• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-१०६

हा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, विशेषतः मुंबई शहरासंबंधीचा, तो प्रश्न तीव्र असा आहे. मुंबई शहराच्या कंजेशनसंबंधीच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी एक बर्वे कमिटी नेमली होती. त्यांनी ह्याबाबतीत विचार करून आपला अहवाल सादर केला आहे. मुंबई शहराचे जीवन हे एक विचित्र प्रकारचे जीवन आहे.  हे जीवन सकाळी उत्तरेकडून दक्षिणेकडे पळत असते आणि साधारणतः दुपारी तीन-चारच्या नंतर ते दक्षिणेकडून उत्तरेकडे पळू लागते. म्हणजे मुंबईच्या माणसाचा सकाळी एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे आणि दुपारनंतर दुसर्‍या बाजूकडून विरुद्ध दिशेने सर्व मुंबई शहराचा प्रवास चाललेला असतो. हा सर्व प्रवास एक किंवा दोन रस्त्यांवरून चाललेला असतो. ट्रॅफिकचा सर्व भार ह्या एक-दोन रस्त्यांवरच प्रामुख्याने पडतो. ह्या सर्व प्रश्नात संशोधनाची गरज आहे आणि काही एका शास्त्रोक्त पद्धतीने या सर्व प्रश्नांचा विचार व्हावयाला हवा आहे. एका ठराविक पीक-अवरला ट्रॅफिक फार वाढतो. काही ठिकाणी वन-वे-ट्रॅफिक करायला पाहिजे. वन-वे ट्रॅफिकची कल्पना आम्ही स्वीकारलेली आहे. मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा अत्यंत गुंतागुंतीचा असला तरी तो आपल्याला सोडवायला पाहिजे अशी माझी भावना आहे.

आपल्या राज्यात पोलिसांवरील खर्च वाढत चाललेला आहे. पोलिसांवर खर्च वाढणे हे काही चांगले आहे असे नाही. पोलिसांवरील खर्च वाढला म्हणजे ते एफिशियंट अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन होते असे नाही. पोलिसांवर खर्च वाढत आहे यात मला काही आनंद वाटत नाही. पोलिस कमिशनसमोर मी जे भाषण केले त्यात मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. सर्वांना जर असे वाटत असेल की, पोलिसांवरील खर्च कमी करावयाला पाहिजे, आणि एकदा धोका पत्करूनही आपण पोलीस कमी केले तर काय होते ते पाहिले पाहिजे, तर त्याही गोष्टीला माझी तयारी आहे. पण आजच्या परिस्थितीत आपली याबाबत किती तयारी आहे याचा आपण विचार केला पाहिजे.

गुन्ह्यांत प्रोहिबिशनचे गुन्हे जास्त वाढलेले आहेत असे सांगण्यात आले आणि आकडे पाहिले तर ही गोष्ट खरी आहे असे दिसून येईल. परंतु त्याचबरोबर इंडियन पीनल कोडचे आकडे कमी झालेले आहेत असे दिसून येईल. प्रोहिबिशनचा जो प्रश्न आहे तो अगदी स्वतंत्र प्रश्न आहे.

ह्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने मॅन-अवर्सही यात जास्त खर्च होत असतील. परंतु दुसर्‍या बाजूला ई.पी.सी.मधील गुन्ह्याचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे पोलिसांना ह्या गुन्ह्याकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळत असेल. प्रोहिबिशनच्या केसेस वाढल्या आहेत याचे दोन अर्थ होऊ शकतात. एकतर प्रोहिबिशन मोडण्याचे कार्य वाढले असेल किंवा गुन्हा शोधण्याचे कार्य वाढले असेल किंवा दोन्हीही होऊ शकते. आता सन्माननीय सदस्यांना याचा जो अर्थ घ्यावयाचा असेल तो त्यांनी घ्यावा.