• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १५०

प्रश्नोत्तरे  :  शेती, लोकसंख्या, पाणी-व्यवस्थापन

उत्तरे :  डॉ. अण्णासाहेब शिंदे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वचन पूर्ती
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'दुष्काळ आणि पाणी' ह्या परिसंवाद प्रसंगी अनेक जिज्ञासूंनी शेती. पाणी-पुरवठा, पाणी व्यवस्थापन, शेतीसुधारणा, ग्रामीण अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर लेखी प्रश्न विचारले होते.  श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनी त्या प्रतिनिधित प्रश्नांची उत्तरे परिसंवादोत्तर लेखी देऊ असे वचन दिले होते.  येथे दिलेली १७ उत्तरे म्हणजे त्या वचनाची पूर्ती होय.


बाबासाहेब कुपेकर

मु. पो. कुपे, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, प्रश्न :  एल-निनोसंबंधी काही माहती द्यावी.

उत्तर :  श्री कुपेकर ह्यांच्या जिज्ञासावृत्तीचे कौतुक केले पाहिजे.  त्यांनी हवामान व पर्यावरण विषयक एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे.  ह्याचे उत्तर अधिक खुलाशाने देत आहे.  हे उत्तर लिहिताना मी ह्याच विषयावर लिहिलेला एल-निनो ह्या लेखाचा काही भाग उध्दृत करतो.  कारण त्यामुळे अनेक प्रश्नांना आपोआपच उत्तरे मिळतील.

काही वर्षांपूर्वी ठिबक-पद्धती विषयक एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाहून भारताकडे परत येत असताना 'मान्सूनची-पर्जन्यवृष्टी' यासंबंधी एक लेख वाचण्यात आला.  हा लेख एका हवामान तज्ज्ञाने लिहिलेला होता.  त्या लेखाचा आशय असा होता की पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरील उष्णतामानात वाढ झाल्यामुळे भारतातील पर्जन्यवृष्टीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.  भारतात आणि महाराष्ट्राच्या काही भागात वारंवार दुष्काळ पडत असल्यामुळे मी कुतूहलाने हा लेख वाचला.  दुष्काळाबाबतचे अंदाज आणि हवामानासंबंधीचे दीर्घ मुदतीचे अंदाज करता आले तर मानवाचा कितीतरी फायदा होऊ शकेल असे मनाशी तर्कवितर्क मी करीत होतो.  हवामान खात्याचे अंदाज बव्हंशी बरोबर ठरत नाहीत, असे सर्वसामान्य नागरिक बोलत असतात.  त्यामुळे हवामान शास्त्रसंबंधीचे मानवी-ज्ञान अद्याप खूपच अपूर्ण आहे याची प्रकर्षाने जाणीव झाल्यावाचून राहत नाही.  भारतात परत आल्यानंतर श्री शंतनुराव किर्लोस्कर व चंद्रकांत किर्लोस्कर (त्यावेळी ते हयात होते) यांची भेट झाली.  त्यावर्षीही अहमदनगर जिल्ह्यासारख्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती.  या पार्श्वभूमीवर पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या उष्णतामानाचा आणि भारतातील मान्सूनचा परस्पर संबंध असल्याबद्दलचा, माझ्या वाचण्यात आलेल्या वरील माहितीचा, श्री किर्लोस्करांशी झालेल्या भेटप्रसंगी बातचीत करताना मी उल्लेख केला.  त्यानंतर श्रीरामपूरला परत आल्यानंतर सुमारे एक आठवड्याच्या आत मला मा. किर्लोस्करांनी स्वतःच्या ह्या विषयावरील फाईलमधील कात्रणाच्या प्रती त्यांनी माझ्या माहितीसाठी पाठवून दिल्या.  मा. किर्लोस्कर यांनी या विषयासंबंधीच्या कात्रणाची एक फाईल ठेवलेली असेल अशी कल्पनाही मला नव्हती.  अशा प्रकारच्या विषयातदेखील मा. किर्लोस्कर रस घेतात याचे मला विशेष कौतुक वाटले.  हा विषय तसा अगदीच नवीन असल्यामुळे हवामान तज्ज्ञाशिवाय इतर कुणी या विषयात लक्ष घालीत असेल असे वाटले नव्हते.  'एल-निनो' ही हवामानातील एक प्रक्रिया आहे.  ह्या प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील पर्जन्यवृष्टीमध्ये आश्चर्यकारक बदल घडताना दिसतात.  आता मात्र 'एल निनो' म्हणून संबोधल्या जाणार्‍या पॅसिफिक महासागरांतील या प्रक्रियेची पुष्कळच चर्चा होऊ लागली आहे.