• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८९-२६

अजून फार बदल झाला आहे असे समजू नका. लोकशाही स्वातंत्र्याच्या आभाळाखाली जे सरकार भारतात काम करते त्या सरकारमधील एक बेजबाबदार मंत्री म्हणतो 'गर्भजल परीक्षा चालू पाहिजे म्हणून' आज स्वातंत्र्याच्या बेचाळीस वर्षाच्या आमच्या कारकीर्दीत ही हिंमत होते ! आज शंकराचार्य हैद्राबादला वर्षाच्या आमच्या कारकीर्दीत ही हिंमत होते ! आज शंकराचार्य हैद्राबादला  म्हणतात. हैद्राबादचा पाण्याचा प्रश्न सोडवावयाचा असेल तर एखादी स्त्री सती गेली पाहिजे. आम्ही गप्प बसतो. आणि राजमाता विजयाराजे शिंदे म्हणतात- 'ज्या स्त्रिया सत्शील आहेत, पवित्र आहेत, तिला जर वाटलं आपण सती जाबं तर त्यात गैर काय? 'राजमाता तुम्ही'? हिंमत होते तुमची ही? निषेधाचा ब्र आपण काढत नाही. शिकलेलो म्हणतो आम्ही स्वत:ला आज ही मानसिकता चालू आहे. गर्भजलचिकित्सा हे स्त्रीहत्येचंच पाऊल आहे. एका वेगळ्या सांस्कृतिक आवरणाखाली. एका वेगळ्या प्रागतिक आवरणाखाली तुम्ही मुलीच्या हत्त्येला प्रोत्साहन देता. हे चाललंय काय?

त्या काळात जोतिराव फुल्यांनी जी हिंमत, जे धाडस दाखविलं त्यासाठी मला जोतिराव फुल्यांचा विचार महान सामाजिक विचार वाटतो. हे जोतिराव फुल्यांनी केलं त्यांनी बाजू खंबीरपणाने घेतली. आजही आमचे आई-बाप जे आहेत त्यांचा जर सर्व्हे, घेतला काही सामान्य अपवाद सोडले तर, त्यांना विचारलं की तुम्हाला जेव्हा मुलगी झाली विशेषत: पहिली मुलगी झाली. तेव्हा कसं वाटलं. मी औरंगाबादच्या लोकांना प्रश्न विचारला क-हाडच्या लोकांना नाही. खरी मतं जर सांगीतली तर वाईट वाटते. आणि मुख्य म्हणजे स्त्रीलाही वाईट वाटतं. का? तिच्यावर टेन्शन आहे. आपल्या कुशीत जर वंशाचा दिवा आला नाही, तर नवरा आपल्या उरावर दुसरी सवत आणील. हे टेन्शन आहे. आणि जेव्हा मुलगा होतो पहिल्यांदा स्त्रीला, तेव्हा ती नव-याला हळूच म्हणते, जिंकली की नाही मी. जिंकलं म्हणते ही तिची मानसिक धारणा केलेली आहे या व्यवस्थेनं मुलगी होणं म्हणजे पाप करणं.

"पुत्र व्हावा ऐसा गुंडा । जो त्र्यैलोक्यात लावील झेंडा ।।
लग्नांत मागेल हीरो होंडा । आणि म्हातारपणी डोक्यात घालील मोठा धोंडा ।।

पण आमची ग्रामीण माणसं, आमची शेतकरी संस्कृती सांगते 'पहिली बेटी-तुपरोटी' शहरातील माणसाला आमचा शेतकरी दलित माणूस सांगतो 'पहिली बेटी तूपरोटी' जीवनात कसं जगावं यांचे आदर्श शहरांतील माणसाने खेड्यातील माणसाच्या झोपडीकडे बघून शिकावेत. ही प्रेम नांवाची गोष्ट आहे. 'पहिली बेटी तूपरोटी' श्रीमंत लोकांनी आमच्या सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये विष पेरलं की हुंडा घेतला पाहिजे म्हणून आता पाटील साहेब, संभाजीराव बाबा (काका) इथं आहेत ते सांगतील त्यांच्या काळात हुंड्याला फार महत्व नव्हतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं आक्रमण जसं जसं वाढत जाईल. म्हणून जोतिराव पुले स्त्रीसमाजाचे पक्षपाती होते म्हणण्यापेक्षा स्त्री शिक्षणाशिवाय संस्कृती व्यर्थ आहे त्यांचं जीवनासंबंधीचं महान आकलन होतं. सामान्य माणूस हा संस्कृतीचा कणा आहे. आणि या सामान्य माणसाची बाजू घेत घेत जोतिराव फुले विश्वकुटुंबवाद पुढे मांडत असत. सार्वजनिक सत्यधर्मावर मी उद्या बोलणार आहे. जगातला माणूस जोडणारा विचार आहे हा 'गुलामगिरी' हे पुस्तक त्यांनी कुणाला अर्पण केले. ते पुस्तक त्यांनी अमेरिकेतल्या निग्रोना अर्पण केलं. सामान्य माणसाच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या मंडळीना अर्पण केलं. ही त्यांची सामान्य माणसाची बांधिलकी.

मित्र हो जवळ, जवळ पावणे दोन तास झालेले आहेत. मी म्हणालो तुम्हाला जोतिराव फुले एक तासात. दोन तासात, चार व्याख्यानांत मांडता येण्यासारखा विषय नाही. मी मला झालेला विचारशोध शेवटचा मानत नाही. आता तुमच्या पर्यंत काही पोहोचवू शकलो तर ते तुमचं यश आहे. मी फक्त निमित्त आहे. राहिलेले विचार उद्याच्या सत्रामध्ये आपण घेऊ.

धन्यवाद.