• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८९-३०

हा जो एका परिवर्तनाचा नवा शोध जोतिराव फुल्यांना लागला होता, त्याचं सबंध प्रतिबिंब आपणाला त्यांच्या 'गुलामगिरी' मध्ये 'सार्वजनिक सत्यधर्म मध्ये सांपडते. पण आमच्या डोक्यावर ब्रह्माचं भूत लटकावून ठेवण्यात आलेलं होतं. 'ब्रह्मसत्य जगन्मिथ्या' 'माणसाचं आजचं जीवन हे बुडबुडा आहे. माया आहे ब्रह्म कुठं आहे? माहिती नाही. आत्मा अमर आहे."

या महाविद्वान बहुस्पतीच्या आधारावरुन शूद्रादि अतिशूद्रांच्या कन्या-पुत्रांनी आपल्या मृत माता-पित्यांच्या नांवाने धूर्त आर्य ब्राह्मणांस सुवर्णदान, शय्यादान, छत्रीदान, गोप्रदान आणि जोडे वगैरे दान करु नये असे सिद्ध होते.

" अरे बाळा, यात काय संशय? कारण शूद्रादि अतिशूद्रांचे माता-पिता जिवंत असता त्यांनी त्यांस अन्नान्न करावयास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नांवाने धूर्त आर्य ब्राह्मणांस सुवर्णदान दिल्याने त्याबद्ल त्यांच्या मृत पावलेल्या पितरास कोणत्या ठिकाणी आणि केव्हा लाभ होणार आहे ? तसे त्यांनी आपल्या माता-पित्याला वस्त्र-वस्त्र करावयास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणांस शय्यादान देवून त्यास नरम बिछान्यावर लोळावयास लावल्याबद्दल त्यांच्या मृत झालेल्या पितरास कोणत्या ठिकाणी आणि केव्हा आराम सुख होणार आहे. तसेच त्यांनी आपल्या माता पित्याला उन्हांत तळतळायास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नांवाने धूर्त ब्राह्मणास छत्रीदान दिल्याने त्याबद्दल त्यांच्या मूत पावलेल्या पितरांच्या अंगावर छत्रछाया कोणत्या ठिकाणी आणि केव्हा पडणार ! आणि तसेच त्यांनी आपल्या माता-पित्याला भर उन्हांत अनवाणी तळतळायास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणांस जोडे दान दिल्याने त्याबद्दल त्यांच्या मृत झालेल्या पितरांना पादुकासुख कोणत्या ठिकामी आणि केव्हा होणार ? या सर्वांविषयी सिद्ध करता येत नाही. यावरुन धूर्त आर्यभटाविषयी बृहस्पतीचे म्हणणे सर्व खरे आहे किंवा खोटे आहे, याविषयी तुझा तूच विचार कर म्हणजे झाले.

जोतिराव फुल्यांनी या संबंध हिंदु तत्त्वज्ञानाला कलाटणी दिलेली आहे. शरीराशिवाय आत्म्याला अर्थ नाही हे जोतिरावांनी सांगितलं. शरीर असल्याशिवाय तुमच्या आत्म्याला अर्थच प्राप्त होत नाही म्हणून हे मानवी जीवन दुर्लक्ष आहे. हे मानवी जीवन सुंदर आहे. मग मानवी जीवनावर जीवनातच प्रेम दिलं पाहिजे. 'सार्वजनिक सत्यधर्मामधला' अतिशय सुंदर विचार कोणता असेल तर जोतिरावांनी स्वर्ग नाकारला, जोतिरावांनी देव नाकारला, निर्मिळ मानला जोतिराव फुल्यांनी देव आणि दैव नाकारले. देव आणि देऊळे नाकारली. त्यांना ती शोषणाची केंद्रे वाटली.

जोतिरावांनी 'सार्वजनिक सत्यधर्मामध्ये' नितिचा विचार मांडला. धर्माचा विचार मांडला, स्त्री-पुरुषाच्या संबंधाचा विचार मांडला, स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचा विचार मांडला. सत्यासंबंधी विचार मांडला. म्हणजे जीवनातल्या विविध पातळ्यावर जोतिरावांनी इतका काही खोलवर विचार केला. 'सार्वजनिक सत्यधर्मामध्ये' नीतिचा विचार मांडला, तसेच धर्माचा, स्त्री-पुरुषाच्या संबंधाचा, स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचा, सत्यासंबंधीचा विचार मांडला. म्हणजे जीवनातल्या विविध पातळ्यावर जोतिरावांनी इतका कांही खोलवर विचार केला. 'सार्वजनिक सत्यधर्मामध्ये. त्यांचं ते 'सार्वजनिक सत्यधर्माचं' पुस्तक जर आपण वाचू लागलो तर आपल्या डोळ्यासमोर फ्रान्सची राज्यक्रांती दिसते. कॉर्लमार्क्सचं तत्त्वज्ञान, रशियन क्रांती दिसते, लोकशाही समाजवादामधील उच्च तत्त्वज्ञानाचे पैलू दिसतात.  अशा रीतीनं सार्वजनिक सत्यधर्माचा तेहतीस कलमी कार्यक्रम जोतिरावांनी मांडला आणि सामाजिक विषमतेच्या पायावर उभ्या असलेल्या भारतीय समाजाला त्यांनी फार मोठं चॅलेंज उभं केलं, मोठं आव्हान उभ केलं. मला वाटतं बुद्धानंतर इतक चंड आव्हान कुणी उभं केलं नव्हतं.

त्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्म' मध्ये असा एक विचार मांडला की आर्यभट्ट हे इराण मधून आले, आणि देशस्थ ब्राह्मण आणि इथले शूद्रादि अतिशूद्रांचे जे घटक होते त्यांना त्यांनी आपल्या उच्च  जीवनामध्ये सामावून घेतले. कारण इंग्रज बाहेरून आल्यानंतर त्यांनी जसे इथले शिकलेले थोडे जे ब्राह्मण हाताशी धरले. तसंच थोड आणखी आपण मागे गेलो तर जोतिराव फुल्यांचं म्हणणं असं आहे की, इराणमधून ज्या आर्यभट्टाच्या टोळ्या आल्या, त्या मोजक्याच होत्या. पण त्या संबंध व्यवस्थेवर आपलं वर्चस्व, प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी या व्यवस्थेतील देशस्थ ब्राह्मण त्यांनी हातासी धरले. मूलत: ते क्षत्रिय होते. देशस्थ ब्राह्मण हे क्षत्रिय होते. क्षत्रिय म्हणजे ते इथे राहणारे. मग इथल्या व्यवस्थेवर संबंध ताबा मिळविण्यासाठी इराण मधून आलेल्या आर्यभट्टानी त्यांना प्रमोशन दिलं. आणि त्यांना कुलकर्णी, तलाठी, अमकं-तमकं करुन व्यवस्थेमध्ये जागा, उच्च स्थान मिळवून दिली.