• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १५६

जमिनीला गवताचे व झाडांचे वाजवी प्रमाणात आच्छादन असण्याचा प्रश्नही तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे तितकाच महत्त्वाचा आहे.  गवताचे आच्छादन नाहीसे झाल्याने आफ्रिका खंडातील साहेल प्रदेशात (ह्यात आणखी इतर २२-२३ देशांचा समावेश आहे) भयंकर हाहाःकार झाला आहे.  ह्याची जाणकारांना आता कल्पना आली आहे.  भारतातही हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत गवताचे आच्छादन जवळजवळ नाहीसे झाल्यामुळे, केवळ जमिनीची धूप वाढली एवढेच नव्हे तर जमिनीत पाणी मुरवण्याच्या प्रक्रियेवर सुद्धा प्रतिकूल परिणाम झाला आहे.  भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, ह्या भारतीय केंद्रीय शेती संशोधन संस्थेने ह्यासंबंधी पुष्कळ संशोधन केले असून ते शेतकर्‍यांना मार्गदर्शक आहे.  गवताचे आच्छादन जमिनीला असले तर पडणार्‍या पावसापैकी ८५ टक्के पाणी हे भूगर्भात मुरते आणि १५ टक्के वाहून जाते.  याच्या उलट जमिनीला गवताचे आच्छादन नसले तर ८५ टक्के पाणी वाहून जाते.  हे वाहून जाणारे पाणी जमिनीची धूप होण्यासही कारणीभूत होते.  आणि जमिनीत फक्त १५ टक्के पाणी मुरते.  असा निष्कर्ष संशोधनाने सिद्ध केला आहे.  एकाच प्रकारची झाडे लावली की त्यामुळे गवत येण्याचे प्रमाण कमी होते.  त्यामुळेही पाणी मुरण्यावर आणि जमिनीची धूप होण्यावर किती प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो ह्यासंबंधी राज्य किंवा केंद्र पातळीवर संशोधन झाले असल्यास त्याची मला माहती नाही.  असे संशोधन झाले नसल्यास ते एक उपयोगी संशोधनकार्य होईल असे वाटते.  तथापि, वृक्षांच्या मुळ्यांच्या आधाराने जमिनीची धूप कमी होते आणि पाणी मुरण्यास मदत होते.

तथापि, श्री वरखडे ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अधिक बारकाईने छाननी करावी लागेल आणि त्यासाठी हा प्रश्न अखिल भारतीय कृषि अनुसंधात संस्थानाकडे संशोधनासाठी सुपूर्द करावा लागेल.

नदीच्या पात्रांना कोल्हापूर-पद्धतीचे बांधारे बांधून पाणी उपयोगासाठी अडविण्याचे सर्वत्र व्हायला पाहिजे.  खाणीमधून जे पाणी उपसले जाते ते दुसरीकडे साठवले गेले पाहिजे.  खाणींच्यामुळे पर्यावरणात जमिनीची धूप होण्यावर आणि भूगर्भातील साठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल.  कोकण, गडचिरोली व भंडारा वगैरे अधिक पाऊस पडणार्‍या प्रदेशांच्या दृष्टीनेसुद्धा वरील चर्चा आणि संदर्भ महत्वाचे आहेत.  ह्याबाबतही श्री वरखडे ह्यांनी सर्वांना संचित करणारी समस्या उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत.