यशवंतराव चव्हाण :
व्यक्तित्व व कर्तृत्व
लेखक : गोविंद तळवलकर
---------------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव जव्हाण यांच्या असंख्य खळबळजनक घटनांनी परिपूर्ण असलेल्या जीवनाचे दर्शन त्यांच्या चित्रचरित्रात घडते. त्यांची प्रस्तावना म्हणजे लिखित स्वरूपातील चरित्र नव्हे; तीत यशवंतरावांच्या जीवनातील ठळक प्रसंगांची माहिती आणि विवेचन आहे.
क-हाड तालुक्यातील देवराष्ट्रे या लहामशा गावात एका गरीब कुटुंबात जन्म;नंतर शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व कारावास, कष्टपूर्वक शिक्षण, दोश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाच्या मुबंई प्रांतिक मंत्रिमंडळात संसदीय सचिव आणि नंतर व्दैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री; मग देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री इत्यादी नात्यानी यशस्वी कारभार—असा यशवंतरावांचा राजकीय प्रवास झाला.
राज्य व देश यांच्या सरकारांपुढे ज्वलंत परिस्थिती उभी राहावी आणि ती शमवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडावी, असे होत गेले. हे या तीन पदांपुरते मर्यादित राहिले नाही, तर बांगलादेशच्या युध्दामुळे निर्माणझालेल्या अवघड आर्थिक परिस्थितीतच अर्थमंत्रिपदही त्यांच्याकडे आले.
मुंबई राज्यातीलदोन प्रमुख भाषिकांत विश्र्वास निर्माण करणे. सैन्यदल व उच्च अधिकारपस्थ यांचे मनोधैर्य वाढवणे आणि संसदीय जीवनास निर्माण होत असलेला धोका निवारणे, ही म्हत्वाची आणि कसोटी पाहणारी कामगिरी यशवंतरावांनी केली.
अखिल भारतीय काँग्रेसचा मन:पूर्वक स्वीकार अगदी तरूणपणीच केलेल्या यशवंतरावांनी पक्षनिष्ठेमुळे राजकीय व्यवहार दूषित केला नाही आणि एकांगीपणाही धारण केला नाही.
तीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात सहकारी म्हणून वावरलेल्या यशवंतरावांना राजकीय जीवनात अवघड परिस्थितीशी मुकाबला करावा लागला. अधिकारपदांवर असताना त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने कारभार केला.
सहकाराच्या माध्यमातून नवे जीवन फुलवण्याची ईर्षा व प्रयत्न होते. तसेच आर्थिक विकासाचा एकच एक मार्ग असल्याची दृष्टी नसल्यामुळे सरकारी, खाजगी आणि सहकारी उद्योगांचे स्वागत होत होते.
विविध देशांच्या विविध थरांतील अधिकारपदस्थांचा सहवास, त्या देशांतल्या लोकजीवनाची ओळख इत्यादींमुळे यशवंतरावांचे स्वदेशाचे प्रेम अधिक डोळस होत गेले. जे केले त्यापलीकडे जाण्याची त्यांना उमेद होती—पण परिस्थितीच्या मर्यादा नजरेआड झाल्या नव्हत्या