• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३

आभार

हरिदेव शर्मा हे दिल्लीच्या नेहरू ग्रंथालयाचे संशोधक ग्रंथपाल होते. या ग्रंथालयाने स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक नेत्यांच्या मुलाखती ध्वनिफितींवर घेतल्या आहेत. त्या इंग्रजीत आहेत. त्यांतील अनेक शर्मा यांनी घेतल्या होत्या. शर्मा यांनी यशवंतराव चव्हाण यांचीही दीर्घ मुलाखत घेतली आहे. तिच्या तर्जुम्याचा उपयोग केला आहे.
 
डॉ.जयंत लेले हे कॅनडात स्थायिक झालेले असून, ते किंग्स्टन येथील क्वीन्स विद्यापीठात राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. नंतर त्यांची त्याच विद्यापीठात सन्माननीय प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणासंबंधी बरेच लिखाण केले असून, १९६० नंतर त्यांनी यशवंतरावांच्या अनेक मुलाखती ध्वनिफितींवर घेतल्या असून त्या अनेक तासांच्या आहेत. या इंग्रजीतील मुलाखती प्रसिध्द झालेल्या नसून, त्यांच्या तर्जुम्याची पीने जवळजवळ आठशे होतात. डॉ. लेले यांनी ती मला दिली, हे साभार नमूद करत आहे. यशवंतराव चव्हाण यांची विधिमंडळातील भाषणे महाराष्ट्र सरकारच्या ‘ लोकराज्य ’ या प्रकाशनात प्रसिध्द झाली होती. त्यावरून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने सीडी तयार केल्या आहेत. त्यांचा उपयोग प्रस्तावनेसाठी केला आहे.
 
भाऊसाहेब नेवाळकर यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील, सातारा जिल्हातील भूमिगत आंदोलनाबद्दलचा भाग त्यांचे चिरंजीव अनिल यांच्याकडून मिळाला.

गोविंद तळवलकर