TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

व्याख्यान पहिले - दिनांक ११ व १२ मार्च १९७६

विषय - “भारतीय समाजाच्या परिवर्तनाची दिशा आणि वेग”

व्याख्याते - श्री. गोपाळराव मयेकर, माजी शिक्षण मंत्री, गोवा व प्राचार्य, देवगड कॉलेज, देवगड.

व्याख्याता परिचय - प्रचार्य गोपाळराव मयेकर

सामाजिक परिवर्तनाच्या प्रयोगाची जिद्द

भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे निश्चित स्वरूप काय असेल या बद्दलच्या संकल्पनेचे स्पष्ट चित्र भारताच्या राज्यघटनेत उमटलेले दिसते. या ठिकाणी लोकशाही राज्य असेल, मानवतावादावरती आधारलेली समाजरचना असेल आणि धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक विचार त्यात असेल. दारिद्रय आणि अज्ञानाच्या गर्तेत रुतून पडलेल्या दुबळ्या समाजाला वर काढण्याचा आजही प्रयत्न असेल.

तथापि आपल्या जीवनामध्ये आढळणारे अनेक प्रकारचे विरोधाभास हेच आपल्या प्रगतीच्या मार्गातील धोंडे आहेत त्यामुळे स्वसंस्कृतीचा श्रेष्ठ वारसा असूनही आणि पाश्र्चात संस्कृतीकडून नवी मूल्ये लाभूनही व्हावी तेवढी प्रगती झाली नाही. कारण मानसिक क्रांती झाल्याशिवाय या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाला खरा अर्थ प्राप्तच होणार नाही. असे असूनही भारतीय समाजाच्या परिवर्तनाचा प्रयोग यशस्वी करण्याची भारताची जिद्द आहे, आणि त्यामुळेच या प्रयोगातून काय निष्पन्न होणार याच्याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. या भाग्याचे श्रेय या देशाची राजकिय, सामाजिक व सांस्कृतिक उभारणी ज्यांनी ज्यांनी केली त्या नेत्यांच्या व्यक्तिमत्वांना, त्यांच्या सांस्कृतिक आधिष्ठानाला आहे.

जन्म : १९३४ मुंबई येथे.

शिक्षण : एम. ए. (मराठी व संस्कृत) एलफिस्टन कॉलेज, मुंबई येथे प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण.

१९६२ पासून पणजी (गोवा) येथील धेंपे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सुरुवात अध्यापन क्षेत्रात १५ वर्षाचा आनुभव.

राजकिय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत नेहमीच भाग; त्यामुळे निरनिराळ्या संस्थांशी संबंध यातूनच राजकिय कर्तुत्त्वाला वाव मिळाला.

१९६७ नंतरच्या गोवा मंत्रीमंडळात समावेश (म्हपसा मतदार संघातून निवड) शिक्षण, आरोग्य, बांधकाम, माहिती आणि पर्यटन अशा पाच खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून अनुभव गोव्यातील महत्वाचे प्रकल्प उभारण्याची संधी या काळातच लाभली.

१९७० मध्ये मंत्रीपदाचा त्याग.

अनेक शिक्षण संस्था, साहित्य व सामाजिक संस्था मधून वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव, साहित्य, शिक्षण, नाटय, संगीत इत्यादी कलेची आवड, विविध संस्थांच्या विद्यमाने होणा-या व्याख्यानमालातून अनेक विषयांवर व्याख्याने झाली. थोडेसे कथा व कविता लेखन.

गोमंतक मराठी शिक्षण परिषदेचे संस्थापक सदस्य; भंडारी एज्युकेशन सोसायटी, मालवण या संस्थेचे उपाध्यक्ष.

मराठी नाट्य परिषदेवर उपाध्यक्ष म्हणून १८६८-६९ साली काम केले.

सध्या देवगड कॉलेज, देवगड येथे प्राचार्य म्हणून काम पाहतात.

मुंबई विद्यापिठाच्या अँकॅडमिक कौन्सिलचे सदस्य.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .