• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-यशवंत हो ... !

यशवंत हो ... !

यशवंताचे वडील बळवंतराव कोर्टात बेलिफ होते. विटा येथील कोर्टात काही काळ नोकरी केल्यावर त्यांची कराडला बदली झाली. पुढे काही दिवसांनी कराडमध्ये प्लेगची साथ आली. सुरक्षिततेसाठी बळवंतरावांनी विठामातेला व मुलांना देवराष्ट्र येथे हलवले. पण दुर्दैवाने त्यांना स्वत:लाच प्लेगने गाठले. घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबावर आकाश कोसळले. लहानग्यांचा सांभाळ कसा करायचा या चिंतेने विठामाता अस्वस्थ झाल्या. कोणीतरी त्यांना सुचवले की जिल्हा न्यायाधीश दयाळू आहेत, तुम्ही त्यांना भेटलात तर ते तुमच्या मुलाला ; ज्ञानदेवाला- बळवंतरावांच्या जागी बेलिफाची नोकरी देतील. त्याप्रमाणे लहानग्या यशवंताला घेऊन विठामाता साता-याला जिल्हा न्यायाधीशांना ( डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ) भेटायला गेल्या. सोबत कराडचे तालुका न्यायाधीशही होते. त्यांनी चव्हाण कुटुंबियांची हकीकत जिल्हा न्यायाधीशांच्या कानावर घातली. त्यांनी काही प्रश्न विचारले. मग ते विठामातेला म्हणाले, ' तुम्ही काळजी करू नका. लवकरच मी तुमच्या मुलाची ऑर्डर काढतो.' त्यावेळी लहानगा यशवंता आईचे बोट पकडून तिला बिलगून उभा होता. मॅजिस्टेटने तालुका न्यायाधीशाला विचारले, ' या लहानग्याचे नाव काय ?'

' यशवंत .'

' त्याचा इंग्रजीत काय अर्थ होईल ?'

' Victorious '

मग यशवंताकडे पाहून ते म्हणाले , Be Victory to you, oh lad ! ( यशवंत हो बाळा  ! ) '
त्या कनवाळू ब्रिटिश न्यायाधीशांनी दिलेला आशीर्वाद पुढे तंतोतंत खरा ठरला. यशवंता, ' यशवंत आणि कीर्तिवंत ' झाला.