TOP HEADER
   
  • 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg
   
   

Vyakhyanmala 1976
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष चौथे १९७६

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ ही १९७३ साली सुरु झाली. १९७६ सालातील यशवंतरावांच्या वाढदिवशी ज्या थोर विचारवंतांची व्याख्याने झाली, त्याची ही मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देतांना मनाला एक समाधान जाणवते.

साहित्य, सौंर्दय, संगीत, क्रिडा, करमणूक या समाजजीवनाला सामर्थ्य देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगरपालिकेने या संदर्भात  कराडची एक वैशिष्ठयपूर्ण अभिरुची निर्माण केली आहे.

कराडचे सुपुत्र यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्वरुपात दिसणारे नेत्रदीपक प्रज्ञाप्रचीतीचे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व कलेकलेने साकारत गेले;  त्याचा विचार नि उच्चार समाज परिवर्तनाला उपकारक ठरेल या भावनेने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ स्वतंत्रपणे आयोजित करण्यात निश्चित औचित्य आहे!

आमच्या भारतीय समाजाच्या नि राष्ट्रीय जीवनाच्या समस्या, आव्हानाचे स्वरुप घेऊन आपल्या पुढे उभ्या ठाकल्या आहेत; त्या सामाजिक राजकीय, आर्थिक समस्यांचा अभ्यासपूर्ण उहापोह, अधिकारी व्यक्तिंच्या आयोजित व्याख्यानांतून व्हावा, हाच प्रधान हेतू या व्याख्यानमालेचा आहे!!

आमच्या निमंत्रणाला मान देऊन प्राचार्य गोपाळराव मयेकर, देवगड आणि प्रसिध्द चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर, मुंबई या थोर विचारवंतांनी या मालेत व्याख्याने दिली, त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.

त्या विचारवंतांच्या शब्दांचे हे  ‘अक्षर’  स्वरुप प्रकट होताना प्रा. वि. पु. गोखले यांनी परिश्रम घेतले आहेत. तसेच व्याख्याने अक्षरबध्द करून घेण्यासाठी ती ध्वनिमुद्रित करून घेणे आवश्यक असते. गेली दोन वर्षे याबाबत श्री. वसंतराव श्रोती यांचे हार्दिक सहाय्य झाले. म्हणून या दोघांचे आभार मानण्यांत आपलेपणाचा आनंदही सांठलेला आहे.

व्हिज्युअल डिझाईन रिसर्च युनीट, कोल्हापूरचे डिझाईन आर्टिस्ट भूपाल मांगोरे यांनी सदर पुस्तिकेचे अंतरंग व बाह्यांग आकर्षित व मनोवेधक करणेसाठी जे परिश्रम घेतले; तसेच श्री साईनाथ प्रिंटींग प्रेसचे व्यवस्थापक नि कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

या व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत ‘अक्षर’ करण्याच्या हेतूने प्रतिवर्षी व्याख्यानांची पुस्तिका प्रसिध्द केली जावी हा ही हेतू आहे. ही पुस्तिका समाज पुरुषाच्या हाती देताना एकच प्रार्थना –

मा. यशवंतरावजीना राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो ! त्यांच्या जीवनाचा आदर्श नव्या पिढीला जीवनाची विधायक दृष्टी देणारा ठरो !

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .