TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

उत्तरार्ध

(पार्श्वसंगीत)
१९४६ च्या बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्तं महाराष्ट्राचा पहिला ठराव मंजूर झाला. ध्येय सगळयांचंच एक होतं, पण मार्ग भिन्न होते.
आंध्रमध्ये पोटू श्रीमुलु यांचा आमरण उपोषण बळी गेला, आणि मग ऑक्टोबर १९५३ मध्ये ‘आंध्र प्रदेश’ या तेलुगु भाषिक प्रांतांची निर्मिती झाली.
१९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा साठी रान उठविण्यात आलं....
२३ जानेवारीला चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रीपदाचा राजिनामा दिला आणि व्दैभाषिक आलं, मोराजीभाईंना अविरोध निवड हवी होती, या गोष्टीला भाऊसाहेब हिरे यांचा विरोध होता.
मग, भाऊसाहेबांत आणि माझ्यात चुरस झाली. त्यांना १११ आणि मला ३३३ मतं पडली!... व्दैभाषिकाचा मुख्यमंत्री होताच, मी आधी मंत्र्यांच्या बंगल्याची नावं बदलली:

‘सह्याद्री,’ ‘रामटेक,’ ‘वर्षा,’ ‘मेघदूत,’ ‘अजिंठा-‘ अशी मराठी संस्कृतीची छाप असलेली नवी नावं दिली बंगल्यानां!
एक पार्टी होती सह्याद्रीवर... त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव होते भटसाहेब. ते खुर्चीत पडले-
मी लगेच त्या धक्का देणा-या पुढा-याला म्हटलं,
बघा, आय. ए. एस. अधिकारी पडला, तरी तो नेमका खुर्चीत पडतो!
मुंबई महाराष्ट्राला नको असं मी कधीही म्हटलं नव्हतं. ‘मुंबईसाठी चळवळ नको, एवढंच माझं म्हणणं होतं. मुंबई मिळाली नाही, याचं मलाही दु:ख आहे. पण म्हणून काय देश जाळायचा?

हाही एक प्रकारचा देशी वसाहतवादच आहे. दिल्लीतला कॉंग्रेस हाय कमांड ला राजकीय आव्हान न देता, आपलं म्हणणं कसं पटवायचं, असा पेच माझ्यापुढे होता. (खवळून) काय म्हणालात? मी सूर्याजी पिसाळ? मग, शिवाजी कोण?
... तो काय असे काळे झेंडे घेऊन फिरायचा? (थांबून) मला बदनाम करा, पण सत्य कधीही बदनाम होणार नाही!
चौपाटीवरच्या सभेला पं. नेहरू संतापूनच आले.
अगर उनको मेरा सिर लेना है, तो लेने दो--

but, let them remember,
Govt will not collapse on this issue!
अशा तापलेल्या वातावरणातच १९५७ च्या निवडणुका आल्या. परिस्थिती एकूण कठिणच होती....
कराडला माझ्या अगोदर माधवराव बागत याचं भाषण झालं. ते म्हणाले,
आता मरण्यापूर्वी मला यशवंतरावांचा पराभव झालेला पहायचा आहे, यंदा
तेवढा पाहिला की, मी मरायला मोकळा झालो!
कॉंग्रेसचे कार्यकर्ते कासावीस झाले.
त्याच दिवशी, त्याच ठिकाणी नंतर आमची सभा झाली. मी शांतपणे म्हणालो,

माधवराव बागल यांच्या समाजसेवेविषयी माझ्या मनात अतिशय आदर आहे.
समाजालाही त्यांची फार गरज आहे... त्यांना उदंड आयुष्य लाभावे, म्हणून आपण मला यंदा निवडून द्या! (टाळया)

पूर्वीच्या काळात राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा... आताच राजा मताच्या पेटीतून जन्माला येतो!... राजाधिराज मतदारांनो, उद्या सकाळी लौकर उठा, स्नान करा, श्रद्धेनं या आणि कॉंग्रेसला मत द्या!” (टाळया)

मी मुख्यमंत्री झालो.
आईचा आशिर्वाद घ्यायला गेलो...आपला पोरगा साहेब झाला, हे तिला कळलं. तिच्या डोळयात अश्रू होते- ते आनंदाश्रू होते! त्यांना मोत्याचं मोल होतं!!

महाराष्ट्राला हे असं ग्रहण लागलेलं असतानाच, त्यावेळचे ‘लोकसत्ते’चे संपादक ह. रा. महाजनी यांनी बेळगावच्या प्रश्नावर सरकारविरूध्द लेखामागून लेख लिहायचा सपाटा लावला. एक दिवस, मी स्वत: सकाळी ११ वाजता फोन करून त्यांना विचारलं:
Are  you on war-path with me?”
“नाही, प- पण- साहेब-“
(आवाज चढवून) “Are you on  war- path with me?’’
“तसं नाही, पण-साहेब-“
(आणखी उंच स्वरात) “Are you on war-path with me?”-आणि मी फोन ठेवून दिला!!
थोड्याच दिवसांनी, संक्रांतीचं निमित्त साधून ह. रा. महाजनी, सौ. महाजनी चांदीच्या वाटीत तिळगूळ घेऊन ‘सह्याद्री’ वर आले. हास्यविनोद झाल्यावर निरोप देताना मी महाजनींना म्हणालो,

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .