• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८७-२

व्याख्यात्यांचा परिचय

डॉ. रावसाहेब कसबे

जन्म  :  १२ नोव्हेंबर १९४४, औरंगपूर, ता. अकोले, जि. अ. नगर

शिक्षण :  सर्वोद्य विद्यामंदिर राजूर व मॉडर्न हायस्कूल, अकोले तसेच महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर व संगमनेर येथील कॉलेज मधून. एम्. ए. राज्यशास्त्र, मराठवाडा विद्यापीठात सर्व प्रथम (सर्व शिक्षण मोलमजुरी व नोकरी करून पूर्ण)
पी.एच्. डी. पुणे विद्यापीठ.

नोकरी :  सुरवातीस काही दिवस औरंगाबाद येथे व १९७३ पासून संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक गेली १५ वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विविध ठिकाणी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने व्याख्याने. अस्मितादर्श, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, निकाय इत्यादि नियतकालिकांतून सातत्याने सामाजिक, राजकीय व वाङमयीन विषयांवर वैचारिक लेखन. महाराष्ट्रातील तरूण विचारवंतांतील डॉ. रावसाहेब कसबे हे एक आहेत.

प्रकाशित ग्रंथ संपदा
१) 'झोत’ ( या पुस्तकाच्या ४ महिन्यात ३ आवृत्त्या प्रसिध्द )
२) ‘दलित चळवळीची वाटचाल’
३) ‘आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’
४) ‘आंबेडकर आणि मार्क्स’
५) ‘आंबेडकरवाद’

आगामी
१) भारतीय संविधानाचे स्वरूप आणि डॉ.आंबेडकरांची भूमिका
२) बुध्द—मार्क्स आणि आंबेडकर ’
३) धर्म आणि इतिहास लेखन

‘आंबेडकर आणि मार्क्स ’ या ग्रंथास प्रियदर्शनी अँकेडमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांचे पुरस्कार प्राप्त.
फेब्रुवारी १९८७ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.