• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-६४

पोलिसांनी लाठीमार केला आणि लोकांना दुखापती झाल्या. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लाठीमार झाला असेही सांगण्यात आले. असे झाले असेल तर या गोष्टीची चौकशी मी जरूर करीन. माझ्याकडे जी माहिती होती ती सभागृहाला सांगितली; परंतु झालेला लाठीमार हा आवश्यकतेपेक्षा जास्त होता अशा प्रकारची माहिती जबाबदार माणसे, या सभागृहाचे सन्माननीय सभासद देत आहेत तेव्हा मी या गोष्टीची परत एकदा चौकशी करीन.

मागच्या दोन-तीन प्रसंगी मी सभागृहाला सांगितले होते की, राजकीय चळवळी पोलिसांच्या साहाय्याने दडपून टाकाव्या अशी आमची इच्छा नाही. आपले मतप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आम्हाला लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे चालावयाचे आहे तेव्हा प्रत्येकाला आपले मत प्रदर्शन करण्याचा हक्क आहे परंतु त्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. मला जरूर सांगावयाचे आहे की अशा प्रकारचा सत्याग्रह करताना त्या सत्याग्रहाच्या नेत्यांनी फार विचार करून पाहावा. ही जी ऑफिसेस बंद पाडण्याची त्यांची कल्पना आहे ती बरोबर नाही. या कट मोशनला उत्तर देताना मला एवढेच सांगावयाचे होते. तेव्हा या कट मोशनला विरोध करून मी आपले भाषण संपवतो.
---------------------------------------------------------------------------------
On 16th March 1961, Shri Y. B. Chavan, Chief Minister, in reply to a cut motion regarding the alleged indiscriminate and vicious lathi-charge on satyagrahis at Roha by the police, explained that picketeers’ intention to force the closure of Collector’s Office, thereby bringing Government machinery to a standstill; they were dispersed after a mild lathi charge. It is the primary function of Government to maintain law and order which the police did, said the Chief Minister, in conclusion.