TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

नांव - प्रा. बा. ह. कल्याणकर

गरीब शेतकरी कुटुंबात जन्म, शिक्षण एम्. ए. ( राज्यशास्त्र) मराठवाडा विद्यापीठात या विषयात सर्वप्रथम.

सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या चळवळीवर भक्कम असा विश्वास, मराठवाड्यातील एक तरुण विचारवंत म्हणून सर्व परिचित.

मराठवाडा विकास आंदोलनात, आर्थिक दृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या चळवळीचे नेतृत्व. मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी झालेल्या चळवळीचे नेतृत्व. कल्याणकर यांचे विचार आणि व्यक्तीमत्त्व चळवळीतच वाढलेले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व विचारात धार व गतिमानता दिसून येते.

ग्रंथसंपदा -
'उठाव', 'जागल', 'माळझरे', 'तांबडं फुटलं', 'शिलालेख' हे कवितासंग्रह. 'जागल' या काव्यसंग्रहास सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार 'सूर्यपंख' 'दिशा आणि दृष्टी' ही वैचारिक निबंधाची पुस्तके. 'अराजक' व 'कंदिल' या दोन कादंब-या. तसेच 'युगंधर नेते: यशवंतराव चव्हाण' या संपादित ग्रंथ.

महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार.

पत्रपंडित पां. वा. गाडगीळ हा पत्रकारिता पुरस्कार ( महाराष्ट्रात प्रथम १९८८-८९).

सोव्हियत लँड नेहरू पुरस्कार - १९८८.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाचे सभासद.

महाराष्ट्र राज्य मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाचे सभासद.

महाराष्ट्र राज्य एस्. एस्. सी. व एच्. एस्. सी. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य.

मराठी साहित्य सभेचे अध्यक्ष.

मराठवाडा विद्यापीठ संचालित महात्मा फुले प्रतिष्ठानचे सदस्य.

मराठवाडा विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

समाज विज्ञान प्रबोधिनीचे संचालक.

'युगकर्ता' नियतकालिकाचे संपादक.

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्राध्यापक म्हणून काम पाहतात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .