• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-३१

पारतंत्र्याच्या पडझडीनंतर आपण स्वतंत्र झालो. नवराष्ट्र नर्मितीसाठी आणखी एक उदाहरण देणे मला योग्य वाटते. मराठी माणसांनी युरोपीयन लोकांची आंधळी नक्कल करू नये. पण युरोपीयन लोकांनी तीन चारशे वर्षांपासून त्यांचे देश जे भिकार होते, ते आज वैभवाच्या शिखरावर कसे नेले. त्यांचा अभ्यास करावा. छ. शिवरायांच्या काळांत तीन चारशे वर्षापूर्वी हे युरोपीयन लोक काय करीत होते? आपल्या देशांत समुद्राच्या काठाला व्यापारी वखारी घालून पोट भरत होते. त्यांचे देश गरीब होते. पण जगभर फिरण्याची त्यांची तयारी होती. देशोदेशीच्या व्यापारासाठी त्यांनी प्रचंड व्यापारी कंपन्या स्थापन केल्या होत्या. केवळ इंग्रजांची इस्ट इंडिया कंपनी होती असं नव्हे. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क अशा सर्वांच्या इस्ट इंडिया कंपन्या होत्या. हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांशी युरोपचा व्यापार त्याकाळी मुख्यतः तुर्कस्थान मधील कॉन्स्टटिनोपल वरून येणा-या खुष्कीच्या मार्गाने होत होता. खैबर, गिलगिट, काराकोरम या खिंडीतून ते हिंदुस्थानांत येत. १५व्या शतकांत कॉन्स्टंटिनोपल शहर ख्रिश्चन लोकांकडून मुस्लीम राजांनी जिंकून घेतले. या घटनेचा युरोपवर विपरीत परिणाम झाला. पूर्वेकडील व्यापाराच थांबला. युरोपमध्ये हाहाकार माजला. त्यावेळी स्पेन व पोर्तुगाल ही युरोपमधील अग्रेसर राष्ट्रे होती. पोर्तुगालचा एक खलाशी उठला. वास्को-डी-गामा त्याचे नांव. समुद्र पालथे घालून आफ्रिकेला वळसा घालून तो केरळमध्ये उतरला. हिंदुस्थानला जायचा नवा रस्ता त्यांने शोधून काढला. पोर्तुगालमध्ये, युरोपमध्ये गुढ्या उभ्या राहिल्या, हिंदुस्थानला जायला मिळणे म्हणजे कुबेराच्या खजिन्याला भेट देणे होते. आज आपण आपल्या मुलीला नवरा शोधताना जावईबापू फॉरेन रिटर्न असेल तर केवढी छाती फुगवून सांगतो. त्या काळी युरोपातील आईबाप जावई इंडिया रिटर्न असेल तर मुलीचे साता जन्माचे कल्याण झाले असं मानीत होते. स्पेनमधला तो कोलंबस कशासाठी अनोख्या समुद्रात जहाजे घालून बसला? तोही इर्षेने उठला आणि म्हणाला, सा-या जगाला प्रदक्षिणा घालतो. पण हिंदुस्थानला जायचा नवा रस्ता शोधून काढतो आणि त्याला वाटेत अमेरिका सापडली. हिंदुस्थानशी व्यापार करण्यात त्यावेळचा युरोप जन्माचे सार्थक झाले असं मानीत होता.

त्यांचा धाडसी, उद्योगी, चिकाटीचा व सांघिक प्रयत्नांचा स्वभाव, चिकित्सक, संशोधक वृत्ती आणि मुख्यतः याच जन्मात पुरुषार्थ करून दाखवण्याची जिद्द यामुळे मागास युरोप तीन चारशे वर्षात जगाचा सावकार बनला. आम्ही मात्र गर्भ, श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन आज जगात भिकारी बनलो आहोत. याची कारणे प्रत्येक मराठी माणसाने नीट समजून घेतली पाहिजेत. गेल्या तीन चारशे वर्षात हे युरोपीयन लोक ब्रह्मानंदी टाळी लावून हरी भजन करीत बसले नाहीत, असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणत बसले नाहीत, त्याने जगाचा कानाकोपरा धुंडाळला, सारे समुद्र पालथे घातले. अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री, जॉन फॉस्टर डल्लेस याने एक पुस्तक लिहिले आहे “वॉर अँण्ड पीस.” रशियाच्या स्टॉलस्टायचे याच नांवाने प्रसिद्ध पुस्तक आहे पण डल्लेस चे पुस्त वेगळे. त्याने त्यात गेल्या तीन चारशे वर्षात युरोपने जग कसे जिंकले याचा उहापोह केला आहे. तो म्हणजे युरोपियन समाजाने एक त्रिशुळ हाती घेतला. मिशनरी, मर्चंट आणि मिलीटरी. “थ्री एम” हे त्या त्रिशुळाचे नांव. अनोख्या प्रदेशांत प्रथम मिशनरी पाठवायचे. मग मर्चंट व्यापारी जायचे. तिथल्या लोकांच्या मनःस्थितीचा आणि परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करायचे. आणि मग सा, दाम, दंड, भेद असा चौफेर हल्ला करणारी मिलिटरी वापरून तो प्रदेश जिंकून घ्यायचा मिशनरी, मर्चंट आणि मिलिटरी हा त्यांचा त्रिशूळ तो प्रदेश जिंकून घेतल्यानंतर केवळ ओरबडून खात बसले नाहीत. तेथील कच्चा माल, मजूर माती मोलाने वापरून आपल्या देशांत कारखाने चालवीत. उपयोगी कल्पक लोक, पाण्यापासून वाफ, वीज त्यांनी शोधून काढली. मनुष्य शक्ती, बैल, घोड्याची शक्ती नव्हे तर वीज, वाफ यांची शक्ती त्यांनीच शोधली. लोखंडाची यंत्रे शोधून त्यावर नवे प्रचंड उत्पादनाचे कारखाने चालविले. ते उत्पादन जिंकून घेतलेल्या प्रदेशात हक्काची बाजारपेठ म्हणून दामदुपटीने विकले. असा उद्योग ते गेली तीन-चारसे वर्षे करताहेत. युरोपियन लोकांनी संपत्तीचे ढीग उभे केले. एवढेच नाही तर जिंकून घेतलेल्या अनेक प्रदेशात तेथील स्थानिक लोक मारून टाकले. त्यांचे विशाल देश जिंकून तेथे बोटी भरभरून युरोपातील माणसे लाखाने पाठविली. तेथे नव्या वस्त्या, गावे वसविली. युरोपच्या भूमीवरचा भार हलका केला. पुढच्या १०-२० पिढ्यांना पुरेल एवढा जमीनजुमला त्यांनी करून ठेवला आहे.