• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७४-१०

नियोजन : काही लोक म्हणतात की नियोजनालाच ( Planning ) आराम द्यावा किंवा विराम द्यावा. हे नियोजनच बंद करावे. पण ही अगतिक व एकांगी अशी भूमिका आहे. नियोजनाद्वारा आपण बरेच साधू शकतो. मात्र हे करण्यासाठी वर्तमानकाळावर आपण नजर ठेवली पाहिजे. आपले भविष्य उज्ज्वल झाले पाहिजे हे निश्चित. पण याचा अर्थ वर्तमानकाळाच्या गरजांचा विसर पडता कामा नये. रोजच्या जीवनातील साधे उदाहरण घेऊ आपले भविष्य उज्ज्वल असावे यासाठी आपण बचत करतो पण बचतीचे प्रमाणही ठरवितो. शक्य व वाजवी बचत करतो, वर्तमानकाळ दु:खी करुन भविष्यातील सुखाची सारखी चिंता आपण करीत नाही. देशाच्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत वर्तमानकाळावर जास्तीतजास्त लक्ष दिले गेले पाहिजे. असे झाले तर नियोजन वास्तव झाल्याशिवाय राहणार नाही. नियोजनाकडे पाहण्याची दृष्टी अतिशय सैद्धांतिक (Theoretical) असून भागणार नाही. ती टिकावू होण्यासाठी व्यवहारी असली पाहिजे. तिचा जास्तीतजास्त उपयोग करुन नियोजन कसे व्यवहारी होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

कष्ट : सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरिबी हटविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवा. सर्व काही आपल्या हातात व मनगटात आहे. तेव्हा आपण अत्यंत कृतिशील असले पाहिजे, उद्यमशील असले पाहिजे. असे आपण करु तर आपल्यापुढे जे प्रश्न आहेत ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या मनामध्ये अशी एक कल्पना असते की गरिबी हटणारच नाही. ती राहाणारच. पण ही कल्पना चुकीची व निरर्थक आहे. आपले भवितव्य आपण घडविले पाहिजे. गरिबी आपण नष्ट केला पाहिजे. लोकशाही जीवनामध्ये आर्थिक विषमतेला, गरिबीला कुठेही स्थान असू शकत नाही. जो गरिबीला तोंड देऊन प्रयत्न करील तो पुढे येणार आहे. मा. यशवंतरावजींनी दिलेले एक उदाहरण मी आपणापुढे ठेवतो. कबीराचा एक दोहा त्यांनी दिला आहे. एका सरोवराच्या काठी फिरत असता मला तहान लागली, असा आवाज कबीरास ऐकू आला. पाण्याचे सरोवर तर तुटुंब भरलेले आहे मग येथे कोणाला कशी तहान लागली याचा शोध घेत असता कबीराला दिसले की त्या सरोवरातील मासाच हे बोलतो आहे.  पाण्यातील माशाने तहान लागली आहे असे म्हणावे हे जसे न पटणारे आहे त्याप्रमाणे भारताला निसर्गाचा वरदहस्त असता, भारत देश संपन्न असता, त्यामधील नागरिकांनी आम्ही गरीब आहोत असे म्हणावे हे बरोबर होणार नाही. जीवनातील आवश्यक ते सुख, धन, कष्टसाध्य आहे हे समजले तर गरिबीचा प्रश्न उरणार नाही.  तेव्हा आर्थिक विषमतेच्या दृष्टीने या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.  शासन आपल्या परीने काम करील. आपण आपल्या परीने काम केलं पाहिजे.

सामाजिक प्रश्न : आपल्यापुढे काही सामाजिक प्रश्नही आहेत. जातिव्यवस्था हा त्यांतील फार मोठा प्रश्न आहे. ही व्यवस्था हळूहळू नष्ट होईल. विज्ञानाची जशी वाढ होत जाईल. लोकशाही मूल्ये जशी विकसित होत जातील तसतशी जातिव्यवस्था कमी होत जाईल, अशी आशा बाळगावयास हरकत नाही. दुसरा प्रश्न भाषाभिन्नतेचा. तीन भाषा आपण अवलंबिल्या आहेत. ज्या ज्या प्रदेशाची म्हणून प्रादेशिक भाषा, आवश्यक आहे. भावनिक ऐक्याच्या दृष्टीने जरुर तेवढी हिंदी येणे आवश्यक आहे परंतु आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या दृष्टीने व त्याबरोबर विज्ञानाच्या दु्ष्टीने इंग्रजी भाषा येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती ज्ञानाची भाषा आहे. आपल्या प्रगतीसाठी, अभिनव भारताच्या बांधणीसाठी इंग्रजी हे फार मोठे प्रभावी साधन आहे. आपली भाषा नसली तरी आपल्या एकंदर फायद्याची म्हणून आपण इंग्रजीकडे लक्ष दिले पाहिजे.