• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-९०

तो दूर करण्याकरिता काही पद्धत आपण स्वीकारली पाहिजे. पत्रके काढून व बोलून संशयात भर घालण्याने काय होणार आहे? संशयाचे वातावरण दूर करण्याकरिता सर्वमान्य अशी जी पद्धत आहे ती एकदा स्वीकारल्यानंतर तो प्रश्न आपण तेथेच सोडून द्यावा. कारण आम्ही अशी आशा करतो की, श्री. बावडेकरांना आत्महत्त्या करावी असे वाटले असेल व त्यांनी खरोखरीच आत्महत्त्या केली असेल तर त्याची कारणे कोठे तरी लिहिलेली आढळतील. एखाद्या माणसाला शिक्षा करावयाची असली तर न्यायाचे जे तत्त्व आपण स्वीकारले आहे ते असे आहे की, १०० गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु एकाही निर्दोषी माणसाला शिक्षा होता उपयोगी नाही. आता संशय निर्माण झाला असेल तर तो दूर करण्याकरिता सर्वमान्य मेथड किंवा मार्ग स्वीकारला पाहिजे. तेव्हा सरकारने ही सर्वमान्य मेथड स्वीकारली आहे की नाही व ती स्वीकारल्यानंतर त्यातून येणारा निर्णय कसाही असला तरी तो स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखविली आहे की नाही याचा विचार या सन्माननीय सभागृहाने करावा. सरकारने जर अशी मेथड स्वीकारली नसती तर आपण या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याऐवजी मीच स्वतः तसा ठराव आणला असता. त्याचप्रमाणे विरोधी पक्षसुध्दा आपल्यावरील जबाबदारी ओळखून वागलेला आहे की काय याचाही सन्माननीय सभागृहाने विचार करावा. एका कागदाबद्दल संशय निर्माण झाल्याबरोबर फायलींच्या फायली गहाळ झाल्या आहेत किंवा कपाटातील सर्व कागदपत्र गहाळ झाले आहेत अशा अफवा उठविणे हे जबाबदारीला धरून आहे काय असा माझा प्रश्न आहे. आता काही सन्माननीय सभासदांचे म्हणणे असे आहे की, या बाबतीत मी आपण होऊन त्यांच्याकडे जावयास पाहिजे होते किंवा खुलासा करावयास पाहिजे होता. परंतु कदाचित् मेंटल प्रेशरखाली असल्यामुळे मी काहीही बोललो नसेन. आता मी बोललो नसलो तर जाहीरपणे आरोप करण्यापूर्वी या बाबतीत आम्हांला असे वाटते, याबद्दल तुमचे म्हणणे काय आहे असे मला विचारण्याचे त्यांचे कर्तव्य होते की नाही? माझा जाब त्यांनी जसा आता विचारला आहे तसाच त्यांनी जाहीरपणे आरोप करण्यापूर्वी विचारला असता तरी त्यांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न केला असता. सन्माननीय सभासद श्री.अत्रे किंवा श्री. डांगे ५१(टिप पहाण्यासाठी येथे क्लिक कारा) हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि ज्या वातावरणात मी वाढलो आहे त्यात वयाचा मोठेपणा मानावयास मला शिकविले गेले आहे. तेव्हा मी वयाचा मोठेपणा मानतो. तेव्हा शिवाजी पार्कवर जाहीर सभेत बावडेकरांचा मृत्यू हा राजकीय खून आहे असा आरोप करण्यापूर्वी ज्याच्याविरुद्ध आपण आरोप करीत आहोत तो आपल्याच राज्याचा मुख्यमंत्री आहे, तेव्हा त्याचे या बाबतीत काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची तयारी दाखविली असती तर बरे झाले असते. लोकांच्या मनात संशय निर्माण झाला ही गोष्ट खरी आहे. परंतु तो दूर करण्याकरिता सरकारने काय करावयास पाहिजे होते व ते केले आहे की नाही हे पाहाणे ही कसोटी या सन्माननीय सभागृहाने या प्रश्नाला लावावी. या बाबतीत सर्वसामान्य मार्ग सरकारने जर स्वीकारला नसेल किंवा तो स्वीकारल्यानंतर त्यातून येणार्‍या निर्णयाप्रमाणे वागण्याची तयारी जर सरकारने दाखविली नसेल तर आपण अविश्वासाचा ठराव पास करू शकता. यात बहुमताचा किंवा अल्पमताचा प्रश्न नाही. हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावू शकता. बावडेकरांचा मृत्यू झाला ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यांचा मृत्यू किंवा त्यांचा राजीनामा या घटना पानशेतच्या आपत्तीपेक्षाही जास्त दुःखद व दुर्दैवी घटना आहेत असे मी एकदा म्हटले, परंतु त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांनी आत्महत्या केली म्हणून आपण दुसर्‍या कोणाला तरी केवळ संशयावरून दोषी ठरविणार आहात काय हा मुख्य प्रश्न आहे.

सन्माननीय सभासद श्री.एस्.एम्.जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे या अविश्वासाच्या ठरावातील ए आणि बी ही कलमे जवळ जवळ गाळण्यात आल्यामुळे या ठरावाचा पायाच डळमळीत झाला आहे असे मला वाटते. श्री. देशपांडे यांनी फार जोर देऊन त्यांच्या भाषणात वारंवार हे सांगितले की डेलिबरेट इंटरफियरन्स, कॅल्क्युलेटेड इंटरफियरन्स आहे. ते जर म्हणत असतील की हे मुद्दे आमचे नव्हते तर ती गोष्ट मी सोडून देतो. परंतु मला येथे सांगितले पाहिजे की, श्री. बावडेकरांचा मृत्यू ही एक दुर्दैवी घटना आहे. या दुर्दैवाचा उपयोग करून काँग्रेस सरकारला आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणेला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एक कागद गहाळ झाल्याचे ऐकताच फायली पळविल्या, कपाटे पळविली अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध व्हायला लागल्या. संशयाने संशय वाढतो. आणि आपण एक संशयाचे वातावरण निर्माण करीत आहोत.

मला असे सांगावयाचे आहे की, संशय निर्माण झाला आहे आणि संशयाचे परिमार्जन कसे करावयाचे आणि संशय दूर कसा करावयाचा हा मूळ प्रश्न आहे. आणि यासाठी आम्ही जी यंत्रणा उभारली आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करीत आहोत ती लोकशाहीला धरून आहे की नाही हे आपण पहा. लोकशाही पद्धतीत अशा वेळी ज्या मेथड्सचा अवलंब केला जातो त्या सर्व सरकारने स्वीकारल्या आहेत आणि आम्ही जे इन्क्वायरी कमिशन नेमले आहे त्याचा काय निर्णय होतो हे आपण पाहिले पाहिजे. माझ्याही पक्षातील लोकांना ह्या बाबतीत स्वतंत्र मतदान करण्याची इच्छा असेल तर ह्याच ठिकाणी उघडपणे मी माझ्या पक्षातील सदस्यांनाही अशा प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे की, त्यांनी कोणत्याही बाजूने मतदान करावे. आणि ही गोष्ट मी येथे जाहीर करीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
On 4th December 1961, Shri Y.B.Chavan, Chief Minister, replied to the no-confidence motion which was brought against the Government for not protecting the precious lives of residents of Pune during the Panshet Dam disaster and the failure to persuade Mr.Justice Bavadekar, constituting the one man Enquiry Commission, from committing suicide. Shri Chavan, in his speech, gave details about the help and measures taken by the Government to rehabilitate the victims of calamity. He also assured the House that whoever would be found guilty in the enquiry would be given condign punishment. He said that Mr.Justice Bavadekar was given all facilities by the Government and the Government could not be censured for his suicide as it was purely his personal matter.