात जाऊन विचार मांडला आणि  प्रत्यक्ष प्रश्नांशी खोलवर जाऊन-मुळात जाऊन विचार मांडला आणि प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी भर दिला. नाभिकांचा संप असेल, दीनबंधू वर्तमानपत्राचं प्रकाशन असेल, विधवा विवाह लावून देणं असेल, बालहत्त्या प्रतिबंधक गृह काढणं असेल, आणि जे जे चांगलं आहे ते ते आपण स्वीकारलं पाहिजे. हा जो विचार असेल त्यांच्याजवळ मिशन होती. म्हणूनच ते रिबेलियन होऊ शकले. यातूनच क्रूसेडर निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांच्या कामाची यादी जर आपण पाहिली की त्यांच्या विचारामध्ये, कृतीमध्ये एक सातत्य आहे. इंग्रजालासुद्धा ते म्हणतात की, तुमच्या राजवटीमध्ये जो धुमाकूळ चालू आहे, जे शेतक-यांचे, सामान्य माणसाचे शोषण चालू आहे, ज्यांच्या फंडातून-घरांतून तुम्ही जो शिक्षण कर जम करता तो त्यांच्या मुलापर्यंत तुम्ही शिक्षण नेत नाही.