व्याख्यानमाला१९७३-२२

विलायतेतून उच्च विद्या शिकून आलेले लोकही त्याच्या आहारी जातात. कारण आपण विज्ञानाचा वापर करीत असलो, तरी ख-या अर्थाने विज्ञाननिष्ठा आपण पत्करलेली नाही.

भारतात सत्तासंघर्षाच्या राजकारणातून जातिवादाची उत्पत्ती झाली हे आपण पाहिले. या मागे तिसरीही एक शक्ति होती. हिंदू मुसलमान हे दोनच समाज भारतात असते, तर लढून लढून का होईना, पण कुठे तरी त्यांचा आपसात समझोता झाला असता. मुसलमानी आमदानीत येथे अनेक राज्ये होती. बहानी राजाच्या पदरी अनेक मोठेमोठे हिंदू सरदार होते. विजयनगरच्या हिंदू राजाच्या वतीने अनेक मुसलमान सैनिक निष्ठेने लढले. त्याना कुर्निसात करायला संकोच वाटू नये म्हणून त्या राज्यात सिंहासनासमोर कुराणाची प्रत ठेवलेली असे, याचा अर्थ आजच्या कांही मुसलमानांमध्ये पाकिस्ताननिष्ठा असणारच नाही असा नव्हे. अशी राष्ट्रद्रोही वृत्ती जेथे दिसेल तेथे सरकारने कडक धोरण स्वीकारले पाहिजे हे् निर्विवाद. पण पाचपन्नास माथेफिरू लोकांसाठी सगळ्या समाजाला राष्ट्रद्रोही समाजणे योग्य नाही. धर्माचा व राष्ट्रनिष्ठेचा काही संबंध नाहीं, आधुनिक काळात धर्म हा राष्ट्राचे अधिष्ठान होऊ शकत नाही असे गांधी व नेहरू म्हणत असत. आपल्यांपैकी पुष्कळांना त्याकाळी ते पटलेनाही. पण पाकिस्तानने आपल्याला दाखवून दिले आहे की एकाच धर्माचे लोकही एकमेकांवर अनान्वित अत्याचार करू शकतात. मुसलमानानीच बंगला देशात मुसलमानांवर जुलूम केला. म्हणून पाकिस्तानची दोन शकले झाली. आज टागोरांची एक कविता बंगला देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेली आहे. बंगाली भाषा तेथे राष्ट्रभाषा झालेली आहे तेव्हा मुसलमान हे कधीही आपल्या राष्ट्राशी एकरूप होणार नाहीत असे म्हणण्यात काही अर्थ नाही. कोणत्याही समाजात देशाला विघातक अशा ज्या काही प्रवृत्ती असतील, मग त्या हिंदूत असोत की मुसलमानांत त्या ठेचून काढाव्याच लागतील. पण इतिहासातील पूर्वग्रह उगाळीत बसून आपण आजचे प्रश्न बिकट करू नयेत. आजचा जातिवाद हा इंग्रजांच्या भेदनीतीचा परिपाक आहे. स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्यांनी मुसलमानांना हिंदूहून वेगळे काढले. त्याच हेतूने १९१९ साली त्यानी मराठ्याना राखीव जागा दिल्या. पुढे १९३२ झाली अस्पृशांना विभक्त मतदारसंघ देऊन हिंदूमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव होता. पण गांधीजीनी प्राणांतिक उपोषणाचा मार्ग अवलंबून ते संकट टाळले.

भारतीय समाजाची अस्मिका आतापावेतो धर्माशी निगडित होती ह आपण पाहिले. गांधी धार्मिक वृत्तीचे असले, तरी त्यांची धर्मकल्पना उदात्त व व्यापक होती. मानवी मनातील नैतिक प्रेरणेला त्याचे आवाहन होते. पण त्यांच्या धर्मकल्पनांचा वेगळाच अर्थ लावला. येथील सामान्य लोकांचा धर्म ईश्वराशी निगडित नसून मशीद व देवळे यांच्याशी निगडित होता. ही धर्माची मु्त स्वरूपे आमचे मानबिंदू मानली गेली. त्यामधून भांडणांना ऊत आला. गांधीजी सांगत होते की स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नुसत्या लाढाऊ कार्यक्रमाने भागणार नाही. खेड्यापाड्यांत जाऊन तुम्हाला नव्या जाणिवा निर्माण कराव्या लागतील. पण या रचनात्मक कार्याकडे लक्ष दिले नाही. राजकीय कार्यकर्त्यापैकी पुष्कळांचे लक्ष संसदीय राजकारणावर केद्रित झाले होते. विधायक कार्याची त्यांनी कुचेष्टाच केली. गांधीजींचा शब्द प्रमाण मानून जे वेडेपीर खेड्यांत जाऊन बसले, त्यानी मध्ययुगीन कल्पनाकोशातून पूर्णपणे बाहेर पडता आले नाही. समाजवाद्यांपाशी आधुनिक शास्त्रशुध्द तत्त्वज्ञान होते. पण आपल्या पूर्वपरं परेतील पीळ व पेच त्यांना बरोबर उमगले नाहीत. आर्थिक क्रांती झाली की सर्व प्रश्न आपोआप सुटतील अशी त्यांनी स्वत:ची समजूत करून घेतली. कामगारांच्या मनावर नव्या मूल्यांचे संस्कार घडवून आणण्यासाठी त्यांनी पुरेशी धडपड केली नाही. म्हणून कामगार संघटनाच्या मार्फत समाजवादी विचारांचा खेड्यापाड्यांत प्रसार होण्याऐवजी जातीयवादाचाच कामगार संघटनावर प्रभाव पडला. स्वासंत्र्यानंतर तर सारे पक्ष केवळ सत्तेच्या राजकारणात गुंतून पडले. सामाजिक प्रश्नांची चर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठही उरले नाही. कामगारसंघटना केवळ दैनंदिन आर्थिक प्रश्न धसाला लावतात. पण त्यांच्या कार्यामधून क्रांतीची पूर्वतयारी होत नाही. पुढा-यांना वाटते आपण लोकांना आपल्या उद्दिष्टासाठीं राबवू पण लोकही कीही कमी चलाख नसतात. संपकाळात ते समाजवादी पुढा-यांचे नेतृत्व मान्य करतात. पण निवडणुकांत त्यांना मते देत नाहींत.