• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ७९

भविष्यकालीन नियोजन  :

आज आपल्या देशात सर्वसाधारण पारंपारिक पद्धतीने मान्सून हंगामात पडलेले पाणी साठून ठेवण्यासाठी धरणे बांधण्यात पुरेसा पैसा उपलब्ध नाही.  तरी पण इ.स. २०१० अथवा २०२० पर्यंत पारंपारिक पद्धतीने हाती घेतलेले व भविष्यकालीन सर्व धरणांची कामे पूर्ण होतील.  त्यापुढे मात्र पारंपारिक पद्धतीचा विचार सोडून अपारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल.  ह्यात इंटर बेसीस ट्रांसफर ऑफ रीव्हर वॉटरचा प्रामुख्याने विचार करावा लागेल आणि या जोगे उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा, गंगा व महानदी यांचे अतिरिक्त पाणी दक्षिणेकडे आणण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहाणार नाही.  यासाठी लागणारा विद्युत पुरवठा देखील तोपर्यंत उपलब्ध करून घ्यावा लागेल.

अमेरिकेसारख्या देशात कॅलिफोर्निया प्रांतात उत्तरेकडे बर्फ वितळणार्‍या नद्यातून पाणी समुद्रात वाहून जाते.  म्हणून सॅनफ्रान्सिस्कोच्या उत्तरेस उपलब्ध असलेले विपुल पाणी, समुद्र सपाटी पासून जागोजागी उचलून चार इंच पाऊस असलेल्या दक्षिण कॅलिफोर्नियाकडे ५०० मैलाच्या १४०० क्यूसेक्स कालव्याद्वारे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केलेली आहे.  समुद्र सपाटीपासून निघालेला हा कालवा शेवटी ३५०० फूट उंचीवर उचलला जातो.  एकाच ठिकाणी ४००० क्यूसेक्स कालव्याचे पाणी १६०० फूट उचलून दुसर्‍या खोर्‍यात नेल्याचे आम्ही स्वतः डोळ्यांने पाहिले आहे.  म्हणजे ठाण्याच्या भागातील असलेले (कोकणातील) विपुल पाणी योग्य ठिकाणी साठवून ते उंच लोणावळ्या सारख्या उंचभागात आणल्यासारखा हा प्रकार आहे.  या सर्व गोष्टी भविष्य काळात भारतात कराव्या लागणार आहेत, व त्या निश्चित पूर्ण होतील यात शंका नाही; आणि हे केल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही.  या शिवाय इतर मार्गांचादेखील अवलंब करणे आवश्यक आहे.  उदा. स्प्रिंक्लर-ड्रीपद्वारे पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जंगलाचे संगोपन करून भूगर्भात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढविणे, नदीच्या पाण्यास प्रदूषणापासून संरक्षण देणे, सिंचनास वापरून वाहून गेलेल्या पाण्यास पुन्हा परत उचलून स्वच्छ करून त्या पाण्याचा पुन्हा सिंचनास वापर करणे, धरणाच्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करून पाणी कुशलता वाढविणे, नदीनाल्यातून वाहून जाणारे पाणी हे जमिनीवर फिरवून भूगर्भात हे पाणी साठवून ठेवणे इत्यादी सर्व प्रकार पुढील काळात अमलात आणावे लागणार आहेत.

सिंचनाचे महत्त्व :

या जगात लागवडीलायक क्षेत्राच्या १६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे.  मात्र हे १६ टक्के सिंचित क्षेत्र, जगाच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पन्न देत आहे.  इसराईलसारख्या देशाने सिंचनामुळे आपल्या देशाचे उत्पन्न ८ पटीने वाढविले आहे.  १९८० साली भारतात १२७ दशलक्ष हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते.  आणि या क्षेत्रापैकी ३७ दशलक्ष हेक्टर क्षेत्र म्हणजे २९ टक्के क्षेत्र सिंचनाखाली होते.  आज लागवडीलायक क्षेत्र १४२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून यापैकी ६८ दशलक्ष हेक्टर सिंचनाखाली आहे.  १९८० साली असलेल्या २९ टक्के सिंचित क्षेत्रापासून देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के उत्पन्न निघत होते.  पंजाब एकेकाळी अन्नधान्य निर्मितीच्या बाबतीत मागास असलेला प्रदेश होता.  तो आज ७५ टक्के सिंचनामुळे देशाच्या एकूण धान्य कोठारात ६० टक्के गहू, व ३० टक्के तांदूळ टाकू शकत आहे.  हे केवळ सिंचनामुळे साध्य होऊ शकले.  धान्योत्पादन वाढीसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.  परंतु इतर सर्व गोष्टी उपलब्ध असून पाणी उपलब्ध नसेल तर त्या सर्व सोई व्यर्थ आहेत.  म्हणून ''पाणी हे सर्व जीवन आहे'' असे वेदात म्हटले आहे.  पाण्याचे माहात्म्य ॠग्वेदीय काळापासून वर्णिले गेले असून ॠग्वेदात पावसापासून मिळणार्‍या पाण्याचा, नदीच्या प्रवाहातून उपलब्ध होणार्‍या पाण्याचा, भूगर्भातून खोदून उपलब्ध होणार्‍या पाण्याचा मानव कल्याणार्थ उपयोगात करावा असा उल्लेख केला आहे.  अथवा वेदात कूप, नल कूप, तलावातील जलासंबंधी उल्लेख केला आहे.  आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या सर्व कामांशी संलग्न असलेला कुशल अभियंता जो कालवे खोदतो, जल विकास करतो, नद्यावर नियंत्रण ठेऊन त्यातील पाण्याचे व्यवस्थापन करतो, जो तलाव बांधतो अशा सर्व अभियंत्यास ॠग्वेदात पूज्य मानले गेले आहे.