• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंत चिंतनिका ३८

लोकसत्ता व व्यक्तिस्वातंत्र्य

लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता, असा शब्दश: अर्थ असला, तरी लोकसत्तेचा खरा अर्थ व्यक्तिमात्राची स्वत:वरील पूर्ण सत्ता, प्रत्येक व्यक्तीचे स्वत:पुरते संपू्र्ण स्वातंत्र्य, असाच करावयास पाहिजे. अनेकांची एकावरील सत्ता म्हणजे लोकलत्ता नव्हे. भारतीय लोकराज्यात, येथील लोकशाहीत, प्रत्येक व्यक्ती हीच श्रेष्ठ सत्तेचे केंद्र, संपूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार बिंदू राहील, असेच अभिप्रेत आहे.लोकशाही म्हणजे समूहशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य रसातळाला नेणारी कंपूशाही नव्हे, याची जाण ठेवावीच लागते. तशी ती ठेवली पाहिजे. समूहशाहीचा, कंपूशाहीची अहंकार आपल्या जीवनात निर्माण होऊ नये यासाठी लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीने सावध राहिले पाहिजे. सावधानता राखलीच पाहिजे. आणि हे शक्य आहे. लोकशाही किंवा सामुदायिक सत्ता याचा अर्थ अनेकनिष्ठ एकात्मता, असाच मी तरी करतो.