• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८६-३६

निसर्गाच हे संकट आपल्याला दूर करणं अवघड आहे, अशक्य आहे असं काही नाही. आपण असे नशिबवान आहोत, भाग्यवान आहोत की निसर्गाने आपल्याला तिन्ही ऋतु दिलेले आहेत आणि थोडा फार पाऊस पडला तर दगड टाकला तर तो उगवून येईल अशी सुपीक भूमी विधात्याने महाराष्ट्राला दिलेली आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी मी ज्यावेळी प्रथम इस्रायलला गेलो तेव्हा तेथील सिंचन पद्धती आणि शेती पाहून मी थक्क झालो. इस्रायलला नऊ महिने उन्हाळा आणि तीन महिने हिवाळा असतो. पावसाळा असत नाही. हिवाळ्यामध्ये आपल्याकडे जसे दव पडते तशा प्रकारचा पाऊस त्यांच्या नशिबानं पडला तर पडतो. एकूण चार इंच पाऊस आहे आणि उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री तपमान असते. आपल्या क-हाडकरांना चाळीस डिग्री तपमान माहित नाही. आम्हा औरंगाबादकरांना व नागपूरकरांना ते माहिती आहे. खाली वाळू आहे. वर चाळीस डिग्रीचा सूर्य तळपतो आहे. पाट-पाणी देण्याच्या पद्धतीने जी आपली चंगळ चाललेली आहे अशी चंगळ त्यांना करता येत नाही. जिथं चार इंच सुद्धा पाऊस पडत नाही तो देश आज जगामध्ये शेतीच्या संदर्भात नेता ठरलेला आहे. ‘इस्रायल इज् द लीडर ऑफ अॅग्रीकल्चरल कन्ट्रीज’ कृषिप्रधान देशांचा इस्रायल नेता आहे. इस्रायलमध्ये वाळू आहे, पाऊस पडत नाही, सूर्य तापतो, माणूससुद्धा काळवंडून जावा असा सूर्य तापतो. मग तिथं लहानसहान झुडपंसुद्धा कशी तग धरत असतील ? केवळ तग धरत नाहीत तर आपल्यापेक्षा दहापट मोठी व शक्तिमान असतात. अर्धा किलोचा टोमॅटो आहे, एक क्विंटलचा केळीचा घड आहे, चाळीस किलोचं कलिंगड आहे, अडिचशे ग्रॅमची मिरची आहे आणि पंचेचाळीस लिटरखाली जर गाईनं दूध दिलं तर दुस-या दिवशी ती शिजवली जाते. आणि आपल्याकडे पंचेचाळीस लिटर गाय दूध देत असली तर तिला पहिलं बक्षिस दिलं जात. एवढं तपमान त्या गाईला सोसणं शक्य नाही तेव्हा एअरकंडिशन्स तबेले बांधले जातात, एवढ्या तपमानात गुलाबाची फुले येऊ शकत नाहीत. ग्रीन हाऊसेस केली जातात आणि ठिबक पद्धतीने व फवारणी पद्धतीने – तुषार पद्धतीने पाणी दिलं जातं. आणि विशेष म्हणजे आपल्यापेक्षा अडीचपट जास्तीच उत्पादन एकरी काढलं जातं. आम्ही कोणीही बहात्तर क्विंटल हेक्टरी कापसाचं उत्पादन फलटणला काढू शकत नाही, मंगळवेढ्यालाही काढू शकत नाही, आणि परभणीच्या ब्लॉक कॉटन सॉईलमध्येही काढू शकत नाही. हे जर इस्रायल करू शकतो, इस्रायल कशाला आता आपण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो आहोत, आपल्या भोवतालची राज्ये करायला लागली आहेत. कर्नाटक करतो आहे, आंध्र करतो आहे, केरळ करतो आहे मग आम्ही वाळवंट होऊ अशी नुसती भीती व्यक्त करण्यामध्ये काही अर्थ नाही. तर मुळातच वाळवंट असलेल्या राजस्थानने जमीन संपादून झाडे लावण्याचा जो प्रयोग सुरू केला आहे त्याचा विचार केला पाहिजे. परंतु या संदर्भात कितीसे प्रयत्न होताहेत ? आमचे दर हेक्टरी उत्पादनसुद्धा इतर राज्याच्या मानाने फार कमी आहे.

आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की हिंदुस्थानच्या सातव्या पंचवार्षिक योजनेत महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. खरं आहे, तो आहे साडेबारा टक्के, आपल्या पेक्षा लोकसंख्येने दुप्पट असलेल्या उत्तर प्रदेशाचा वाटा सुद्धा साडेबारा टक्केच आहे. आपल्या इतकीच लोकसंख्या असलेला आंध्रप्रदेश याचा वाटा मात्र साडेसात टक्के आहे. पण देशाच्या नियोजनामध्ये साडेबारा टक्के वाटा मागणा-या महाराष्ट्राचं उत्पादनाचं स्थान काय आहे ? आपली सातवी योजना उत्तरप्रदेशाएवढी आहे. उत्तरप्रदेशाचं क्षेत्रफळ आपल्या पेक्षा तिप्पट आहे, लोकसंख्या दुप्पट आहे. देशाच्या साधनसामुग्रीमधील मोठा वाटा आम्ही आमच्या हुषारीने आणतो. आपण कौतुक जरूर केलं पाहिजे, परंतु देशाच्या साधनसामुग्रीचा हा वाटा आम्ही अत्यंत काटसरीने वापरतो आहोत की नाही आणि देशाच्या उत्पन्नामध्ये आम्ही लक्षणीय वाढ करतो आहोत की नाही हे पाहिले पाहिजे आणि देशाच्या उत्पन्नामध्ये जर आमचा पहिला नंबर नसेल, नुसता पैसे ओढण्यामध्ये आमचा पहिला नंबर असेल, तर मला असं वाटतं की देशाच्या पातळीवर हा एक गुन्हा आहे. इतर गोष्टींचा फारसा विचार न करता केवळ मी सांगणार आहे. आपल्याला कोर सेक्टर ज्याला आपण म्हणतो अॅग्रीकल्चरल इरिगेशन, इंडस्ट्रीज उत्पादन देणारी खाती आहेत. उत्पादन मिळालेली खर्च करणारी खाती आपण सोडून देऊ.