महाराष्ट्रातील दुष्काळ -२०२

जमिनीची धूप - समुद्रामुळे किंवा नदीमुळे

१७   आवश्यक व परिणामकारक रीतीने खर्च करून समुद्र किनार्‍यावरील जमीन वाहून जाण्याची प्रक्रिया किंवा नदीच्या प्रवाहामुळे किनार्‍यावरील जमीन वाहून जाण्याची (धूप) प्रक्रिया कशी थोपवता येईल ह्याचा विचार करण्याची गरज आहे.  ह्या संदर्भात, राज्यस्तरावर व केंद्र पातळीवर ही खबरदारी अवश्य घेण्यात यावी की सागरी किनारपट्टीवर बेलगाम जमीन वापराच्या प्रकारांना आळा घालावा आणि अशा ठिकाणच्या अर्थोत्पादक केंद्रांचे नियमन करावे.

दुष्काळाचे - व्यवस्थापन

१८.१  दुष्काळी छायेखाली नियमितपणे सापडणार्‍या प्रदेशांसाठी, दुष्काळाच्या सावटातून बाहेर खेचणारे विविध कार्यक्रम आखावे.  त्यासाठी जमिनीत ओलाव्याचे संवर्धन तसेच पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणार्‍या व्यथा थांबवण्याचे प्रयत्‍न, भूगर्भातील पाणी साठ्याचा शोध व विनियोग करणे, आणि जेथे शक्य असेल तेथे अतिवृष्टी होणार्‍या प्रदेशातील व्यर्थ जाणारे पाणी जुळले त्या मार्गांनी अवर्षणग्रस्त भागात वाहावून नेण्याचा विचार अमलात आणणे - ह्या मार्गांचा अवलंब करावा.  गवताळ कुरणांचे आच्छादन तयार करणे, जंगले वाढवण्याचा प्रयत्‍न करणे आणि अशासारखे अन्य मार्ग, ह्यांना प्रोत्साहन द्यावे.  कारण ह्यांच्यासाठी अधिक पाणी लागत नाही.  म्हणून पाणीविषयक विकास योजनेची आखणी करताना अवर्षण ग्रस्त दुष्काळी भागांच्या गरजांना प्राधान्य देण्यात यावे.

१८.२   अवर्षण ग्रस्त दुष्काळी भागामधील जनतेला रोजगार उपलब्ध करून देताना, त्यांच्या रोजगाराचे ध्येय दुष्काळ जेणे करून हटवला जाईल असे असेल याची दक्षता घ्यावी.

विज्ञान व तंत्रज्ञान

१९   पाण्याच्या परिणामकारक आणि आर्थिक दृष्ट्या कमी खर्चात व्यवस्थापनासाठी ज्ञानाच्या चौफेर वाटणार्‍या कक्षांचे अवधान ठेवावे ह्या हेतूने पाण्याशी संबंधित संशोधनाचे तीव्र प्रयत्‍न विविध दिशांनी होणे आवश्यक आहे.  उदाहरणार्थ  :-

- जलखनिजशास्त्र
- जल-साधन संपत्तीचे मूल्यांकन
- बर्फ व तळी यांचे जलशास्त्र
- भूगर्भाचे जलशास्त्र व पुनर्वापर
- चोपणतेचे आक्रमण नियंत्रण
- जल-हंगाम
- बाष्पीभवन व पाझरण्यातून होणारा पाण्याचा व्यय
- काटकसरीचे जलसंपत्तीच्या योजना
- पिके व पीकपद्धती
- जलशयातील गाळ काढणे
- पाण्याशी संबंधित बांधकामाचे आयुष्य व सुरक्षितता
- नदीतील प्राणी व वनस्पतीचा अभ्यास तसेच उर्जा निर्मितीकरता पाण्याचा वापर
- मातीबाबत संशोधन
- पाणी व्यवस्थापनाचे प्रगततंत्र व वापरतंत्रातील सुधारणा
- पुनर्वापर चक्रानुगती
- समुद्रातील जलसंपत्तीचा उपयोग

२० प्रशिक्षण

एक प्रमाण शिक्षणाचा सर्वदर्शी अभ्यासक्रम हा जलसाधनसंपत्ती संवर्धनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख भाग असावयास हवा, त्यामध्ये माहिती व्यवस्थेचे प्रशिक्षण, विभागशः नियोजन, योजना बनविण्याचे व नियोजनाचे तंत्र, योजना व्यवस्थापन, योजनांची कार्यवाही ह्यांचा समावेश असावा.  हे प्रशिक्षण वरील उपक्रमांत कार्यरत असणार्‍या सर्व व्यक्तींना तसेच शेतकर्‍यांनाही द्यावे.

२१   निष्कर्ष

मानवी व पशूंच्या जीवनातील पाण्याच्या अत्यंत महत्वामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या विकासाच्या व आर्थिक कार्यासाठी असलेली गरज तसेच पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता, ह्या साधन संपत्तीचे नियोजन, व्यवस्थापन तसेच जास्तीत जास्त व काटकसरीने आणि समान उपयोग करण्याला अत्यंत तातडीचे महत्त्व प्राप्‍त झालेले आहे.  राष्ट्रीय एकमत व जल धोरणाची प्रमाणभूत उद्दिष्टे ह्या तत्त्वांवरील निष्ठा ह्यावरच राष्ट्रीय पाणी-धोरणाचे यशापयश अवलंबून आहे.