• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८९-१४

हा सबंध टप्पा सांगताना पी. बी. नी. सांगीतलं की १८१८ ते १८४८ समाजपरिवर्तनाची एक झुळूक महाराष्ट्रात समाजप्रबोधनाच्या विचाराचा भाग म्हणून निर्माण झालेली होती. बाळशास्त्री जांभेकर आपल्या 'दर्पण' मधून 'दिग्दर्शन' मधून सबंध समाज व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे असा आग्रह मांडत होते. विधवा विवाह झाले पाहिजेत, बाल विवाह थांबले पाहिजेत, स्त्रियांवरचे अत्याचार बंद झाले पाहिजेत अशा प्रकारच्या धर्मसुधारणा व समाजसुधारणा ते सांगत होते. ही परिवर्तनाची 'झुळूक' होती. पाश्चात्य संस्कृतीचं बेफाम वारं या स्थितीशील समाजावर जेव्हा आदळू लागलं तेव्हा आम्ही गडबडलो, गोंधळलो. आपली स्थितीवादी व्यवस्था दचकली. हे इंग्रज लोक कोठून येतात? हे आमच्या सर्वज्ञ मंडळीना कळत नव्हत. कलकल्ता हे इंग्लंडमध्ये आहे का इंग्लंड कलकत्यात आहे. हे माहीत नव्हतं. १८५३ साली पहिली रेल्वे जेव्हा भारतात आली. आणि ती पहिली ट्रेन जेव्हा मुंबई ते ठाणा धावली त्यावेळी आमचे सर्वज्ञ लोक तिला भूत भूत म्हणून पळू लागले. वेदामध्ये नव्हतीच ना ट्रेन, आणि काही लोकांनी तर तिला दगडं मारली. ही आमची सगळी अवस्था, वेदाच्या पलिकडे आमचं ज्ञान नाही. लोकांच्या अज्ञानावर आमची श्रीमती, लोकांच्या अज्ञानावर आमचं जीवनमान, म्हणून आम्ही सुसंस्कृत ! आणि आमच्या पोटासाठी समाज मेला तरी चालेल, तो थांबला तरी चालेल, म्हणून शोषण चालू, आणि अशा ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या कमरेला आणि त्याला सुद्धा अभिमान असे. असा सर्व समाज बदलताना ही निर्माण झालेली झुळूक. पी. बी. साळुंखे यांनी सांगीतलं की १८४८ ते १८९५ पर्यंत जोतिराव फुल्यांनी समाजक्रांतीच्या चळवळीचा प्रचंड असा 'झंझावत' महाराष्ट्रात निर्माण केला. हा दुसरा टप्पा महाराष्ट्रातल्या समाज प्रबोधनाच्या चळवळीचा आणि १८९५ ते १९२३ ते २५ पर्यंत राजर्षी शाहू महाराजांनी या चळवळीचं 'वादळ' निर्माण केलं आणि १९२५ ते १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं 'तुफानात' रुपांतर केलं. ते प्रचंड 'तुफान' होतं. महाराष्ट्रातल्या समाजक्रांतीच्या चळवळीच्या टप्प्यांशी मी पूर्ण सहमत आहे. अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे. जोतीरावांनी त्या काळी झंझावत निर्माण केला.  आज सुद्धा माझ्या औरंगाबाद शहरामध्ये क-हाड शहरामध्ये तुमच्या आपल्यापैकी किती लोकांची हिंमत आहे. धैर्य आहे, धाडस आहे? "कोणत्याही विधवेनं आपलं बाळतपण माझे घरी येवून करावं. सगळी गुप्तता ठेवली जाईल, म्हणून पाटी लावण्याची" किती लोक हे धाडस आज दाखवतील? वैचारिक क्रांतीचा आग्रह आपण जरूर धरु, राष्ट्रीय स्वातंत्र्याचा पुरस्कार आपण जरूर करतो, राष्ट्रवादाबद्दलतर आपण हिरिरीने बोलतो. पण समाज आमूलाग्र बदलला पाहिजे आणि त्यासाठी आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे, असं मानणा-यापैकी आपण किती लोक आहोत? जोतिराव फुल्यांनी ही सगळं केलं. या संबंध गप्पागार समाजाला जांग केलं, अगदी खडबडून जांग केलं. त्यांनी केवळ मनोरंजनासाठी वाड्मय लिहिलं नाही तर क्रांतीसाठी साहित्य लिहिलं. 'गुलामगिरी' शेतक-याचा आसड' 'इषारा' सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तेक लोकांना जाग आणण्यासाठी आणि लोकांना जाण आणण्यासाठी लिहिली मित्रहो, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. श्रेष्ठ वाड्मयाचं लक्षण काय? जो लेखक त्याच्या वर्तमानकालीन समाजाला जाण आणून देतो तो लेखक माझ्या दुष्टीने मोठा. आणि जे लेखक पुनरुज्जीवनवादी विचार कलावादाच्या नांवाखाली-या नावाच्या वादाखाली आपले लेखन चालू ठेवतात तेव्हा त्यांना बाजारामध्ये फक्त पुस्तक न्यायचं असतं, त्यांना पैसा हवा असतो. खोटी प्रतिष्ठा हवी असते. समाजाचे काही प्रबोधन करावयाचे नसते. जोतिराव फुल्यांनी हे संबंध जे लिहिले ते लोकांना खडबडून जाग करण्यासाठी, लोकांना अस्वस्थ करण्यासाठी. उठा, ज्ञानाची हत्यारे तुमच्या हातात घ्या आणि तुमच्यावर शोषणाचे जे आक्रमण होत आहे ते थांबवा यासाठी जोतिबा फुल्यांनी संघटना बांधली. त्यांचा सर्व विचार प्रत्यक्ष कृतीवर आधारित होता. १८४८ पासून जे शाळा काढण्याचे काम केले ते त्यांनी अठरा शाळा काढल्या. अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा काढणारा पहिला भारतीय जोतिराव फुले. १८८१-८२ चा रिपोर्ट सांगतो की माध्यमिक शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये एक ही मांग किंवा महाराचा मुलगा हजेरी पटावर नव्हता. आणि आज १९६० साली महाराष्ट्राच जेवढं शिक्षण होतं त्याच्या तीनशेपट शिक्षण महाराष्ट्रात वाढलेलं आहे. लोक म्हणतात गुणवत्ता नाही, सगळं बिघडलं, सूज आली आहे. 'मोनोपली' जाणा-यां हा कांगावा आहे. पुणे नगरपालिकेने त्या शाळा नंतर चालविल्या जोतिराव फुले त्यातून बाहेर पडले. किती शाळा त्यांनी चालविल्या हा महत्त्वाचा भाग नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या त्यांनी तीनशे शाळा सत्त्याऐशी होस्टेल्स, तीस पस्तीस महाविद्यालये नसतील काढली त्यांनी ! रयत शिक्षण त्यांच्याच रोपाला आलेलं एक सुंदर फळ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील. पण भारतीय समाजाची पुनरचना करण्यासाठी लागणारी प्रत्यक्ष कृती. अशी जी ज्ञानाची संस्कृती निर्माण करु शकेल, जी सामर्थ्याची संस्कृती निर्माण करु शकेल आणि जी धैर्यशाली माणसांची संस्कृती निर्माण करु शकेल व एक माणूस एक मूल्य या तत्वावर तिचं अधिष्ठान असेल असा एक विवेकबुद्धीचा सुंदर विचार जोतिराव फुल्यांनी दिला.