• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७५-२

समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे धैर्य नव्या पिढीने यशवंतरावांच्या सहृदयतेने व अभ्यासू वृत्तीने दाखवावे. यशवंतरावांच्या एकाग्रतेने प्रत्येक समस्येचे मनन, चिंतन करावे, यशवंतरावांच्या तर्कशुद्ध विचारपद्धतीने स्वत:चे निष्कर्ष काढावेत आणि यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठेने व जिद्दीने ते निष्कर्ष व्यवहारात आणावेत! यशवंतरावांच्या भक्तिभावाने समाजाची नि मातृभूमीची सेवा करावी हीच उत्कट भावना या मागे अनुस्यूत आहे!!

यशवंतरावांचे जीवन चरित्र हे नव्या पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणूनच नामदार यशवंतराव चव्हाण यांचे जीवन हा अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रातील सामजिक नि राजकीय चळवळीचे प्रवाह समजून देणारा एक जीवनस्त्रोत खळाळून पुढे धावतो आहे अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागरणाचा उपक्रम सुरू कारवा; त्यांच्या अभिष्टचिंतनाबरोबरच विचारचिंतनाला सुरुवात करावी म्हणून हा सुयोग साधल आहे!

आमच्या निमंत्रणाला मान देऊन प्राचार्य भा. शं. भणगे, मुंबई, कुलगुरु त्र्यं. कृ. टोपे, मुंबई आणि डॉ. प्र. चिं. शेजवलकर, पुणे या थोर विचारवतांनी एक एक विचाराचे कोरीव लेणे मराठी मनावर कायमचे कोरून ठेवले आहे. त्या सर्वांचे कृतज्ञ आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.

थोर शब्दांचे हे ‘अक्षर’ स्वरूप प्रकट होताना प्रा. वि. पु. गोखले श्याम घळसासी यांनी परिश्रम घेतले आहेत. कराडमधील या साहित्यसेवकांच्या अशा कामावरील लोभ उपक्रमांना रेखीव रुप देणारा ठरतो. म्हणून त्यांचे सप्रेम आभार मानतांना आपलेपणाचा आनंदही साठलेला असतो.

व्हिज्युअल डिझाईन रिसर्च युनिट, कोल्हापूरचे डिझाईन आर्टिस्ट भूपाल मांगोरे यांनी सदर पुस्तिकेचे अंतरंग व बाह्यरंग आकर्षित व मनोवेधक करणेसाठी जे परिश्रम घेतले तसेच श्रीसाईनाथ प्रिंटींग प्रेसचे व्यवस्थापक नि कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्याबद्दल उभयतांचे आम्ही आभारी आहोत.

या व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत ‘अक्षर’ करण्याच्या हेतूने प्रतिवर्षी व्याख्यानांची पुस्तिका प्रसिद्ध केली जावी हाही हेतून आहे. गेल्या वर्षीच्या व्याख्यानाची ही तिसरी पुस्तिका समाज पुरुषाच्या हाती देतांना एकच प्रार्थना –

ना. यशवंतरावजींना राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो! त्यांच्या जीवनाचा आदर्श नव्या पिढीला जीवनाची विधायक दृष्टी देणारा ठरो!