• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २४

चव्हाण लिहितात:- ‘टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा जबरदस्त परिणाम भावनांवर झाला आणि जाती-जमातींचे जे प्रश्न आहेत; त्यांच्या बाहेर राहून काही राष्ट्रीय स्वरूपाचे असे जे प्रश्न आहेत, त्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला’ (पृ. ३५).

जाती-जमातींचे प्रश्न किंवा स्वसमाजाचा उद्धार व उन्नती ह्या संकुचित क्षेत्रांपेक्षा सर्व देशाच्या प्रश्नाकडे यशवंतराव वळले; हे खरे व आमरण ही व्यापक दृष्टी त्यांनी जोपासली. ही निवडलेली अखिल भारतीय दृष्टी हा चव्हाणांच्या जीवनाचा पुढील पाया ठरला. ह्यावरच पुढील भव्य इमारत उभी राहिली. यामुळे ते शेवटपर्यंत काँग्रेसवादीच होते.

‘टिळक-फुले’

यांच्या संबंधाने यशवंतरावांनी लिहिले आहे की:- “ह्या दोघांच्या विचारामध्ये मला कोठे साम्य दिसले नाही. यामुळे थोडी खंत होती; पण शेवटी ही दोन्ही मोठी माणसे आहे.... दोघांनी सांगितलेले विचार हे महत्त्वाचे आहेत. स्वराज्याचा विस्तार टिळकांनी सांगितला आणि गरिबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे हा विचार महत्वाचे म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीने मोठीच आहेत,” या निर्णयाला यशवंतराव विद्यार्थी वयातच असताना आले (पृ. ३५). जीवनाच्या शेवटी म्हणजे प्रौढावस्थेतच फुले व टिळक यांच्यासंबंधी यशवंतरावांना मागे काय वाटले ते सांगितले आहे. पण म. फुले यांचे शेतकरी लोकासंबंधीचे विचार अनुभवाने योग्य व जरूरीचे वाटले. म. फुले यांच्याकडे त्यांना पुढील जीवनातही पाठ करता आली नाही. आत्मचरित्रात पुढे उल्लेख येणे अनुभवाने अटळ झाले.

चव्हाणांनी शिक्षण पुरे केले

सार्वजनिक कार्यात विद्यार्थीदशेतच भाग घेत असतानाही त्यांनी जिद्दीने शिक्षण पुरे केले. बी. ए. झाले व पुढे वकिलीची देखील परीक्षा पास झाले. वडिल बळवंतराव सातव्या वर्षीच वारले. बंधु गणपतराव यांच्यामुळे त्यांचे शिक्षण पुरे झाले. श्रद्धापूर्वक या भावाचे वर्णन त्यांनी केले आहे (पृ. २९५). स्वत: मान-ठाण न घेता सत्याग्रही वीर म्हणून त्यांनी त्यावेळी देखील स्वराज्यार्थ तिरंगी झेंडा खांद्यावर घेतला. तो अखेरपर्यंत त्यांच्याभोवती राहिला. काँग्रेसवरील त्यांची श्रद्धा अंतर्गत मतभेदांना वारंवार तोंड देत देत शेवटपर्यंत अचल राहिली.

शिक्षण घेतले पाहिजे हा जो मुद्दा यशवंतरावांनी फुले प्रवाहातून घेतला तो जिद्दीने पुरा केला व ते विद्वतमान्यही झाले. विद्वान व प्रज्ञावंताकडून वाहवा मिळणे व मिळवणे दुर्घट होते. पण या वर्गाची इतरांशी विरोध ओढवून न घेता त्यांचेही नेतृत्व केले; व महाराष्ट्र एकसंघ केला.

चव्हाणांच्या ठायी जातियता व जातिभेद अगदी लहानपणापासून नव्हते. काबाडकष्ट करणा-या “अशा स्तरातील व परिसरातील मुला-माणसांबद्दल एक प्रकारचे कौतुक व जिव्हाळा आहे. मग ती कोणत्याही जातीची का असेनात” (पृ. १५). ही सर्वसंग्राहकता व जातिभेदातील दृष्टी त्यांनी सर्वत्र व सतत जोपासली. ह्या सामाजिक व्यापकतेतच त्यांचे यश सामावले होते.