• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-६६

हा पाच-सहा मिनिटांचाच संवाद, परंतु याचे परिवर्तन जनरल चौधरी व पी. व्ही.आर.राव यांच्या मैत्रीत झाले. त्या दोघांनी यशवंतरावांना बिकट काळी साथ दिली व त्यांची संरक्षण मंत्री म्हणून कारकीर्द अत्यंत वैभवशाली करण्यात योगदान दिले. याचे मूळ कुठे होते, तर ते यशवंतरावांच्या प्रशासकीय कौशल्यात व त्यांच्या प्रत्येक साधनांचा कसा उपयोग करुन घ्यावा या असामान्य कर्तृत्वावर. ह्या गुणांमुळे ज्या ज्या विभागात यशवंतरावजींनी जबाबदा-या सांभाळल्या, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्र मंत्री म्हणून, त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा ठेवला, तसेच एक फार मोठ्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे जाळे निर्माण केले. आजही त्यांच्या मृत्युच्या अकरा वर्षानंतर कुठेही त्यांचे नाव घेतले तर निरानिराळ्या क्षेत्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी, निरनिराळ्या क्षेत्रातील उच्च पदस्थ अत्यंत प्रेमाने व भावनेने यशवंतरावांविषयी बोलतात. ह्याचे गूढ कुठे होते? दुस-यांच्या बाबतीत असे का होत नाही किवा झाले नाही? माझ्या मते आणि माझ्या अनुभवाप्रमाणे आपल्या बरोबर काम करणा-या व्यक्तीविषयी व त्या व्यक्तीशी संबंधी ठेवणेविषयी एक मार्गदर्शक तत्त्व त्यांनी मांडले होते. ते म्हणत की, 'जे अधिकारी माझ्या बरोबर काम करत त्यांच्याकडून मी तत्वनिष्ठेची अपेक्षा करतो तेवढीच निष्ठा मी त्यांना परत दिली पाहिजे. निष्ठा म्हणजे दुहेरी मार्ग आहे. तो एकतर्फी होऊ शकत नाही."

एक असामान्य शासनकर्ता म्हणून जेव्हा आपण यशवंतरावजीबद्दल बोलतो, तेव्हा त्यांनी अविष्कृत केलेल्या तत्वांचा विसर पडू देता कामा नये. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आजच्या परिस्थितीत राज्यकर्त्यांमध्ये या तत्वांची जाणीव नाही व शासनकर्ते आपल्या अधिका-यांकडे एक संकुचित वृत्तीने, एकतर्फी निष्ठेच्या भावनेनेच पाहतात.

शासन व शासनकर्ता म्हणून यशवंतरावांचा उल्लेख करताना त्यांनी केलेली लोकशाही व शासन यांची सांगड घालण्यासाठी पंचायत राज्याची, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली त्याचा थोडक्यात उल्लेख करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची स्थआपन झाल्याबरोबर महाराष्ट्रात सर्वांत चांगले-खरेघरे पंचायती राज्य कसे प्रस्थापित करता येईल याकडे यशवंतरावांनी लक्ष दिले व ते करताना लोकशाही, शासन, सहकारी चळवळ व सरकारी यंत्रणेतील सार्वजनिक सेवक व सरकारी क्षेत्राबाहेर काम करणारे सार्वजनिक सेवक यांना एक उद्धिष्टांसाठी जुंपण्याचे त्यांनी ठरविले व त्यादृष्टीने ठोस पावले उचलली. त्यांनी त्या विषयी वेळोवळी मांडलेले विचार 'सह्याद्रीच्या वा-यात' आजही उपलब्ध आहेत आणि त्या विषयी आपणासमोर काही विशेष बोलण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. पण एक यशवंतरावांचे वैशिष्टय म्हणून सांगितले पाहिजे. कारण या विषयी यशवंतरावांचे कार्य त्यांच्या मनामध्ये बांधलेल्या काही सिद्धांतावर बसवले होते आणि ते मी थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. त्यांच्या विचारांचा पाया होता लोकशाहीमध्ये. त्या विषयी मी त्यांचे विचार आपल्यासमोर मांडीत आहे. लोकशाहीमध्ये सहकारी चळवळीच्या स्थापनेविषयी, सहकारी चळवळ ही मूलत: लोकशाहीची चळवळ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्याचबरोबर सत्ता विकेंद्रीत करण्याची प्रक्रिया केवळ शासकाची प्रक्रिया नसून, सत्तास्थानावर असणा-या व्यक्तीने आपल्या मनाने, भावनेने आणि विचाराने सत्ता विकेंद्रीत करण्याचा नित्य प्रयत्न केला पाहिजे हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी मांडलेले गणित लोकशाही, सहकारी व सत्ता विकेंद्रीककरण करण्याचे गणित जेवढे अचूक होते तेवढेच न बदलणारेही आहे. त्यामध्ये जे तथ्य काल होते ते आजही आहे व उद्या सुद्धा राहील त्याच्याबद्दल शंका असता कामा नये.

यशवंतरावांच्या पैलूंविषयी कितीतरी बोलत येईल व कितीतरी आठवणी सांगता येतील. त्यांच्याबद्दल, त्यांच्याबरोबर भारताच्या इतिहासातील अत्यंत बिकट काळी संरक्षण मंत्रालयात काम करण्याची मला जी संधी मिळाली त्या विषयी मी बरेच काही माझ्या "वादळ माथा" पुस्तकात लिहिले आहे. त्या आठवणी लिहिताना माझे उद्दिष्ट एकच होते आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांची स्मृति व त्यांच्या अंगाचे अलौकिक गुण जे निरनिराळ्या प्रसंगी पाहण्याचा मला योग आला ते लोकांपर्यंत पोचवावे व त्याच उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. त्याचबरोबर कालांतराने जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्याचा, त्यांच्या राजकीय जीवनाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल व त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होईल त्यावेळी अशा साधनांचा उपयोग करावा लागेल या विषयी माझ्या मनात काही संशय नाही आणि म्हणूनच त्या कामात पुढे मदत व्हावी म्हणून जे काही योग्य वाटेल ते मी लिहिले आहे. अजून बरेच काही लिहावयाचे आहे व ते लिहिण्याचा माझा विचार आहे.