• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १०३

१.  राष्ट्रीय दृष्टिकोनातून दुष्काळावर चौफेर उपाय शोधूया

शरद पवार
अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
उद्धाटन भाषण
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्‍याला दोन पैशांची खात्री जोपर्यंत आपण देऊ शकत नाही तोपर्यंत त्याचा शेतीवर विश्वास बसणार नाही.  अशा स्थितीत जे धाडसाने शेतीत पावले टाकत असतील त्यांच्या मागे शासनाने राहिले पाहिजे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतीवरील औद्योगिकता वाढवण्याची गरज आहे.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान स्थापना झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची निश्चिती करण्यासाठी निमंत्रित पहिल्याच बैठकीमध्ये, एक महत्त्वाची सूचना करण्यात आली.  ती अशी की कै. यशवंतरावजींनी महाराष्ट्र आणि देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी सातत्याने विविध वर्गांशी विचार-विनिमय करण्याची परंपरा रोवली आणि वाढवली.  वैचारिक समन्वयाचे धन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावे यासाठी त्यांनी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली.  यशवंतरावांचे स्मारक जर आपल्याला करायचे असेल तर त्या स्मारकामध्ये राज्यातल्या सगळ्या थरातील लोकांच्यासाठी जागा असेल, ह्याची ह्या व्यासपीठावरून खबरदारी घेतली जाईल.  राज्य व देश ह्यामधील महत्त्वाच्या प्रश्नांची मोकळेपणाने, आकस बाजूला ठेवून चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी.  तेच काम आपण आज या ठिकाणी करीत आहोत.

प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातील व देशातील काही तज्ज्ञांना बोलावून ह्या प्रश्नांचा विचार एका परिसंवादाद्वारे करण्यात आला.  त्यावेळी राज्यातील पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, नागरीकरणाचा प्रश्न आणि त्यामुळे निर्माण झालेला झोपडपट्टीचा प्रश्न, ऊर्जेची गरज आणि महाराष्ट्रातील तरूण पिढीच्या बेरोजगारीचा प्रश्न असे चार-पाच प्रमुख प्रश्न प्रथम हातात घेतले.  ह्या विविध विषयातील उत्तमातील उत्तम जाणकार माणसांवर त्या त्या विषयांच्र प्रमुख म्हणून त्या बैठकीमध्येच जबाबदारी सुपूर्द केली.  त्यात श्री. अण्णासाहेब शिंदे, डॉ. होमी सेठना, भारतीय औद्योगिक विकास बँकेचे चेअरमन डॉ. नाडकर्णी आणि इतर होते.  अशा या सगळ्या प्रमुख मंडळींना एकत्रित बोलावून किमान दोन दिवस विचार विनिमय केला.  जाणकारांनी आपापल्या विषयावर निबंध, प्रबंध, टिपणे लेख इ. लिहिले.  या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात काही नवीन सूचना आणि नवीन दिशा समाजाच्यासमोर पुढे ठेवण्याचा प्रयत्‍न केला.

ह्या सर्व बाबींचा परिणाम निश्चितपणे चांगला झाला.  देशाचे प्रधानमंत्री मा. राजीव गांधी त्यावेळी परिसंवादात प्रत्यक्ष हजर होते.  त्यांनी त्यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले.  त्या नंतरच्या बैठकीत हा विचार केला गेला की आपण अत्यंत महत्त्वाच्या तज्ज्ञांना एकत्रित केले, जाणकारांचीही मतेही घेतली, तथापि जी धोरणे राबवायची त्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्र आघाडीवर राबवणार्‍या वर्गाची मतेसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजेत.  हे व्यासपीठ सगळ्यांना वापरता आले पाहिजे.  ह्या हेतूने ते दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते.  मला अतिशय आनंद वाटतो की, त्या चर्चासत्राला आपणापैकी अनेकांनी उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिला होता.