चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात यश संपादन करून आपले जीवन सुकी करण्याचा प्रयत्न करतात. हे मी पाच पंचवीस ठिकाणी पाहिले आहे. म्हणून ह्या देशाची, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची, ही जी मूलभूत गरज आहे, ती पूर्ण केली पाहिजे. दूध हे एक पूरक अन्न आहे. ते तुम्ही कितीही उत्पादन केले तरी, त्याला काही गि-हाईक मिळाले नाही, त्याचा काही खप झाला नाही, उठाव झाला नाही अशी काही परिस्थिती येणार नाही. आजपर्यंत दुधाचा उठाव कमी होता, मागणी कमी होती, त्याचे कारण उत्पादन कमी होते. सामान्य माणसाला अजूनही दूध परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेकांच्या घरामध्ये चहा पांढरा करण्यापुरतेच दूध वापरले. जाते. काही बड्या-ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे अशी कुटुंबेच आज दुधाचा जास्त वापर कू शकतात. म्हणून दुधाचा खप वाढविणे गरजेचे ठरते. ज्यामुळे नव्या पिढीमध्ये ऐक सामर्थ्य येते, शारिरिक क्षमता वाढते, बुद्धी सतेज होते, अशा प्रकारचा दृष्टीकोन या व्यवसायाच्या वाढीमुळे, निर्मितीमुले समाजासमोर येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून दुग्ध-व्यवसायाकडे पहाताना, या दोन्ही दृष्टीकोनांनी पहाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
मी मघाशी सुरुवातीलाच म्हणालो, त्या प्रमाणे या व्यवसायाकडे थोडे शास्त्रीय दृष्टीनेही पाहिले पाहिजे. मी या संबंध देशामध्ये या व्यवसायाच्या निमित्ताने फिरलो. हरियानामधील कर्नालचे जे नॅशनल डेअरी रिसर्च सेंटर आहे, तिथपासून ते बंगलोरच्या रिसर्च सेंटर पर्यन्त जाऊन आलो. राजस्थानमध्ये सुरतगड येथे जो ‘थरपारकर’ हा फार्म आहे, त्यासही मी भेट दिली आहे. इज्जतनगरला फक्त ‘थरपारकर’ या एका जातीच्या गाईच्या डेव्हलपमेंटचा प्रयत्न केला जातो. तेच जर तुम्ही हरियानामध्ये गेला, तर तेथील जी मूळची - पाकिस्तान आणि हिंदुस्थान होण्यापूर्वीची ‘साहिवल’ नावाची एक चांगली जात होती; त्या जातीवर संकर करण्याचे हरियानामध्ये प्रयत्न केले जात आहेत. त्याच्यासाठी ‘रेड-डेन’ ‘होस्टन – फ्रिजन’ किंवा ‘जर्सी’ अशा प्रकारच्या वळूंचे सिमेन देण्याचा प्रयत्न, तेथे केला जातो. त्यांच्यापासून क्रॉस करून, त्याची होणारी ‘प्रोजनी’ डेव्हलप करण्याचा प्रयत्न तेथे केला जातो.
परंतु केवल एवढ्यावरच आपल्याला समाधान मानता येणार नाही. रिसर्च सेंटरमध्ये चाललेले रिसर्च हे शेतक-यांपर्यंत त्याचपद्धतीने शेतक-यांपर्यंत पोहोचतील, अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून मी या व्यवसायाकडे यादृष्टीने पहातो की, कोणत्या रिसर्च सेंटरमध्ये कोणत्या पद्धते रिसर्च चाललेले आहे, त्यापेक्षा, आमच्या या विभागामध्ये कोणत्या पद्धतीने आम्हाला जावे लागेल? कोणत्या पद्धतीने या व्यवसायाचा अभ्यास करावा लागेल? कोणत्या पद्धतीच्या जनावरांचा येथे विकास करावा लागेल? ह्या प्रश्नांचा विचार होण्याची आज आवश्यकता आहे. आज आपण पहातो की या देशामध्ये म्हैशीच्या दुधाचा अजून जास्त उठाव आहे. आपणासर्वांचाच कल म्हैशीचे दूध खाण्याकडे व म्हणून निर्माण करण्याकडेही आहे. जगामध्ये किती देश म्हैशीचे दूध वापरतात वा निर्माण करतात? जगाच्या पाठीवर दोन-तीन देशा आहेत, की ज्या देशांमध्ये फक्त म्हैशींचेच दूध निर्माण केले जाते, आणि वापरलेही जाते. याचे कारण काय? मी एकदा विनोदाने सहज म्हटले होते की, म्हैस ही तशी ‘सेंसेटिव्ह’ नाही. ती गायी इतकी तर मुळीच सेंसेटिव्ह नाही, तिचा ‘ट्राय पिरियड’ (भाकडकाळ) ज्यास्तकाळ रहाण्याचा आहे. ती सेंसेटिव्ह नाही, म्हणून तिला वात्सल्य नाही आणि वात्सल्या नाही, म्हणून तिला जास्त दूध नाही. तिचा जो ड्राय पिरियड आहे (भाकडकाळ) तो जास्त आहे. हे म्हैशीच्या बाबतीतले ऐक महत्वाचे कारण. तिच्य बाबतीतले दुसरे ऐक महत्वाचे कारण म्हणजे, म्हैशीच्या दुधामध्ये किंवा तिच्या सेकंड जनरेशनमध्ये फर्स्ट जनरेशन पेक्षा जास्त दुधाची वाढ होऊ शकत नाही, तिला क्रॉस करता येत नाही. सजातीय वळू पासूनच निर्मिती करावी लागते. आणि सजातीय वळू पासून निर्मिती केल्यानंतर, दुधाच्या वाढीला काही मर्यादा आहेत, हे सिद्ध झाले आहे.