• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७४-२२

अशा प्रकारचा बद्ल गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली जी राष्ट्रे आहेत त्या राष्ट्रांमध्ये होतो आहे. म्हणून समाजवादाची चर्चा करताना कुठला नमुना आपल्याला अनुकूल ठरेल याची आपण चर्चा करु त्या वेळेला आपल्या असे लक्षात येईल की ज्या नमुन्यामध्ये दरडोई वीस हजार रुपये भांडवल गुंतवावे लागेल, ज्या नमुन्यामध्ये शेकडा सहा टक्के लोक फक्त शेतीवर अवलंबून राहातात, ज्या नमुन्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक पांढरपेशा म्हणून काम करतात असा नमुना आपल्या देशामध्ये कदापी चालणे शक्य नाही. म्हणून आपल्याला नव्या मार्गाची चर्चा करताना, नव्या उपक्रमाची चर्चा करताना आपल्या देशातील आर्थिक परिस्थितीचे भान जर ठेवायला पाहिजे असेल तर आपल्या नियोजनाचा, आपल्या औद्योगिक श्रमाचा, सर्वस्वी निराळ्या दृष्टीने विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे. आज हा विचार आपण फारशा आणि पुरेशा प्रमाणात केलेला नाही. त्यातून आपल्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

म्हणून पहिली गोष्ट जर या अविकसित राष्ट्रामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे असेल तर ती ही आहे की या राष्ट्रामध्ये उपलब्ध असलेली मनुष्यशक्ती. त्या मनुष्यशक्तीचा पूर्ण वापर केल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या यांत्रिक अवजारांच्या मदतीने आपल्याला भांडवलाचा संचय करता येणार नाही. आणि मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो या गोष्टीचे भान चीनने ठेवले. चीनमध्ये मनुष्यशक्तीचा वापर केल्याकारणाने माओ-त्से-तुंगला चीनची प्रगती आज जी झाली आहे त्या प्रमाणात करता आलेली आहे. लोकशाही आणि हुकूनशाहीचा याच्याशी संबंध नाही. अचूक दृष्टी ठेवून एका विशिष्ट शिस्तीने आपल्या ठरलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे हा याचा अर्थ आहे. म्हणजे आपण जर असे म्हणाल की माओ-त्से-तुंगची हुकूमशाही चीनमध्ये आहे म्हणून हे सगळे घडले तर ते बरोबर नाही. कारण नियोजनासाठी आर्थिक धोरण बिनचूक असे पाहिजे तसे ते आर्थिक धोरण एका विशिष्ट शिस्तीने निरपवाद रीतीने अंमलात आणण्याचा संकल्प केलेले सरकारही आवश्यक आहे. असा संकल्प ज्या सरकारपाशी नसेल ते सरकार आर्थिक नियोजन यशस्वी करु शकत नाही हे हिदुस्थानच्या आजच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतले पाहिजे. आज चीनमध्ये टेलिफोनसारखी गोष्ट खाजगी नाही टेलिफोन एकतर सरकारी आहे. किंवा सार्वजनिक आहे. खाजगी वापरण्यासाठी चीनमध्ये टेलिफोन नाही. मोटारगाड्या सरकारी आहेत. खाजगी मोटारगाड्या चीनमध्ये नाहीत. चीनमध्ये जास्तीतजास्त खाजगी वाहन जे आहे ते म्हणजे सायकली आहेत. मोटारगाड्या खाजगी मालकीच्या कोणाच्या नाहीत. चीनमध्ये मंत्र्यांपासून तो सामान्य शिपायांपर्यंत एक विशिष्ट प्रकारचा कपडालत्ता हाच वापरला पाहिजे या नियमाची निरपवाद रीतीने अंमलबजावणी होत आहे. याला कोणीही अपवाद नाही. याला नागरी जीवन अपवाद नाही. याला कोणीही अपवाद नाही चौ-एन-लायचा अपवाद नाही. म्हणून चीनमध्ये नियोजनाचे जास्तीत जास्त उपक्रम करीत असताना आपल्या मनुष्यशक्तीचा जास्तीतजास्त वापर करण्याचे जे उद्दिष्ट डोळ्यापुडे ठेवले त्यातून चीनचा एक भांडवल संचयाचा नवा आधार मिळाला. आज हिंदुस्थानमध्ये बेकारीची चर्चा आपणकरतो. सुशिक्षित बेकार, अशिक्षित बेकार, अर्धबेकार, पूर्णबेकार विविध प्रकारच्या त्यांच्या कॅटीगरीज करुन त्यांचे समूह करून आपण एका कामाचा विचार करतो आहोत. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की लक्षावधी लोक काहीही काम करु शकत नाहीत. अशामुळे किती जबरदस्त प्रमाणात देशाचे मूळ भांडवल आपण पाण्यामध्ये टाकल्यासारखे करीत आहोत. श्रम करण्यास माणूस तयार असून, श्रमातून निर्मिती ही स्वाभाविक गोष्ट असून त्या निर्मितीला इथे वाव नाही. अशाप्रकारे आज परिस्थितीचा बनाव बनलेला आहे. आज जे नियोजन आपण करीत आहोत त्या नियोजनामधून या मनुष्यशक्तीचा वापर ही दुय्यम गोष्ट झाली आहे. हिंदुस्थानामध्ये काँम्प्युटर बसवून हजार कारकुनांचे काम एका यंत्रामार्फत किंवा तीन हजार कारकुनाचे काम एका यंत्रामार्फत करणे यात आपण गैर काही मानत नाही ! कारण आपण असे समजतो आहोत की कार्यक्षमता याचा अर्थ अत्याधुनिक यंत्र आणणे आणि कार्य करणे.