• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-९७

२७

सभापती श्री. सिलम यांच्या कार्याचा गौरव* (८ डिसेंबर १९६१)
----------------------------------------------

मा. श्री. सयाजीराव सिलम सभापती असताना त्यांनी केलेल्या कार्याबद्दलचा गौरव मा. चव्हाण यांनी सभागृहापुढे ठराव मांडून व्यक्त केला.
-----------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol. V, Part II, Nov-Dec. 1961, 8th December 1961, pp. 572 to 575.

Mr. Speaker, Sir, I beg to move the following resolution, viz. -
"This House do place on record its high appreciation of the valuable services of the Hon. Shri. S.L.Silam ५३ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा), as its Speaker for the last over ५ years, the zeal, ability and impartiality with which he had discharged the duties of his high office, and the judgment and firmness with which he has maintained its privileges and dignity while presiding over its deliberations through a critical period of great importance."

अध्यक्ष महाराज, हा ठराव आपल्यासंबंधी असल्यामुळे आपल्याला कदाचित अवघड वाटणे संभवनीय आहे, परंतु हा ठराव मांडत असताना मी या सभागृहाच्या आपल्याबद्दलच्या भावना बोलून दाखवितो आहे अशी माझी श्रध्दा आहे. अध्यक्ष महाराज, आपण या सभागृहाचे पाच वर्षे काम पाहिले, परंतु त्याही अगोदर तीन-चार महिने आपण या सभागृहाचे काम पाहिले आहे म्हणजे आपली कारकीर्द जवळजवळ सव्वापाच वर्षे होती. या पाच-सव्वापाच वर्षांच्या काळामध्ये आम्हाला आपल्यासंबंधी जो अनुभव आला त्यापासून आम्ही आपल्याबद्दल श्रध्दा व्यक्त केली नाही तर आम्ही औपचारिकता पाळली नाही असे होईल, इतकेच नव्हे तर आम्ही आपल्या कर्तव्याला चुकलो असेही होईल म्हणून हा ठराव या सभागृहापुढे मी मांडला आहे. अध्यक्ष महाराज, या सभागृहाची परंपरा फार थोर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि नंतर जी सभागृहे आपल्या देशात होती त्या सर्व सभागृहात मुंबईच्या सभागृहाला एक उच्च स्थान आहे. आणि या स्थानावर आपल्या पूर्वी काम केलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या उज्ज्वल परंपरा आपण जतन केल्या, एवढेच नव्हे तर स्वतःही तशा परंपरा निर्माण केल्या. अध्यक्ष महाराज, गेली पंधरा वर्षे आपण या विधानसभेचे सदस्य आहात.

या अवधीत या सभागृहात निरनिराळया जबाबदारीच्या जागांवर काम करताना आपणास पाहण्याची संधी मला मिळालेली आहे. या विधानसभेत पंधरा वर्षे काम केलेले आणखीही काही चेहरे मला या सभागृहात दिसत आहेत. विरोधी पक्षात माननीय सदस्य श्री.दत्ता देशमुख यांचा एक चेहरा मला दिसतो आहे. या बाजूलाही दोन-तीन चेहरे दिसत आहेत. अध्यक्ष महाराज, अध्यक्षस्थानावर बसून या सभागृहाचे नियमन करणे किती अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. गेल्या पाच वर्षांत सभागृहाबाहेर एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे एक प्रकारचे तंग वातावरण, धूसर वातावरण निर्माण झाले होते. बाहेरील जनेतच्या प्रातिनिधिक स्वरूपात या सभागृहाचे अस्तित्व असल्यामुळे बाहेरील तंग वातावरणाचे, धूसर वातावरणाचे प्रतिबिंब या सभागृहात पडून सभागृहाची एकूण मानसिक प्रक्रिया आंदोलित होणे अगदी स्वाभाविक होते. अशा तंग परिस्थितीत सभागृहातील सगळया विचाराच्या लोकांना आपापले विचार व्यक्त करण्याकरिता वाव देऊनही स्वतःबद्दलचा आदर त्यांच्या मनात कायम ठेवणे हे काम किती कठीण होते याची जाणीव या सभागृहातील सर्वांना वाटे. अध्यक्ष महाराज, आपण हे काम अत्यंत साक्षेपाने आणि कुशलतेने पार पाडले आणि या सभागृहाचे नाव राखले. आपली निवड या स्थानाकरिता करण्यात या सभागृहाने कोणत्याही प्रकारची चूक केली नसून ती एक अत्यंत योग्य आणि अभिमानास्पद अशीच निवड होती याचे सार्थ प्रत्यंतर यामुळे या सभागृहाला येत आहे. आपण हे काम कुशलतेने पार पाडू शकला यामागे आपला सार्वजनिक जीवनातील विविध क्षेत्रातला विपुल अनुभव उभा आहे असे मला वाटते. गेली चाळीस वर्षे आपण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रातून विविध पदांवर काम करीत आहात.