• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-२४

महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मराठी मामसांतील भावनिक एकता, बंधुभाव परिदृढ करून निश्चित विश्वासाटी भावना जागवण्यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केले. अगोदर विश्वास मग विकास हे सूत्र फार महत्वाचे आहे. शिक्षणप्रसाराची चळवळ जोपासून पिढ्यान पिढ्यांच्या मानसिक गुलामीतून मराठी मन मुक्त करून इहलोकाची, या जन्मातील समोरच्या परिस्थितीशी डागडुजी करून फेरबांधणी करण्यासाठी ते मन उद्युक्त केले. सर्वांपर्यंत शिक्षण गेले पाहिजे, माणसं शहाणी झाली पाहिजेत. निदान ती इहलोकांत आली पाहिजेत. आपल्या सुखदुःखाचे विचार इथेच आहेत. इतेच त्याची कारणे आहेत. या सभोवतालच्या व्यवस्थेमध्ये दडलेली ती कारणे शोधली पाहिजेत. एवढे तरी त्यांना कळले पाहिजे. मगच आपले प्रश्न सोडविण्यास ते उद्युक्त होतील ही शिक्षण प्रसारामागील उद्दीषेटे होती.

महाराष्ट्राच्या बांधणीसाठी यशवंतरावांनी जो तिसरा उपक्रम घेतला तो आर्थिक परिस्थिती बदलण्याचा. मनःस्थितीप्रमाणे परिस्थिती बदलण्याचा एक नवा मोठा रस्ता त्यांनी काढून दिला. आर्थिक परिस्थिती बदलणे हे सर्व भारताच्या आर्थिक धोरणांवर अवलंबून असते. त्या धोरणाप्रमाणेच पुढे जाण्याचा त्यांनी व्यवहारी मार्गा काढून त्या मार्गाने महाराष्ट्र पुढे नेण्याचा मोठा प्रयत्न केला.

आपल्याल माहिती आहे की, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये इंग्रज का नको याची पहिली अर्थशास्त्रीय मिमांसा, १८८८ साली राष्ट्र पितामह दादाभाई नौरोजी यांनी केली. त्यापूर्वी म्हणजे १८५७ नंतरच्या अव्वल इंग्रजी कालांत इथल्या भल्या भल्यांची अशी समजूत झाली होती की, “इंग्रज हे देव लोक आहेत. ते आपल्या उद्धारासाठी आले आहेत ते रामकृष्णाचे अवतार आहेत. रामकृष्णांना कुठे दाढीमिशा होत्या. इंग्रज साहेबालाही दाढी मिशा नाहीत आणि त्याची एकेक करणी पहा कशी अदभूत. ती आगीनगाडी साहेबांच प्वॉर मोठं नकली गा. बिनबैलाची गाडी कशी हाकली. त्यांचा होका गोमटा रंग, त्यांचा पोशाख, त्यांची शिस्त, त्यांची रहाणी, सारंच अघटित होते.

आमच्या लोकांना पेशवाईच्या बेबंदशाहीनतर इंग्रज बहादुरांची कारकीर्द सुरू झाली. आता काठीला सोनं बांधून काशीयात्रा करावी! अशा दिङमूढ अवस्थेतून भारतीय मन जागं करणारा महात्मा म्हणजे दादाभाई नौरोजी, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये तेही होते. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते. मोठे पारशी व्यापारी होते. मोठे विद्वान अभ्यासू होते. त्यांनी १८८८ साली इंग्रजी राजवटीवर एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. “पॉव्हर्टी अँड ब्रिटीश रूल इन इंडिया.” त्या ग्रंथात त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिले की, इंग्रज हे सावाचा आव आणणारे चोर आहेत. ते आपल्या उद्धाराला आले नसून हिंदुस्थानला लुटायला आहे हेत.” आणि त्यांनी इंग्रजी नोकरशाहीच्या कारभाराची सखोल चिकत्सा करून दरवर्षी किती कोटी रुपयांची लूट  इंग्लंडला नेतात हे सप्रमाण दाखवून दिले. इंग्रजांनी प्रत्येक जिल्ह्यात पहिले मोठे अधिकारी नेमले ते कलेक्टर्स, कलेक्टर म्हणजे गोळा करणारा. जनावराला माणसाळून खायला घालून, गोंजारून, जसी धार काढतात, तसे ते हिंदुस्थानला गोंजारून पिळून काढतात. जळवा जशा रक्त शोषतात पण वेदना होऊ न देता. तशी ही इंग्रजांची लुटालूट आहे. इंग्रज मूळचे व्यापारी. व्यापार, पैसा हाच त्यांचा सर्व व्यवहारामागील प्रधान हेतू होता.

दादाभाईंच्या या ग्रंथानंतरच ख-या अर्थाने काँग्रेसच्या चळवळीला खरे राजकीय रूप येऊ लागले. वसाहतवादी अर्थ व्यवस्थेच्या शोषणाचे भयंकर रूप लोकांना समजू लागले. इथले उद्योग, व्यवसाय बंद पाडून संपवायचे, इथला कच्चा माल मातीमोलानं घ्यायचा. इथल्या लुटीतून इंग्लंडला कारखाने सुरू करायचे, कच्च्या मालाचा पक्का माल करायचा आणि तो आणून परत या वसाहतींमध्ये दामदुप्पटीला विकायचा, इथल्या शेतीत इंग्लंडच्या कारखानदारीला लागणारा कच्चा माल पिकवायला शेतक-यांना भाग पाडायचे, अन्नधान्य नाही पिकले तर इथले लोक उपाशी मरतील, पण इंग्लडंमध्ये सोन्याचा धूर निघेल, याची ते दक्षता घेत. इथले कारागिरीचे धंदे मोडले. शेती उध्वस्त केली. चहाचे मळे, कॉफीचे मळे, निळंबीचे मळे, युरोपीयन लोकांनी इथल्या जमिनी मातीमोलाने घेऊन मोठमोठे मळे उभे केले. इथल्याच लोकांना मजूर म्हणून जनावरासारखे राबवून घेतले. जगभर त्यांचे हेच वसाहतवादी शोषण चालू होते. हिंदुस्थानांतील लोक स्वखुषीने गुलाम होत होते. जनावरासारखे राबायला तयार होते. नशिवाचे भोग, देवाची करणी म्हणून सारे अत्याचार शोषण निमूट भोगत होते. आणि आमच्यातले उच्च वर्णीय “भो पंचम जॉर्ज” म्हणून इंग्रज बादशहाची रोज प्रार्थना म्हणून त्याचे हे वसाहतवादी राज्य आपल्याच देशातील लोकांवर चालवायला एक निष्ठेने मदत करावयाचे.