समर्पणाची शक्ती
लहाणपणी मी कराडला संगमावर असे. कोठून तरी येणारे आणि कोठेतरी जाणारे ते ‘जीवन’ मी रोज पाहत असे. कोणासाठी तरी ते धावत होते. त्यात खंड नव्हता. ‘जीवना’ला एक लय होती; पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही. ते जीवन नित्य नवीन होते. त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.
जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते कधीच जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही. सूर्याला म्हातारपण नाही. र्द्या कधी संकोचत नाही. यांतील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे; पण अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा खधी कायापालट नाही. स्थित्यंतर नाही. ते नि:श्वसन अखंड आहे.