TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

Vyakhyanmala 1989
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष सतरावे १९८९

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत सन १९८९ मधील साहेबांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राच्या तरुण पिढीतील, सामाजिक परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीवर भक्कम असा विश्वास असलेली तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांची मोठी छाप असलेले एक व्यासंगी विचारवंत प्रा. बा. ह. कल्याणकर, औरंगाबाद सामाजिक संदर्भ' या विषयावर दोन प्रभावी व्याख्याने दिली आणि त्या विषयासंबंधीचे आपले सुस्पष्ट, परखड विचार कराडकरांना ऐकविले त्याबद्दल आम्ही प्रा. कल्याणकर यांचे आभारी आहोत.

आदरणीय श्री. यशवतराव चव्हाण यांनी चालविलेले समाज प्रबोधनाचे व परिवर्तनाचे कार्य सतत तेवत रहावे या जाणिवेने १९७३ साली 'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' सुरु करण्यांत आली. पुढे काही सज्जनांच्या सूचनेवरुन व्याख्यानमालेतील अभ्यासपूर्ण व्याख्याने पुस्तकरुपाने प्रकाशित होऊ लागले. ही व्याख्यानमाला याही पुढे अधिक जोराने सुरू ठेवण्याचा आणि त्यांतील निवडक व्याख्याने पुस्तकरुपाने प्रसिद्ध करीत राहण्याचा मनोदय आहे.

१९९० हे जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी शताब्दीचे वर्ष असून याच वेळी प्रा. कल्याणकर यांचे 'महात्मा फुले सामाजिक विचार आणि आजचे सामाजिक संदर्भ' या विषयावरील व्याख्यानांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे, हा एक योगायोगच म्हणावा लागेल. हे पुस्तक लोकमान्य मुद्रणालयाचे संचालक श्री. गजानन गिजरे आणि त्यांचे कुशल व मेहनती कामगार यांनी वेळेवर तसेच सुबकपणे छापून दिले या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने जयंतीदिनी त्यांच्यासंबंधी 'उदंड आयुरारोग्य लाभो' अशी करुणा भाकावयाची ते सर्वांचे प्रिय यशवंतरावजी आज आपल्यात नाहीत, सर्वसामान्यविषयी अखंड आत्मियता बाळगणारा सर्वगुणसंपन्न नेता कृष्णाकाठी कायमचा विसावला ! त्यांच्याच पवित्र स्मृतीला हे पुष्प सादर समर्पण !!

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .