• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७६-२७

मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की आपण ज्या मूलभूत हक्काचा विचार करतो ते मूलभूत हक्क किती लोकांना मिळालेले असतात ? संपत्ती राखण्याचा हक्क, जमिनी संपादनाचा हक्क, अर्थार्जन साधन गोळा करण्याचा हक्क. हे हक्क सर्वांना बहाल केलेले आहेत पण तशी सर्वांची परिस्थिती आहे का ? सर्वांनाच तशा प्रकारची संधी आहे काय ? ‘धनार्जनाच्या साधनांच्या प्रचंड वाढी मध्ये मी ते करू शकत नसल्यामुळे या स्पर्धेत बहुसंख्य दुबळा समाज उभाच राहू शकत नाही. फक्त कागदावरती मला मूलभूत हक्क दिला आहे. जमीन संपादनाचा तुला हक्क दिला आहे अरे, पण संपादन करण्याची कुवतच माझ्याकडे नाही. तेवढी संधीच कुणी मला या आयुष्यात दिली नाही. आणि म्हणून तुम्ही मला फक्त तोंडानच सांगणार की तुला दिला आणि उपभोग घे त्याचा मी कसा उपभोग घेऊ शकणार ? अशा दुबळ्या समाजाला पहिला हात देणं त्याच्या संरक्षणासाठी फळी निर्माण करणं ही आज आवश्यक गरज निर्माण झाल्यामुळे या हक्कांवरती बंधन घालण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून याच्यात वाईट वाटून घेण्याचं कारण असावं असं मला वाटतच नाही. पण ज्यानी खूप कमावलं त्यांनी समाज भावनेनं धर्म भावनेनं जर थोडंसं आपल्या बांधवासाठी काढून दिलं तर तो माणुसकीचा, खरा समाजवादाचा, लोकशाहीचा अर्थ आहे आणि म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी, समाजवादाची संकल्पना ख-या अर्थांने या देशामध्ये रूजविण्यासाठी, त्याग म्हणून ही बंधने आपण स्वीकारली पाहिजेत. अशा प्रकारचा आग्रह अशा बंधनामध्ये असतो असे मला प्रामाणिकपणानं वाटतं. दुसरी गोष्ट व्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी ! विचार स्वातंत्र्यासंबंधी ! विचार स्वातंत्र्याची ब-याच वेळेला गळचेपी होते अशा प्रकारचा विचार अनेक बुध्दिवंत मांडतात. माझ्या देखील मनामध्ये अनेक वेळेला संभ्रम निर्माण होतो. की मला जर एखादा  विचार मांडायचा असेल आणि तो सरकार विरोधी असेल तो काही प्रचलित धोरणाच्या विरूध्द असेल तर तो मांडण्याचं स्वातंत्र्य मला का असू नये ? याच उत्तर मीच ज्यावेळेला माझ्या मनाशी शोधतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं, की गेली २५ वर्षे आम्हाला इतकं स्वातंत्र्य होतं, त्या स्वातंत्र्यात आम्ही काय केलं ? कुठल्या सामाजिक  उत्थानासाठी कुठला नवा विचार समाजासाठी दिला. आणि ज्यांनी गेल्या २५ वर्षांमध्ये विचारांचं वांझपण दाखवलं, ज्यांनी कसलीच प्रसूती केली नाही गेल्या २५ वर्षांमध्ये, त्यांना एकदम या सहा महिन्यांच्या काळामध्ये प्रसूतिवेदना व्हायला लागल्या आणि आता “आम्हाला स्वातंत्र्य दिल नाही तर आम्ही आता मेलो हो” असं ज्या वेळी म्हणण्याची पाळी आली त्यावेळी २५ वर्षे स्वातंत्र्याचा समाजासाठी तुम्ही कधीही लाभ घेण्यासाठी पुढे आला नाही तेव्हा मग माझ्या लक्षात येतं की वांझ असलेलं विचार स्वातंत्र्य हे विचार स्वातंत्र्यच असू शकत नाही आणि म्हणून ते समाजाच्या कल्याणासाठी कधी लाभू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आमच्या खंडप्राय देशामध्ये दारिद्र्यांत आणि अज्ञानात खितपत पडलेल्या दुबळ्या समाजामध्ये विचारच जिथं पोहोचलेला नाही. तिथ विचाराचं स्वातंत्र्य त्याच्यापर्यंत कुठलं पोहोचणार ? विचार स्वातंत्र्याची कल्पना मूठभर लोकांसाठी अगदी ३% लोकासाठी असेल परंतू ९५% समाज! त्याच्यापर्यंत विचारच गेलेला नाही. विचार कोठून जाणार ? पोटाची भाकरीच गेलेली नाही, कामासाठी उद्योगच गेलेला नाही, त्या अशा दुबळ्या समाजासाठी जिथं पोटाची भाकरी जात नाही, तिथं विचार गेला नाही, त्याला विचार स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या, विचार स्वातंत्र्याची मोठ मोठी आकर्षक शब्दांची आतषबाजी केली तर त्याचे पोट भरणार नाही ! हा विचार लक्षात आला की माझ्या सारख्याला असं वाटतं की काही जरी सांगावसं वाटलं तरी जर त्यांच भलं होणार असेल तर क्षणभर माझे हे जे कांही उन्मळून येतंय ते थोडं गिळलेलं बर, असं म्हणून थोडीशी गिळण्याची तयारी ठेवली, तर मला असं वाटतं की आमच्या समाजाचा दुबळ्या थरापर्यंत जे काही जाणार असेल ते जाण्यातला मोठा अडथळा दूर होईल. तेव्हा या विचारात व्यक्ति स्वातांत्र्याच्या कल्पनांच्या विरोधी असं कांही नाही. व्यक्ति स्वातंत्र्याच्या कल्पनेचा विकास करण्यासाठी, मालमत्ता हक्काच्या कल्पनेचा विकास करण्यासाठी, हक्क कल्पना मूठभर लोकापर्यंत न राहता ती अधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, विचार करण्याचं स्वातंत्र्य मूठभर लोकापुरतं मर्यादित न राहता विचार करण्याची पात्रता अनेक लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, म्हणून जर कदाचित त्या विशाल करण्यासाठी क्षणभर जर माझ्या विचाराला जर काही कुठे बंदिस्त असं ठेवावं लागलं तर समाज हिताच्या दृष्टीने ते केलं तर वावगं आहे अस मला  स्वत:ला प्रामाणिकपणाने वाटत नाही.