TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

महागाई : महागाईचे एक दुष्टचक्र आहे. दरवर्षी महागाई वाढत आहे. किंमती वाढल्या की वेतनवाढ होते; वेतनवाढ झाली की करवाढ करावी लागते; करवाढ झाली की पुन्हा भाववाढ. अशी त-हेने हे दुष्टचक्र वाढत जाते ते थांबविले पाहिजे. याकरिता किंमतींचे स्थिरीकरण (Stabilization) झाले पाहिजे. चलनाचे मूल्य घटविणे (Demonetisation) हा एक मार्ग सुचविण्यात येतो. कागदी चलनामध्ये ५० टक्के चलन १०० रुपये नोटांचे व पुढचे आहे. त्याचे मूल्य घटविले पाहिजे. म्हणजे या सर्व नोटा सरकारच्या ताब्यात येतील आणि अनाठायी फुगलेल्या संपत्तीला आळा बसेल, असा त्याचा अर्थ.

उत्पादनवाढ : परंतु खरे म्हणजे विषमता दूर करण्यासाठी वस्तूंचे जास्तीजास्त उत्पादन झाले पाहिजे. म्हणजे त्या लोकांपर्यंत जाऊ शकतील.

काळा पैसा : आज काल काळ्या पैशाबद्दल नेहमी ऐकिवात येते. वास्तविक जे जे अप्रामाणिकपणे मिळविलेले असते त्याचा समावेश काळ्या पैशात होतो. या पैशाचा कोठे हिशेब नसतो. यामुळे सर्व अर्थव्यवस्थेवर व आर्थिक परिस्थितीवर अनिष्ट परिणाम होतो. काळा पैसा ही एक समांतर अर्थव्यवस्था ( Pareller economy ) बनते. बेनेडाइट कॉस्टा याने आपल्या India's Socialist Princes & Garibi Hatao या पुस्तकात लिहिले आहे की ५० कोटी रुपयांचा काळा पैसा मुंबईतील नुसत्या चित्रपटसुष्टीत आहे. लाचलुचपत, भ्रष्टाचार यामुळे तसेच परदेशी मौल्यवान वस्तूंच्या चोरट्या व्यापारामुळे ( Smuggling) काळा पैसा जमतो आणि म सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण होते. तेव्हा हा काळा पैसा नष्ट झाला पाहिजे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होणार नाही. जर आर्थिक विषमता टाळ्या येत नसेल तर न्याय मिळणार नाही. ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी न्याय आहे असे होऊन बसते. भ्रष्टाचारात करचुकवेपणा घडतो. संयानम कमिटीने दिल्याप्रमाणे सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या एका अनधिकृत अंदाजाप्रमाणे करचुकवेपणाचा पैसा दरवर्षी सुमारे २३० कोटी रुपयांपर्यंत असतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवश्यक वस्तू ( Essential Commodities ) योग्य दरात व योग्य प्रमाणात सर्वांना मिळणे महत्त्वाचे आहे. ते शासकीय पातळीवरुन होऊ शकते. व्यापारी हा जबरदस्त शोषक असतो; हे आपणास दररोजच्या व्यवहारात दिसून येते वस्तू महाग होणे, गायब होणे, भेसळ होणे, वजनमापात फसविणे, दलाली करणे अशा अनेक रीतीने तो जनतेचे शोषण करीत असतो. जनता सुखी राहण्यासाठी व्यापारातील अप्रामाणिकपणावर कडक नियंत्रण हवे. तेल, दूध, धान्य, कपडा व निवारा या आवश्यक गोष्टींच्या दरातील व प्रमाणातील वाजवीपणा सामान्य जनतेच्या सुखास कारणीभूत होईल.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .