• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९२-२ (27)

एखाद्या धरणापासून होणारे लाभ आणि एखाद्या धरणापासून होणारे तोटे याचे जे निकष आहेत, आतापर्यंत जें वापरले गेलेत तंत्रज्ञांनी जे वापरले, विश्व बँकेने जे वापरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जे वापरले, तेच निकष आम्ही प्रमाण मानायचे का? जंगल जेव्हा बुडतं तेव्हा होणारे नुकसान हे आम्ही कोणत्या मोजमापांनी मोजायचं? तेव्हा आपले आजचे लाभाचे आणि नुकसानीचे सगळे अंदाज हे आपमतलबी आहेत, चुकीचे आहेत. आम्ही लाभाची व नुकसानीची ती मोजमापंच आव्हानित करतो आहोत. की अमुक फायदा होणार आहे, इतकी हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे, इतकी वीज तयार होणार आहे याबद्दलचे सगले आकडे ज्या कशाच्या आधारे सांगितले जातात त्याची दुसरीही बाजू असते आणि ती कधीच सांगितली जात नाही. लाभाछी ही बाजू आकर्षकपणे मांडल्यानंतर, नुकसानीची बाजू कधी परिपूर्ण सांगितली जात नाही. तसाच ताळेबंद समोर ठेवतात आणि निर्णय घेतात. उदाहरणार्थ एका झाडाची किंमत लावताना ते झाड जन्मभर देणारा ऑक्सिजनसुद्धा धरायचा, माणसाला मिळणारे एकूण एक लाभ, मोजायचे, त्या झाडातून मिळणारे सगळे उत्पादन धरायचे, त्याने केलेल्या मृद्संधारणाचे मूल्य लावायचे आणि अशा पद्धतीने सगळ्या जंगलाचा हिशेब लावायचा असं केलं पाहिजे. पण हे केलं जात नाही. अशा प्रकारचे हिशेब प्रसिद्ध केले जात नाहीत. फक्त किती झाडे जाणार एवढेच सांगितले जाते. त्या बदल्यात तितकी झाडं लावू असं आश्वासन दिलं जातं. वर्षानुवर्षाच्या निसर्गक्रमात तयार झालेलं जंगल मानवी प्रयत्नांनी कृत्रिमरीत्या कधीच निर्माण केलं जाऊ शकत नाही हे सत्य सांगितलं जात नाही. राज्याला इतकी बीज मिळणार, इतकं पाणी मिळणार आहे, इतकी हेक्टर जमीन भिजणार आहे एवढंच सांगितलं जातं.

लाभ कोणाचा होणार आणि नुकसान कोणाचं होणार हे सहसा कधीच सांगितलं जात नाही. त्यागाची भाषा केली जाते की विकास करायचा म्हटल्यावर काही लोकांना त्याग हा करावाच लागेल. विकास करायचं म्हटल्यावर मोठं धरण बांधायचं म्हटल्यानंतर काही लोकांना तिथून बाहेर पडावंच लागेल. काही संसारांचे विस्थापन होते म्हणून काय आपण विकासाची प्रक्रिया अडवून ठेवायची काय? असे भंपक प्रश्नही विचारले जातात. अगदी सुबुद्ध म्हणवणारे लोकही अशी तक्रार करताना दिसतात, की विकासाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस काही नतद्रष्ट लोक उगाच नाकं मुरडतात, गालबोट लावतात. प्रश्न नाकं मुरडण्याचा किंवा विकासाला अपशकून करण्याचा नाही. प्रश्न आहे तो असा की विकासाचा लाभ घेणारे कोण आहेत? आणि विकासासाठी ज्यांना आयुष्याची, संसाराची होळी करून घ्यावी लागते ते कोण आहेत? याची एकदा आपण ओळख करून घेऊ या. आदिवासींना जगण्याचा हक्क आहे की नाही? खेडूतांना जगण्याचा हक्क आहे की नाही? भूमिहीन मजुरांना जगण्याचा हक्क आहे की नाही? त्यांच्या हिताला काही महत्व आहे की नाही? त्यांच्या हिताला काही महत्व आहे की नाही? मग, धरणाच्या पाण्याने ओलिताखाली ज्यांच्या जमिनी येणार आहेत किंवा जे अन्यप्रकारे लाभान्वित होणार आहेत त्यांच्या लाभांसाठी धरणाचा ज्यांना मुळीच लाभ होणार नाही उलट नुकसानच होणार आहे त्यांनी त्याग का कारायचा? दुसरी गोष्ट अशी की त्याग हा स्वेच्छेने करायचा असतो. त्यागाची व्याख्याच मुळी अशी आहे की जो स्वेच्छेने केला जातो. माझ्यावर तुम्ही त्याग करण्याची सक्ती नाही करू शकत. मला जर मानापासून त्याग करावासा वाटला तर त्यालाच त्याग म्हणता येईल. नाहीतर सक्तीने जे होते त्याला बलिदान म्हणतात. जो त्याग स्वच्छेने केलेला नसतो त्याला बलिदान म्हणतात आणि आजपर्यंतच्या विकासक्रमामध्ये अशा प्रकारचं बलिदान दुर्बल माणसाचं दुर्बल घटकांचं, आदिवासींचं, गिरीजनांचं, देण्यात आलेलं आहे हे यापुढं चालणार नाही. हा नर्मदा आंदोलनाने उभा केलेला दुसरा सवाल आहे.