महाराष्ट्रातील दुष्काळ - ४१

भौतिक विभाग

भौतिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे ४ प्रमुख विभाग करता येतील (१) कोकणची किनारपट्टी  (२) दख्खनचे पठार (३) तापीचे खोरे  (४)  नर्मदेचे खोरे.

महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर किनार पट्टीवरील बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे असून त्यांना कोकण भाग म्हटले जाते.  कोकणच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या रांगा व पश्चिम बाजूस अरबी समुद्र आहे.  सरासरी ६० कि.मी. रुंदीचा अशी ही पट्टी असून त्यात डोंगराळ भाग जास्त असून लागवडी योग्य क्षेत्र तुलनेने कमी आहे.  फक्त खोर्‍यातील तळभागात किंवा टेकड्यावरील पठारावर भातशेती होते.  बव्हंशी अनेक नाल्यांनी हा भाग व्यापला असून पावसाळ्यात ते वहाते असतात.  त्यानंतर लगेच कोरडे पडतात.

सह्याद्रीच्या पूर्वेस दख्खनचे पठार वसलेले आहे.  बर्‍याच नद्या सह्याद्रीत उगम पाऊन पूर्वेस वाहतात.  उत्तरेस सातपुडा पर्वतांच्या रांगा असून पूर्व-पश्चिम अशा जवळजवळ रेषेत दिसतात तर सह्याद्री पर्वताच्या रांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या दिसतात.  दख्खनचे पठार हे प्रामुख्याने गोदावरी व कृष्णेच्या खोर्‍याने व्यापले असून त्यात भिमा उपखोर्‍यांचापण समावेश होतो.

तापीचे खोरे हे उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस सातमाळा या दोन पर्वत रांगांच्या मध्यभागी असून ते मध्यभारत व दख्खनच्या पठारामधील एक दुवा आहे.  तापीच्या खोर्‍यात प्रामुख्याने विदर्भाचा पश्चिम भाग, जळगाव व धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो.  सर्वसाधारणपणे हा प्रदेश सपाट खोल भारी जमिनीचा आहे.  तापी खोर्‍याच्या उत्तरेस पश्चिमेकडे नर्मदा नदीचे लहान खोरे असून हा भाग बराचसा डोंगराळ आहे.

कृषि हवामानाप्रमाणे विभाग :

कृषि हवामान व मातीचा प्रकार यांचा विचार करून महाराष्ट्रचे ९ विभाग पाडले आहेत.  ह्याच दोन गोष्टीचा प्रभाव त्या विभागातील पीक-रचनेवर पडतो.

जास्त पावसाचा व जांभ्या खडकांचा विभाग :

या विभागात दक्षिण कोकण किनारपट्टीतील रत्‍नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे तसेच रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग व कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा पश्चिम भागाचा समावेश होतो.  या भागात वार्षिक पर्जन्यमानाचे सरासरीप्रमाणे हे २००० मि.मी. ते ३००० मि.मी. असते.  जांभ्या खडकापासून बनवलेली जमीन येथे प्रामुख्याने आढळते.  खोलगट भागात भात हे पीक असून, उंचावरील भागात तृणधान्ये घेतली जातात.