• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८०-३१

राज्यघटनेनंतर हिंदू कोड बिलाचा त्यांनी पाठपुरावा केला. १९५५ साली पारित झालेले हिंदू कोड बिल हे त्यांना पूर्णतः अभिप्रेत असलेले कोड बिल नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या देशाच्या सर्वोच्च कायद्याला आपण “राज्यघटना” असे म्हणतोच; पण आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या हिंदू कोड बिलाला या देशाची “समाजघटना” असे मी एक वेगळ्या अर्थाने म्हणेन. हिंदू कोड बिलाद्वारे हिंदुसमाजाला- हिंदुधर्मातील विविध संप्रदायातील स्त्रीपुरुषांना – समतेच्या पायावर डॉ. आंबेडकर उभे करू इच्छित होते. या प्रयत्नात सक्रीयपणे गुंतलेल्या या प्रज्ञावंत नेत्याचा वैचारिक प्रवास अव्याहतपणे चालूच होता. १९५१ साली “भारतीय बौधजन संघा” ची त्यांनी स्थापना केली. त्याचवर्षी “बौद्ध उपासनापथ” लिहिले. १९५४ साली रंगून येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत त्यांनी भाग घेतला. १९५५ साली “भारतीय बौद्ध महासबे” ची स्थापना त्यांनी केली. “बुद्धी आणि त्याचा धम्म” या महान ग्रंथाची रचनाही ते याच काळात करीत होते. या सर्व गोष्टी व घटना बौद्ध धर्माच्या स्वीकाराची नांदी तयार करीत होत्या असे म्हणावे लागेल. पण हिंदू कोड बिलाची निर्मितीही याच काळातली घटना आहे. भारतीय जीवनाताला मुख्य प्रवाह (mainstream) असणा-या हिंदुसमाजाची पुनर्रचना झाली तर सामाजिक लोकशाही या देशात निश्चितच अस्तित्वात येईल; आणि इतर धर्मातील लोकही अशा प्रयत्नात सहभागी होतील, असे त्यांना वाटत होते. बाबासाहेबांनी शैक्षमिक क्षेत्रातही सामाजिक लोकशाहीच्या मूल्यांची वाढ व जोपासना करण्याच्या हेतूने कार्य केले, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमागे देखील त्यांचा मुख्य हेतू संसदीय लोकशाहीला सामाजिक स्वातंत्र्याच्या, समतेच्या व बंधुभावाच्या संकल्पनेची व कार्यसिद्धीची समृद्धी देण्याचा होता, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. राजकारणात बाबासाहेबांनी तडजोडी का स्वीकारल्या नाहीत या प्रश्नाचेच उत्तर त्यांच्या या विचारनिष्ठेत व मूल्यप्रतिबद्धतेत सापडेल. राजकारण तत्वचूतीच्या तडजोडी त्यांनी स्वीकारल्या असत्या तर आयुष्या अखेरपर्यंत ते सत्तेच्या अंबारीत बसून सबंध देशात विहार करून शकले असते. पण त्यांना ते मान्य नव्हते. त्यांना ते नको होते. सत्तेचा मोह त्यांना नव्हता. त्यांना पाहावयाचा होता सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य व समतेच्या तेजस्वी सूर्य! पण विषमतेच्या काळ्याकुट्ट ढगांनी पूर्णपणे आच्छादिलेल्या आकाशात तो कसा उगवणार? तो कसा दिसणार? त्याची किरणे दलितांच्या व पददलितांच्या झोपड्यांवर कधी व कशी पडणार? हिंदुसमाज बदलण्याची लक्षणे त्यांना दिसली नाहीत आणि म्हणून त्यांनी आपल्या लाखो अनुयायांबरोबर १९५६ साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. देशभर या घटनेच्या ब-यावाईट प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्रातला महार समाज पूर्णतः हिंदू धर्म सोडून गेला. देशाच्या इतर भागातील अस्पृश्यांनीही धर्मांतर केले. महाराष्ट्राच्या राजकारणावरव समाजकारणावर या घटनेचा सखोल परिणाम झाला हे वेगले सांगण्याची आवश्यकता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ या दिवशी महापरिनिर्वाण झाले. आणखी काही वर्षे ते जगू शकले असते तर या देशातील राजकारणाव त्यांच्या महान व्यक्तीमत्वाचा वचक राहला असात. देशाला ते भाग्य लाभले नाही.

मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात धर्मांतराची ही घटना अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना आहे हे विसरून चालणार नाही. दलितांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडणारी ही घटना आहे. दलितांना अस्मिता प्राप्त करू देणारी, त्यांचे “स्वत्व” जागे करणारी, त्यांना स्वतःच्या जीवनाचे “स्वामित्व” बहाल करणारी आणि त्यांच्या सबंध अंधारग्रस्त जीवनाला “स्वयंप्रकाशीत” करणारी ही घटना आहे. दलितांच्या “माणुसपणा” च्या प्रतिशोध घेणारी, त्यांच्या उज्वल “उद्या” कडे झेपावणारी, सामाजिक स्तंत्र्याचा व समतेचा उदघोष करणारी, मानवी अधिकाराचा जयघोष करणारी, आणि माणसाला या विश्वाचा केंद्रबिंदू मानून त्याच्या जीवनाचे सर्जन करणा-या तत्वज्ञानाचा स्वीकार करणारी ती घटना आहे. आणि म्हणूनच देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलितांना एक नवीन मूल्य श्रीमंत मानसिकता या घटनेने दिलेली आहे, हे वेगले सांगण्याची आवश्यका नाही. ही घटना म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातले एक महत्वाचे Watershed मानले जाणार आहे; हे मी आपल्याला सांगू इच्छितो.

मित्रांनो, देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राच्या समाजजीवनाला प्रभावित करणा-या ज्या काही घडामोडी झाल्या, ज्या काही घटना घडल्या त्यापैकी काही ठळक घडामोडींचा वा घटनांचा मी उल्लेख करणार आहे. स्थूलपणे कुळकायदा, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, दलितांचे धर्मांतर, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती, लोकशाही विकेंद्रिकरणाचा प्रयोग आणि सहकारी चळवळीचा आरंभ या सहा घटना माझ्या मते अतिशय महत्वाच्या आहेत. या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनाला परिवर्तनाच्या नवीन दिशा व वेगळ्या वाटा दिल्या आहेत यात वादच नाही. आजच्या महाराष्ट्राला “डिफाइन” करणा-या ह्या घटना आहेत असे मला वाटते. These are the defining factors in contemporary social life of Maharashtra.