TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांचा परिचय होत राहिला, विचार-विवेक-विमर्श या विचारमंथनाच्या प्रक्रीया व्यक्तिच्या जीवनावर जर संस्कार करून गेल्या तर कोणता सामाजिक आविष्कार व्यक्त होतो त्याचे यशवंतरावांचे चव्हाण हे मूर्तिमंत उदाहरण आहे. यशवंतरावांचे जीवनचरित्र हे नव्या पिढीला दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. महाराष्ट्रातील सामाजिक नि राजकीय चळवळीचे प्रवाह समजून देणारा एक खळाळून जीवन स्त्रोत! अशा गतिमान व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्ताने जनजागरणाचा उपक्रम म्हणजे ही व्याख्यानमाला होय.

कराड नगरपालिकेचे समृद्ध संपन्न ग्रंथसंख्या असणारे ग्रंथालय, हे कराडच्या लोकजीवनाचे एक उत्तम संस्कार धन आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि सौख्यासाठी या समृद्ध ग्रंथालयाचे स्थालांतर नगरपालिकेने नवीन बांधलेल्या वास्तूमध्ये लवकरच होत आहे. या नववास्तूमध्ये अभ्यासिका, महिलाविभाग, बालवाचक आणि संशोधकांचेसाठी स्वतंत्र दालने असून त्यामध्ये उत्तम फर्निचर, उत्तम बैठक व्यवस्था आणि अद्ययावत अशा सर्व सुखसोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे नवीन ग्रंथालय म्हणजे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील एक उत्तम संस्कारकेंद्र होणार आहे. आणि कराडच्या इतर वैशिष्ट्यात त्यामुळे उल्लेखनीय अशी भर पडणार आहे. हा अद्ययावतपणा वाचकांच्या आनंदात भर घालणारा ठरणार आहे. त्यासाठी अशा वाचकांची आणि सुखसोयींचा लाक्ष घेणा-या रसिकांच्या आम्ही अभिलाषा बाळगून आहोत.

आमच्या निमंत्रणाला मान देऊन माननीय प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे लातूर व माननीय श्री. प्रतापराव भोसले, भुईज, ता. वाई या दोन थोर विचारवंतांनी या मालेत व्याख्याने दिली. त्याबद्दल त्यांचे कृतज्ञापूर्वक आभार मानने आमचे कर्तव्य आहे

हे ‘शब्दांकित’ स्वरूप प्रकट होताना प्रा. वि. पु. गोखले व डॉ. कन्हैया कुंदप यांनी जे परिश्रम घेतले आहेत त्यांचे आणि कराड मुद्रणालयाचे संचालक श्री. आनंदराव दादासो पाटील नि त्यांचे कुशल, मेहनती कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

या व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत ‘शब्दांकित’ करण्याच्या हेतूने ही सर्व व्याख्याने प्रतिवर्षी पुस्तकरूपाने प्रकाशित करून हा ‘ज्ञानयज्ञ’ ख-या अर्थाने ‘अक्षर मुद्रांकित’ करून हे सर्व तत्वचिंतन उपलब्ध करून ठेवले जावे हाही हेतू आहे. ही पुस्तिका समाज पुरुषाच्या हाती देताना एकच प्रार्थना -

मा. यशवंतरावजींना राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो! त्यांच्या जीवनाच्या आदर्श नव्या पिढीला जीवनाची विधायक दृष्टी देणारा ठरो!

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .