• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८०-४४

व्याख्यान तिसरे - दिनांक १२ मार्च १९८०

विषय - "शेतीचे अर्थशास्त्र व त्यातील दुग्ध व्यवसायाचे स्थान."

व्याख्याते - मा. श्री. प्रतापराव बाबुराव भोसले, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

व्याख्याता परिचय -

महाराष्ट्रातील सुमारे सत्तर टक्के लोक शेतीवर उपजीविका करतात. पण जमाखर्चाच्य दृष्टीने विचार करता शेतीचे अर्थशास्त्र चांगले राहिलेले नाही. शेतीचा व्यवसाय डोळसपणाने केला पाहिजे. महाराष्ट्रातील खचलेल्या, नामोहरम झालेल्या शेतक-याला जोडधंदा म्हणून दूधाचा उत्तम व्यवसाय आहे.

दूध हे पूर्ण अन्न आहे. समाज समर्थ व आरोग्यसंपन्न होण्यासाठी दुधासारखे दुसरे अन्न नाही. दूध भरपूर मिळण्यासाठी म्हशीपेक्षा गाईंचा वा त्याही मिश्र (क्रॉस केलेल्या ) गाईंचा वापर केला पाहिजे. आपल्याच भागातील गाईंवर क्रॉस करून प्रयोग करून दुधाचे उत्पादन वाढविणे योग्य ठरेल. दूध व दुधापासून तयार होणा-या पदार्थांचे बाय प्रॉडक्टस् जास्त प्रमाणात कसे निर्माण करता येतील याचा जाणीवपूर्वक शास्त्रशुद्ध विचार झाला, तर शेतकरी व समाजही समर्थ आणि संपन्न होतील.

नांव : श्री. प्रतापराव बाबूराव भोसले

जन्म : २५ ऑक्टोबर १९३४, भुईज, जि. सातारा, येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात.

व्यवसाय : शेती.

* १९६२ ते ६७ या काळात ते भुईज ग्रामपंचायतीचे सरपंच.

* सातारा जिल्हा सहकारी जमीन विकास बँकेचे संचालक मंडळाचे ४ वर्षे सदस्य.

* वाई येथील आर्टस् व कॉमर्स कॉलेजच्या जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त.

* १९६७, १९७२, १९७८, १९८० या चार सार्वत्रिक निवडणुकीत वाई मतदार संघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आले.

* १ ऑगस्ट १९७८ रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पुनवर्सन खात्याचे राज्यमंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश.

* विधानसभा सदस्य असतांना त्यांनी अंदाज, वन, महाराष्ट्र राज्य स्टेट फार्मिंग कार्पो. महामंडळ, वगैरे अनेकविध समित्यावर काम केले आहे. विधान सभेतील एक तडफदार आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.

* वाई तालुक्यातील झालेले धोम धरण आणि धरणामुले विस्थापित होणा-यांचे पुनर्वसनाचा जिटल प्रश्न त्यांनी अगदी अल्पावधीत सोडविला.