TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

नेहरूनी याच अर्थाने समाजवादाचा स्वीकार केलेला होता, नेहरूनी याच अर्थाने समाजवादाचे विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या परिस्थितीकडेच या देशाचे भूमीकडे इथल्या समाजवादाचे पहात पहातच समाजवादाचा स्वीकार करायचा आहे. त्यांमुळे समाजवादाबद्दलतच्या कोणत्याही आग्रही भूमिका, ठोकळेबाज भूमिका ह्या घेणे मला आवडत नाही. कारण, “ Theory is green, but evergreen is the tree of life.” हे नेविनचं वाक्य मोठं अर्थपूर्ण आणि छान आहे. सिध्दांत हे हिरवेगार असतात परंतु जीवनाचा वृक्ष हा सदासर्वकाळ हिरवागार असतो. त्यामधून प्रेरणा जर घ्यावयाची असेल तर आपणाला जीवनाकडे “ सदासर्वकाळ हिरवागार असणारा वृक्ष आहे ” या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि या दृष्टीने आज जगामध्ये राष्ट्रीयीकरणासंबंधीचा जो अतिशय उत्साह ओसरत चाललेला आहे. हा का ओसरत चाललेला आहे या संबंधी आपणाला विचार केला पाहिजे. आणि केवळ मालकी हक्क बदलून प्रश्न जर सुटत असतील तर ते तसे सोडवले पाहिजेत पण केवळ तेवढ्यानेच जर समाजामध्ये बदल होत नसेल, त्याच्यामधले दारिद्र्य जर हटत नसेल तर याच्याही पलिकडे जाऊन इतर कांही मार्गाचा शोध घ्यावा लागणार आहे. पुढच्या दशकामध्ये आपल्या समाजवादाला खरोखर महत्वाची ३/४ अशी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान जे आहे ते अस्पुश्यतानिवारणाचं आहे. दुसरं जे आव्हान आहे, जे शहरातील slums  गलिच्छ वस्तीत राहणारी लाखो माणसं, त्या गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन करणं. तिसरं आव्हान फार मोठं आहे, खेड्यापाड्यातील शेतमजूर वर्ग आहे. की ज्याला दिवसाकाठी कसेबसे २/२||  रूपये मिळतात आणि ज्याला वृध्दापकाळाची काही शाश्वती देखील नाही ह्या शेतमजूर वर्गाचे फार मोठं आव्हानं आहे. बेकारीचा प्रश्न आहे. त्यामुळे पुढचं दशक हे अस्पुश्यता, अस्पुश्यांचा प्रश्न शेतमजूराचा प्रश्न आहे, गलिच्छ व रस्त्यांमध्ये राहणारे लोक, शेकडो हजारो लाखो लोक ज्यांचेवर बेकारीचा प्रसंग आलेला आहे. असे ते बेकार, बेकारींची कु-हाड ज्यांचेवर कोसळलेली आहे असे लोक. या लोकांच्या प्रश्नांनी पुढच दशक भरलेलं आहे. आणि भारतीय समाजवादाला या लोकांचे-प्रश्न कसे सोडविता येतील या संदर्भात विचार करायचा आहे आणि यासाठी जी काही वास्तव भूमिका असेल ती आपल्याला स्वीकारावी लागेल. काही ठोकळेबाज भूमिका असतील तर त्या बाजूला ठेवाव्या लागतील त्यांच्यात काही बदल करावा लागेल, कारण नेविनचं जे वाक्य आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे कारण सिध्दांत जे आहेत सदासर्वकाळ जरी कितीही हिरवेगार असले तरी जीवनाचा वृक्ष हा सदासर्वकाळ हिरवागार असतो. आणि आपल्याला जी प्रेरणा घ्यायची आहे. आणि इतकच सांगून समाजवादाचं स्वरूप हे बदलत आलेलं आहे. २० व्या शतकाच्या शेवटी शेवटी तर समाजवादाचं स्वरूप पुष्कळ बदलणार आहे. मी स्वत:  समाजवाद एक साधन आहे असे मानणारा आहे, गरीब माणसाचे जीवन बदलण्याचे ते एक साधन आहे. आणि मुख्य उद्दिष्ट जर काय असेल तर प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं दारिद्र्य हटल पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा विकास-कारण मानवी जीवन हे पवित्र आहे. आणि उद्दिष्ट जर काय असेल, साध्य जर काय असेल तर प्रत्येक व्यक्तीचा विकास आहे. समाजवाद माझ्या दृष्टीने साधन आहे;  साधनात जर कही थोडाफार बदल कराल तर तो जरूर केला पाहिजे उद्दिष्टात- साध्यामध्ये मात्र बदल होता कामा नये. कारण माणूस हा सगळ्य समाजसंस्था निर्मात्ता आहे. माणसानं या सगळ्या समाजसंस्था निर्माण केलेल्या आहेत. धर्मसंस्था अर्थसंस्था, राज्यसंस्था ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, हा माणूस आहे. त्यान निर्माण केलेली ही त्याची साधनं आहेत त्यामुळे निर्माता आणि निर्माण केलेली साधनं याचा जो संबंध आहे. Relations  आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत. व्यकितीचा विकास हा शाश्वत विचार आहे माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्या काही सुप्तशक्ती आहेत या सुप्तशक्तिंचा आविष्कार करणं हे अंतिम साध्य आहे. मानवी इतिहासात एक मार्गदर्शक तत्त्व जर कोणतं असेल तर व्यक्तीचा विकास-प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त शक्तीचा आविष्कार हे आपलं मार्गदर्शक तत्व आहे. आणि महासागरातल्या एकाद्या दिपगृहाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार हे तत्त्व आहे समाजवादाची ही मीमांसा करताना मी प्रत्येक व्यक्तिचं जीवन त्याच्यामध्ये किती समृध्द होणार आहे. त्याच्या जीवनात किती स्वातंत्र्य मिळाणार आहे. त्याच्या जीवनातील किती दारिद्रय कमी होणार आहे हा निकष लावून मी समाजवादी तपाशीन, लोकशाही तपाशीन आणि मी इतर भांडवलशाही तपाशीन, कम्युनिझमशाही तपाशीन. सगळ्याच तत्वज्ञानाचा निकष माझा जर कोणता असेल तर प्रत्येक व्यक्तीचं जे जीवन पवित्र आहे या पवित्र जीवनाचा विकास किती होतो आहे. हा माझा निकष आहे. आणि भारतीय समाजवादाचा विचार करताना देखील हे मूलभूत निकष आहेत. मानदंड आहेत व्यक्ती सगळ्या गोष्टींचा मानदंड आहे. हे जे मुलभूत तत्त्व आहे हे लक्षात घेऊन यापुढच्या दशकामध्ये आपणास आपल्या समाजवादाचा विचार करावयाचा आहे. इतकं सांगुन आपण शांतपणाने माझे व्याख्यान ऐकून घेतले. या बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .