• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-२८

त्या चर्चेत मान्य झालेली सहकारी चळवळीची वैचारिक भूमिका थोडक्यात अशी होती. अर्थशास्त्राची सुरुवात मानवी गरजा आणि त्या भागाविण्याची व्यवस्था यांतून होते. ही व्यवस्था म्हणजे उत्पादन, वितरण, विनिमय व्यवस्था, भांडवलशाही, साम्यवाद समाजवाद हे सर्व वाद उत्पादनव्यवस्थेशी संबंधित आहेत. आम्ही कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकवताना उत्पादन व्यवस्थेचे चार मूलभूत घटक असतात इथून सुरुवात करतो. उत्पादन व्यवस्थेतील चार मूलभूत घटक म्हणजे कच्चा माल, भांडवल, श्रम आणि गि-हाईक. उदाहरणार्थ आपला साखर कारखाना. साखर कारखाना चालविण्यासाठी ऊस म्हणजे कच्चा माल हवा, शारीरिक श्रम करणारा कामगार नोकरवर्ग हवा आणि शेवटी तयार केलेली साखर गि-हाईक हवे. या चार घटकांपैकी एकजरी त्यांत नसेल तर कारखाना चालणार नाही म्हणून उत्पादन व्यवस्थेत हे चारही घटक फार महत्वाचे. त्यांच्या सहयोगाशिवाय उत्पादन व्यवस्था उभीच रहात नाही.

आता पाश्चात्यांनी विकसित केलेली भांडवलशाही आणि रशियाने मांडलेली साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्पादनाच्या प्रक्रियेत भांडवल या घटकालाच प्रमुखपद असून बाकीचे घटक दुय्यम वा खरेदी करता येण्यासारखे आहेत. म्हणून भांडवल देणाराच त्या उत्पादन व्यवस्थेचा मालक असला पाहिजे अशी वैचारिक बैठक स्वीकारून जी उत्पादन व्यवस्था चालते ती भांडवलशाही. त्याच्या उलट साम्यवादी विचारसरणीत सांगितले जाते की, भांडवल हा महत्वाचा घटक नसून श्रम करणारा कामगार हा महत्वाचा घटक आहे. कारण भांडवलाची निर्मिती ही शेवटी श्रमांतूनच होत असते. म्हणून उत्पादन व्यवस्थेचा कामगार हाच मालक, नियंत्रक असला पाहिजे. या दोन वैचारिक भूमिका घेऊन आज जगाच्या पाठीवर अर्थव्यवस्था चालल्या आहेत. भांडवलशाहीत भांडवलाचे हितसंबंध जपायचे, बाकीच्या तिन्ही उत्पादन घटकांचे शोषण केले तरी चालते. साम्यवादांत श्रम करणा-या कामगाराला अवास्तव महत्व देऊन बाकीच्या तिन्ही घटकांना कसेही वापरले तरी चालते. या एकेरी विचारामुळेच भांडवलशाही व साम्यवाद या दोन्ही अनर्थव्यवस्था मानवी हितसंबंधाच्या दृष्टीने अर्थव्यवस्था झाल्या आहेत.

उत्पादन प्रक्रियेतील चारी मूलभूत घटकांचे हितसंबंध जपणारी, कुठल्याही एकदोन घटकांचे प्रमुख मानून बाकीच्यांचे शोषण न करणारी अशी अर्थव्यवस्था मांडता येणे शक्य आहे आणि तेच सहकारी अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट आहे. कच्चा माल देणारा, भांडवल घालणारा, श्रम करणारा व माल घेणारा या चौघांच्याही हितसंबंधाची काळजी घेणारी, त्यांच्यातील शोषण, फसवणूक टाळून पूर्ण समजूतीने व सहकाराने चालणारी अर्थव्यवस्था हीच सहकारी अर्थव्यवस्था आहे. उत्पादनाच्या चारी घटकाच्या सहकाराशिवाय उत्पादन व्यवस्था चालूच शकत नाही. हे सहकार्य लोक्ष, दडपण, संघर्ष करून, वा कायदा दाखवून व्यवस्था चालूच शकत नाही. हे सहकार्य लोभ, दडपण, संघर्ष करून, वा कायदा दाखवून साधले तर फार काळ टिकणार नाही. म्हणून चारी घटकांच्या वाजवी हितसंबंधाची काळजी घेऊन, परस्पर समजुतीने व विश्वासाने चाललेली आणि चारी घटकांची मालकी मान्य करणारी सहकारी उत्पादन व्यवस्था का चालवता येणार नाही? त्यामुळे नफा, स्पर्धा, मक्तेदारी, शोषण टाळता येईल. बळी तो कान पिळी अशी देणारी नवी सहकारी अर्थव्यवस्था उभारून चालवता येणे शक्य आहे. अर्थात हे अंतीम उद्दीष्ट आहे. आजची सहकारी चळवळ त्या टप्प्यापर्यंत पोहचलेली नाही. ऊस घालणारा शेतकरी व भांडवल यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न आज आम्ही सहकारी कारखानादारीत करतो आहे. कामगारांचा सहभाग अजून पुरेसा नाही. आणि गि-हाईकांचा तर अजून विचारही सुरू नाही. पण ज्या दिवशी ऊस घालणारा शेतकरी भांडवल घालणा-या व्यक्ती अगर संस्था, श्रम करणारे मंडळ मालक म्हणून आमचा कारखाना चालवतील त्या दिवशी आम्ही सहकारी चळवळीच्या वैचारिक बैठकीप्रमाणे सहकारी मालकी प्रस्थापित केली असे होणार आहे. हे अशक्य नाही आणि सहकारातूनच हे शक्य आहे असा आमचा विश्वास आहे. सभोवतालचा सर्व व्यवहार खाजगी भांडवलशाही हितसंबंधाचाच असल्याने सहकारी चळवळीचा विकास पर्यायी अर्थव्यवहार उभा करण्याचा ध्येयवाद न सोडता पण जपून सावधपणेच करा लागेल.