• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७६-३२

व्याखान दुसरे - दिनांक २९ मार्च १९७६

विषय - "राजर्षि शाहु छत्रपती आणि नवभारताची मागणी"

व्याख्याते - पद्मभूषण धनंजय कीर, मुंबई.

व्याख्याता परिचय -
                                                                                                                                                        
नवभारतातील सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक राजर्षि शाहु छत्रपती शाहू हे केवळ राजे नव्हते, केवळ छत्रपती नव्हते, केवळ समाज सुधारक नव्हते; केवळ लोकोत्तर पुरुष नव्हते तर इतिहासाला कलाटणी देणारे आणि नवा इतिहास घडविणारे नवयुगातले एक महान समाजपुरुष होते.

त्यांच्या मृत्युनंतर लिहिलेल्या अग्रलेखात केसरीने असे म्हटले आहे की, “शाहू पूर्वीच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी साम्राज्य स्थापन केले असतो. निरुपाय म्हणून व काही वेळा इंगजांच्या दडपणाखाली शाहू छत्रपतींना तत्कालीन ब्रिटिश शासनाचे हुकूम पाळावे लागले तरी सुध्दा तशा परिस्थितीत मागासवर्गीयांच्यासाठी व दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी जे काम केले ते नवभारताच्या इतिहासात अपूर्व व मार्गदर्शक ठरले.”  या बाबत खुद्द शाहू छत्रपतींनी असे म्हटले आहे की, “गरिबांच्या उध्दाराचे कार्य करण्याची माझी अनिवार इच्छा झाली आहे. मी त्यांना सर्व मानवी हक्क मिळवून देण्यासाठी शक्य तो सर्व उपाय योजित आहे. ती माझी एक प्रकारची आत्मिक पवित्र भावना आहे. मागासवर्गीयांच्या उन्नतीच्या कार्यात मा थोडा जरी यशस्वी झालो तरी माझे जीवन अंशत: सफल झाले असे मी मानीन” छत्रपतींच्या हृद्यात ख-या राष्ट्रोन्नतीची ज्योत किती प्रज्वलित झालेली होती हे वरील उद्गारावरून दिसून येते.

नांव : पद्मभूषण अनंत विठ्ठल उर्फ धनंजय कीर

जन्म : २३ एप्रिल १९१३ रत्नागिरी येथे

शिक्षण : मॅट्रिक १९३५ मध्ये

या कालात रत्नागिरीस चालू असलेल्या क्रांतिकारी विचारांचा आणि कार्याचा त्यांच्यावर संस्कार झाला. 

१९४५ मध्ये “फ्री हिंदुस्थान” मध्ये महत्त्वाच्या राजकीय पुढा-यांची व्यक्तिचित्रे लिहिली.

१९५० साली त्यांचा पहिला चरित्रग्रंथ (सावरकर चरित्र). इंग्रजी मध्ये प्रसिध्द झाला.

१९३८ ते १९६२ पर्यंत मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समितीवर नोकरी. त्यांनी इंग्रजीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा जोतीराव फुले, महात्मा गांधी आणि राजर्षि छत्रपति शाहू हे चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  व  महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, राजर्षि शाहू महाराज एक मुल्यमापन, विश्र्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांनी लिहलेली मराठी चरित्रे.

महात्मा फुले समग्र वाड्मय, शेतक-यांचा आसूड ही दोन पुस्तकें सहकार्यांने संपादित त्यांच्या सावरकर या इंग्रजी चरित्र ग्रंथाचाही मराठी अनुवाद प्रसिध्द झाला आहे.

‘श्री नामदेव चरित्र आणि कार्य’ हे मराठी चरित्र दुस-याच्या सहाकार्याने प्रसिध्द. सध्या पं. जवाहरलाल नेहरू आणि मानवेंद्रराय यांची इंग्रजी चरित्र लिहित आहेत. प्रौढ वाङमय विभाग – चरित्र आत्मचरित्र-लेखन प्रकाराच्या स्पर्धेसाठी ‘महात्मा जोतीराव फुले’ या ग्रंथास सन १९६८-६९ साली राज्य पुरस्कार मिळालेला आहे. १९७१ साली भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हा किताब.

सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असून ब-याच संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. मराठी संशोधन मंडळ, मुंबई या संस्थेचे गेली चार वर्षे अध्यक्ष आहेत. गेली १० वर्षे सावित्रीबाई जोतीराव फुले गर्ल्स नाईट हायस्कूल ही संस्था चालवित आहेत.