महाराष्ट्रातील दुष्काळ - ५६

प्रस्ताविक

संस्कृतमध्ये पाण्याला जीवन म्हटले आहे.  याचा अर्थ व्यक्ती आणि समाज यांचा विकास सर्व अंगाने समृद्धीकडे नेणारी सर्वात मोठी पूरक शक्ती म्हणजे जलसंपत्ती आहे.  ह्या जलसंपत्तीचे नियोजन सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक दृष्टीने करावे हे फारच मार्मिकतेने संत तुकारामांनी आपणाला सांगून ठेवले आहे.  

बळ, बुद्धि, वेचुनिया शक्ती ।  उदक चालवावे युक्ती ॥
न चळण तया अंगी ।  धावे लावणामागे वेगी ॥
पाट, भोट, कळा ।  भरीत पखाला सागळा ॥
बोजा, त्यासी द्यावे ।  तुका म्हणे तैसे व्हावे ॥

- संत तुकाराम

हाच मंत्र विनोबाजीनी एका व्याख्येत सांगितला आहे.
प्रकृती - विकृती - संस्कृती

१.  भूक लागेपर्यंत खाणे म्हणजे प्रकृती.
२.  भूक लागली तरी अजीर्ण होत पर्यंत खाणे आणि दुसर्‍याला खाऊ देणे म्हणजे विकृती.
३.  आपली भूक राखून दुसर्‍यांची भूक भागेल याची काळजी घेणे म्हणजे संस्कृती.

संत तुकाराम आणि संत विनोबाजींचा मी एक भक्त असल्यामुळे काही बोबड्या शब्दात हा विचार मी मांडत आहे.

पाणीलोट क्षेत्राचा करु या विकास.
पाणी साठवूनी वाट या समान
बीज रुजवूनी सजवू या निसर्ग
दुष्काळाचा करु या सुकाळची सर्वत्र

- पाणी बाबा मठ