• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-६७

त्याचप्रमाणे त्यांना जे शिक्षण दिले जाते ते सर्वसाधारण माणसाला आवश्यक असेच असते. उदाहरणार्थ, सन्माननीय सभासदांनी वेळ काढून त्यांना जे फायर फाइटिंगचे शिक्षण दिले जाते ते पाहिले तर अशा तर्‍हेचे शिक्षण सर्वसामान्य नागरिकांनासुध्दा आवश्यक आहे ही गोष्ट सन्माननीय सभासदांना पटेल. मुंबई महानगरपालिकेची फायर फाइटिंगची संघटना फार कार्यक्षम आहे हे मी कबूल करतो.

श्री. माने ४१ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) हे आहेत. प्रत्येक ठिकाणी अशा रीतीने विरोधी पक्षाचे सन्माननीय सभासद घेतलेले आहेत. तेव्हा हा पार्टी इश्यु आहे असे समजण्याचे काही कारण नाही.

त्यानंतर संपाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबतीत सरकारचे धोरण असे आहे की, एखादे काम करणारा नोकरवर्ग जर संपावर गेला असेल तर ते काम करण्यासाठी होमगार्डस्चा उपयोग करावयाचा नाही. परंतु त्या काळात दुसर्‍या कामासाठी त्याचा उपयोग केला जातो. वादग्रस्त प्रश्नाच्या वेळी होमगार्डस्चा उपयोग ज्या बाबतीत वाद असेल ते काम करण्यासाठी करावयाचा नाही असे धोरण सरकारने ठरविले आहे. आता ही संघटना अगदी निर्दोष आहे असा माझा दावा नाही. परंतु ज्या ज्या क्षेत्रात होमगार्डस्नी काम केले आहे त्या त्या क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे असा माझा जरूर दावा आहे - मग ते फायर फाइटिंगचे काम असो किंवा दुसरे कोणतेही काम असो. त्याचप्रमाणे हे काम त्यांनी अगदी निरपेक्षपणे व लोकांची सेवा करण्याच्या वृत्तीनेच केलेले आहे, हेही आपणा सर्वांनी कबूल केले पाहिजे. श्री. माणेकजी यांनी होमगार्डस्ची संघटना स्थापन करून मानवतेचीच सेवा केली आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. हे लोण त्यांनी आता हिंदुस्थान सरकारपर्यंतसुध्दा पोहोचविले आहे आणि त्यामुळे हिंदुस्थान सरकारसुध्दा अशा तर्‍हेची एक सुसूत्र संघटना बांधण्याचा विचार करीत आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्र राज्याला आहे ही आपण अभिमान बाळगण्याजोगी गोष्ट आहे. तेव्हा मी या कपात सूचनेला विरोध करतो.
-----------------------------------------------------------------------
On 16th March 1961, while discussing Demands on Police Department, the cut motion was admitted regarding what was described as unsatisfactory working of Home Guards. In reply to this inisimation Shri Y. B. Chavan, Chief Minister, traced the history of Home Guards and requested the members to point out to him the defects in the organisation. He further dwelt on the usefulness of the organisation to the State.