• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८७-२ (21)

‘ सर्वधर्म समभाव’  म्हणजे सर्वच धर्म चांगले असून त्यांना त्यांच्या मर्यादेत स्वायत्तता देण्याचा विचार आहे. या स्वायत्ततेनेच सर्वच धर्मांचे धर्मगुरू मस्तवाल झालेले आहेत. त्यांनी त्यांच्याच धर्माच्या सामान्य जनतेला आणि स्त्रियांना नाडलें, पिडले, त्यांच्या जीवनाची होळी केली तरी सर्वधर्म समभाववाले टाळकरी म्हणतील तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी फक्त दुस-या लोकांशी समभावाने रहावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. हा धर्मगुरूंच्या आणि धर्मपीठांच्या शोषणाला मान्यता देणारा विचार आहे. आज आपल्या देशापुढील जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी या सर्वधर्म समभावाचा मार्ग चुकींचा आणि इतिहासाची चाके उलटी फिरवमारा आहे. त्यासाठी सेक्युलॅरिझम, इहवादी दृष्टीकोण स्वीकारणे हाच एकमेव उपाय आहे. आपल्याकडे सेक्युलॅरिझमचा सर्वधर्म समभाव असा अर्थ लावला जातो तोच मुळीचूक आहे. सेक्युलॅरिझमच्या या अर्थाला तर सा-याच मूलतत्ववादी मंडळींची मान्यता आहे. सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वधर्म समभाव नव्हे तर इहवादी दृष्टीकोण म्हणजे सेक्युलॅरिझम होय. हा दृष्टीकोण सा-या संस्थाची चिकित्सा करणारा दृष्टीकोण आहे. धर्म संस्था ही सुध्दा सामाजिक आणि राजकीय संस्थेसारखी एक संस्था आहे. ती सुध्दा त्यांच्या प्रमाणेच समाजावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. तिने जगाचे आणि तिच्या पंखाखाली असणा-या लोकांचे काय भले केले आणि कसे वाटोळे केले हे सांगणारा हा विचार आहे. या जीवनाचा, हे जीवन अधिक सुखी कसे होईल याचा आणि हे जीवन ज्या समाजात जगावे लागते त्या समाजाचा विकास, त्याची प्रगती कशी होईल हे सांगणारा हा विचार आहे.

म्हणून मूलतत्वाद्यांचे आव्हान हे मुळी केवळ धार्मिक आव्हान नाहीच ते आर्थिक आणि राजकीय आव्हान आहे. त्या आव्हानाला सर्व धर्म समभावाची पताका खांद्यावर घेऊन सामना देता येणार नाही. त्याला सेक्युलर विचार घेऊनच सामना देता येईल. तुमचा व्यक्तिगत धर्म तुम्ही तुमच्या घराच्या उंब-याच्या आत ठेवा तुम्ही ध्यान धारणा करा, योग करा, विपश्यना करा, नमाज पढा हे सारे तुमच्या घराच्या आत. समाजजीवनातील तुमच्या संस्थात्मक धर्मामुळे होणारे हस्तक्षेप चालू दिले जाणार नाहीत. मला वाटते हेच या धर्माच्या विषाला एकमेव औषध आज उपलब्ध आहे. परंतु हा विचार केवळ विचार राहता कामा नये. हा विचार एक चळवळ होणे, मास मुव्हमेंट होणे आवश्यक आहे.
हे विसावे शतक जसे गतिमानतेचे शतक आहे तसेच ते अभिसरणाचेही शतक आहे. हा धर्म माझा नाही म्हणून त्याच्याशी माझे काहीच घेणे देणे नाही असे म्हणून आज चालणार नाही. सर्वच धर्मांच्या मूलतत्वाद्यांशी सर्वच धर्मातील विचारी माणसांनी आज लढा देण्याची गरज आहे मुस्लिम मूलतत्ववाद्यांशी एकटें मुस्लीम सत्यशोधक लढू शकणार नाहीत. सती विरोधी एकटे पुरोगामी प्रवाह लढू शकणार नाहीत. आपल्या सर्वांनाच त्यांच्याशी लढावे लागेल. ब्रिटिशांपासुन  स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणे फार सोपे होते. ही लढाई फार अवघड आहे. परंतु भारत राष्ट्राची एकात्मता आणि एकसंधता टिकविण्यासाठी ही लढाई आपल्याला लढावीच लागेल. आपण ती लढलो नाहीतर एकविसाव्या शतकात जेव्हा भारत जाईल त्यावेळी त्याचे अस्तित्वच शिल्लक राहील कीं नाही याबद्दल शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज मी आपल्यासमोर धर्मासंबंधी, त्याच्या विकासासंबंधी आणि त्याने निर्माण केलेल्या प्रश्नासंबंधी थोडक्यात बोललो. यात अजून बोलण्यासारख्या ब-याच गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत याची मला जाणिव आहे. त्या पुन्हा कधी तरी विस्ताराने बोलता येतील. धर्म ही जशी एक समाज विघटनाची शक्ती आज बनलेली आहे. तसेच ‘ इतिहास लेखन ’ ही सुध्दा त्या शक्तीला सहाय्य करणारी कृती ठरलेली आहे. म्हणून उद्याच्या भाषणात मी इतिहास लेखनाची चर्चा करणार आहे. आज एवढे बोलून मी थांबतो.