• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -क्षात्रधर्म हाच राष्ट्रधर्म-2

१. चिलखत न घातलेल्या व शिरस्त्राण नसलेल्या शत्रूवर प्रहार करू नये.
२. शत्रू धर्मयुद्धाचे नियम पाळीत असेल तर आपणहि ते पाळावेत.
३. शरण आलेल्या भयग्रस्त शत्रूवर प्रहार करूं नये.
४. वृद्ध, बाल व स्त्रिया यांच्यावर प्रहार करूं नये.
५. युद्धांत भाग न घेणा-या लोकांवर प्रहार करू नये.

हे नियम नुसते तत्वविमर्शाच्या ग्रंथांत उल्लेखिलेले आदर्श नसून ते प्रत्यक्ष व्यवहारांत असल्याचा पुरावा उपलब्ध आहे.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकांत या देशांत चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेंत असलेला ग्रीक वकील मेगॉस्थेनिस यासंबंधांत जें लिहितो तें मनन करण्यासारखें आहे. मेगॉस्थेनिस हा भारतीय राष्ट्राचा मित्र नसून शत्रु होता ही गोष्ट ध्यानांत घेतली तर त्याच्या या साक्षीचें महत्त्व विशेषच ध्यानांत भरतें. मेगॉस्थनिस म्हणतो,

"Whereas among other nations it is usual in the contests of war to ravage the soil and thus reduce it to an uncultivated waste; among the Indians, on the contrary, by whom husbandmen, are regarded as a class that is sacred and invariable, the tillers of the soil, even when the battle is reging in their neighbourhookl, are undisturbed by any sense of danger, for the combatants on either side in waging the conflict make carnage of each other, but allow those engaged in husbandry to remain quite unmoleste. Besides, they neither ravage in enemy's land with fire, nor cut down its trees; nor would an enemy coming upon a husbandman at work on land do him harm, for men of this class, being regarded  as public benefactors, are protected from all injury."

( इतर राष्ट्रांमध्ये ही सर्वसामान्य गोष्ट आहे की, युद्ध चालू असतांना सारा प्रदेश पिकाला पूर्ण निरुपयोगी होईल इतकी त्याची नासाडी करण्यांत येते. पण हिंदुस्थानांत याच्या नेमका उलटा प्रकार दृष्टीस पडतो. जमिनीटी लागवड करणारे शेतकरी येथें अत्यंत पवित्र समजण्यांत येतात. इतके कीं, प्रत्यक्ष शेजारी युद्ध चालू असतांहि सर्व प्रकारच्या भीतूपासून ते मुक्त असतात. उमय बाजूंचे योद्धे परस्परांशी युद्ध करीत असतांनाहि जे आपल्या व्यवसायांत निमग्न असतात त्या शेतक-यंना ते मुळीच उपद्रव देत नाहींत, इतकेंच नव्हे, तर तेथे शत्रूवर विजय मिळविल्यावरहि विजेता आपल्या शत्रूच्या प्रदेशांना कधी आग लावून बेचिराख करीत नाही. अथवा त्याच्या उद्यान व वनस्पति संपत्तीचा कधीं नाश करीत नाहीं. कारम कीं, ही वर्ग समाजभरणाचें काम करणारा असल्याची जाणीव ठेवून त्याला सर्व प्रकारचें संरक्षण देण्यांत येतें. )

पराक्रम व पशुत्व यांची आजवर कोणीहि फारकत करूं शकला नाही. आज तर या दोन गोष्टी अधिकच एकात्म झाल्या आहेत. भारतानें क्षात्रवर्णाच्या द्वारे ही गोष्ट साध्य करून दाखविली हें त्याचें ऐतिहासिक वैशिष्टय होय.

पण विषमतापूर्ण जगांत शत्रू जर पशुतेच्य पराकोटीला पोहोचलेला असला व त्यांतून आपल्या राष्ट्राच्याच जीवनमरणाचा प्रश्न उत्पन्न होत असला तर मात्र या नीतीचा परित्याग करून स्वत:च्या राष्ट्राला अजेय राखणें हाच धर्म ठरतो. जी. जी गोष्ट राष्ट्रनाशक व आत्मनाशक असते ती ती अधर्म्य व त्याज्यच होय असें पूर्णावतार श्रीकृष्ण, शुक्र, बृहस्पति व कैटिल्य या भारतीय राजनितिशास्त्रविशारदांचे म्हणणें आहे. दूध पाजणें हें योग्य असलें तरी सापाला तें पाजावें काय ? कौटिलीय अर्थशास्त्रांत या प्रसंगीचा धर्म सांगतांना कौटिलीय म्हणतो, "चातुर्वर्ण्यरक्षार्थ औपनिषदिकमधमेंषु प्रयुत्जीत ।" ज्या वेळी चातुर्वर्ण्यात्मक समाजरचनेचें म्हणजेच भारतीय राष्ट्रच्या राष्ट्र आसुरी पद्धतीने आक्रमण करणा-या लोकांच्या भक्षस्थानी पडण्याचा प्रसंग येतो त्या वेळीं ज्या मार्गानें शत्रूचा विनाश होऊन आपलें संरक्षण होईल त्या सर्व मार्गाचा अवलंब हाच धर्म होय. आपण उदात्त असावें, पण बावळट नसावें असा कौटिल्याचा अभिप्राय आहे. पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या रणनीतीचें वर्णन करतांना शिवदिग्विजयांत म्हटलें आहे, " हल्ली कलियुगधर्म चित्त्याचें युद्ध महाराष्ट्रधर्मी युक्त योजना केली."