अभिनंदन ग्रंथ - (इंग्रजी लेख)-5

संदेश

I AM GLAD to know that you will celebrate the 48th birthday of Shri Yeshwantrao Chavan on the 12th March. He has done exceedingly well both as the Chief Minister of the former Bombay State and of the present Maharashtra. His acces­sibility and friendly spirit have contributed to the success of the present Maharashtra.

Wish your function success.

S. RADHAKRISHNAN,
Vice-President,
India.
---------------------------------------------------------------

श्री यशवंतराव चव्हाण यांच्या ४७ व्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वाद देत आहे.

धो. के. कर्वे.
---------------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचा ४७ वा वाढदिवस दिनांक १२ मार्च रोजीं नागपूर येथें साजरा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या समितीचें मी मन:पूर्वक अभिनंदन करतों. राज्यपुनर्रचनेनंतर प्रथम व्दिभाषिक मुंबई प्रांताची व त्यांतून परिणत होणा-या महाराष्ट्र राज्याची धुरा जबाबदारीने व यशस्वी रातीने वाहून त्यांनी या चार वर्षांत स्वत:च्या विविध गुणांचा जो परिचय लोकांना करून दिला आहे त्याने, प्रसंगानेच माणसांची पारख होते, या उक्तीची सत्यता सिद्ध केली आहे. राज्यकारभाराला आधारभूत असणारी तत्त्वें व लागणारा व्यवहार यांना कोणत्याहि प्रकारची बाधा न येऊं देतां शक्य तितक्या लोकांची मनें मिळवणें हें प्रशासकाच्या उत्कृष्टपणाचे गमक आहे. ह्या गमकाने पाहिल्यास श्री. यशवंतरावजींनी ह्या बाबतींत भरघोस यश मिळविलें आहे.

स्वर्थत्याग, कष्ट करण्याचें सामर्थ्य आणि बुद्धिबळ या तिन्ही गुणांच्या बाबतींत महाराष्ट्राची परंपरा थोर आहे, आणि या तीन गुणांना एकीची जोड मिळाली म्हणजे महाराष्ट्र राज्य भरभराटीच्या मार्गावर अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाहीं. श्री यशवंतरावजींचे नेतृत्व या बाबतींत संपूर्णपणें यशस्वी होऊन महाराष्ट्राचें कीर्तीमंदिर डौलाने उभे करण्याचें श्रेय संपादेल यांत मला संशय वाटत नाही. परमेश्वर श्री. यशवंतराव चव्हाण यांना दीर्घायुरारोग्य व देशाची सेवा करण्याचा अधिकाधिक अवसर देवो हीच प्रार्थना.

द वि पाटसकर
राज्यपाल, मध्यप्रदेश
---------------------------------------------------------------

IN CHAVAN COUNTRY has a distinguished and capable administrator and I pray on the occasion of his 48th birthday for his long life, prosperity and glorious career of public service to mother land.

M.S. ANEY
---------------------------------------------------------------

आपण सर्व मित्रमंडळी माननीय श्री. यशवंतरा चव्हाण यांचा ४८ वा वाढदिवस साजरा करण्याची योजना केली आहे हें वाचून फार आनंद वाटला. त्यानिमित्त आपण प्रसिद्ध करण्यांस घेतलेला अभिनंदन ग्रंथ त्यांच्या जीवनाच्या निरनिराळ्या पेलूंचें दिग्दर्शक करून सर्वसामान्य सार्वजनिक जीवनाला आवश्यक असलेल्या ज्ञानानेहि समृद्ध ठरेल असा विश्वास बाळगतो.

मान्यवर श्री यशवंतरावांना यापुढे अधिकाधिक दायित्वाची राष्ट्र कर्तव्ये स्वीकारावी लागतील अशी माझी अटकळ आहे. तशी त्यांची योग्यताहि प्रगट झालेली आहे. त्यांचे ठिकाणीं असलेले अनेक गुण उत्तरोत्तर अधिक परिणामकारक रुपाने व्यक्त होवोत व श्री छत्रपति शिवरायांपासून जी अखिल भारतीय व्यापक दृष्टि आपल्या महाराष्ट्राच्या लोक नेत्यांनी बाळगली व प्रत्यक्ष आचस्ली आहे तिचा परमोत्कर्ष त्यांच्या जीवनांत पहावयास मिळो एतदर्थ श्री प्रभुचरणीं प्रार्थना करीत आहे. त्या द्याघनाच्या कृपेंनें त्यांना उदंड आयुरारोग्य लाभून राष्ट्राला हा सुयोग्य  कार्यकर्तां सुदीर्घ काळ लाभो.

आपल्या ग्रंथास सुयश प्राप्त व्हावें म्हणून श्री परमेश्वराचा आशीर्वाद मागून हें पत्र पूर्ण करतों.

मा. स. गोळवलकर
सरसंचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ